Monday, 18 February 2019
सुविचार संग्रह
1) सुखी आयुष्य जगायचे असेल तर आपल्या गरजा मर्यादित ठेवाव्या लागतील.
2)इतरांचा द्वेष करणे म्हणजे दुःखाला निमंत्रण देणे होय.
3) प्रत्येक पदार्थाची चव अवश्य बघावी;पण खाताना मात्र काय पचेल याचा विचार करावा.
4) देव आहे आणि तो आपल्याला मदतही करतो;आपले सगळेच काम तो करत नाही.
5) मराठी आमुची मायबोली तिचिये साऊली आम्ही असू।
6) बलवान माणसाला नशीब साथ देते.
Monday, 4 February 2019
बाबामहाराज सातारकर
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी, इ.स. १९३६ रोजी सातार्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचे पदवीपयर्ंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढय़ांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. प्रवचनकार दादा महाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली.
तोंडाचा आणि स्तनाचा कँसर
पुरुषांमध्ये मौखिक आणि फुप्फुसांच्या कर्करोगामुळे आणि स्त्रियांमध्ये गर्भाशय आणि स्तनांच्या कर्करोगामुळे मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. भारतात कर्करोगामुळे जितके लोक मृत्यूमुखी पडतात त्यापैकी ५0 टक्के मृत्यू वरील कारणांमुळे होत आहे.
Friday, 1 February 2019
कल्पना चावला
अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले. कल्पना चावला हुशार असल्याने त्या नेहमी त्या पहिल्या पाच नंबरात असत. त्यांचा स्वभाव अतिशय साहसी होता. त्या कराटे शिकल्या. भरतनाट्यम या कला प्रकारातही त्यांनी नैपुण्य प्राप्त केले.
राज्यात १७ शहरांत तीव्र वायू प्रदूषण
राज्यातील १७ शहरांची हवा प्रदूषित झाली आहे. यात कोल्हापूर, सांगली, सोलापूर, मुंबई, पुणे, तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर आणि जालना या तीन शहरांचा समावेश आहे. जालना आणि उल्हासनगर ही दोन शहरे राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहरे आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा, नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रदूषित हवा असलेल्या देशातील शहरांच्या यादीत झाशी, जयपूर, खुर्जा, दिल्ली, नोएडा, बरेली आणि प्रयागराज यासह ३२ शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
भारतातीलनैसर्गिक आश्चर्ये
जगातील मानवनिर्मित आणि नैसर्गिक आश्चर्यांबद्दल आपण नेहमीच ऐकत आलो आहोत, पण भारतामध्ये ही काही राज्यांमध्ये अशी ठिकाणे आहेत, जिथे तरंगत्या सरोवरापासून ते 'डबल डेकर' पुलापर्यंत अनेक निसर्गाने घडविलेले चमत्कार आपण पाहू शकतो. या ठिकाणांना निसर्गाचा वरदहस्त लाभलेला असून, या ठिकाणी असलेली ही नैसर्गिक आश्चर्ये खरोखरच मन मोहवून घेणारी आहेत. ही नैसर्गिक आश्चर्ये भारतामध्ये कुठे आहेत हे जाणून घेऊ या.
Subscribe to:
Posts (Atom)