Saturday, 13 May 2023

चालू घडामोडी 13 मे 2023

1. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलाच्या हेरिटेज सेंटरचे उद्घाटन कोठे केले आहे?

 (a) दिल्ली (b) मुंबई (c) कोलकाता (d) चंदीगड

2. IPL च्या इतिहासात 7,000 धावा करणारा पहिला क्रिकेटर कोण आहे?

 (A) विराट कोहली (B) डेव्हिड वॉर्नर (C) शिखर धवन (D) रोहित शर्मा

3. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी कोणत्या शहरात पंतप्रधान जनऔषधी केंद्राचे उद्घाटन केले?

 (A) लखनौ (B) भोपाळ (C) पाटणा (D) सिकंदराबाद

4.  ड्वेन ब्राव्होसह आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण बनला आहे?

 (A) रवींद्र जडेजा (B) सुनील नरेन (C) पियुष चावला (D) युझवेंद्र चहल

५.  पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने राष्ट्रीय विक्रम केला आहे?

 (A) मुरली श्रीशंकर (B) नयना जेम्स (C) प्रवीण चित्रवेल (D) शैली सिंग

उत्तर- 1. D 2. A 3. D 4. D 5. C

Thursday, 11 May 2023

व्हेलची उलटी हिऱ्यापेक्षा मौल्यवान

व्हेल प्रजातीचे अनेक मासे समुद्रात आढळत असले तरीही ‘स्पर्म’ व्हेलच्या उलटीला परफ्युम उद्योगात अतिशय महत्त्व असून तिला भरमसाठ दर मिळून कोट्यवधीची कमाई मिळते. परफ्युमचा वास दीर्घकाळ दरवळत राहण्यासाठी नैसर्गिक तत्त्व म्हणून ती वापरतात. त्याचा आरोग्यावर विघातक परिणाम होत नसल्याने या उलटीचा वापर केलेल्या अत्तरांना दर अधिक मिळतो. यामुळे जिथे व्हेल मासा दिसतो, तिथे मच्छीमारांची नजर या उलटीवर असते. मत्स्यक्षेत्रातील अभ्यासकांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतात इतर किनारपट्टीप्रमाणे कोकण किनारपट्टीवर काही काळापासून व्हेल मासा आढळत आहे. व्हेल माशामध्ये दात नसलेले आणि दात असलेले अशा दोन प्रकारच्या प्रजाती आहेत. उलटी उपयुक्त असलेला ‘स्पर्म व्हेल’ हा दात असलेल्या प्रजातीतील आहे. साधारणत: व्हेल हा समुद्र किनार्‍यापासून खूप दूर असतो. उलटीसारखा हा भाग किनार्‍यावर येण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागतो. याचे वजन 50 किलोपर्यंत असते असे अभ्यासकांचे मत आहे. स्पर्म व्हेलच्या उलटी ओळखण्यासाठी काही प्राथमिक गोष्टी सांगितल्या जातात. उलटीतील न पचलेल्या भागात म्हाकुळच्या दातासारखे किंवा कडक कवचासारखे भाग आढळतात. गरम सुई उलटीच्या गोळ्यात खुपसली तर तो वितळतो आणि त्यातून काळा धूर येतो. त्याचा रंग काळपट असतो. तसेच काहीवेळा जहाजाचं तेल किंवा त्यातील बाहेर टाकलेले घटकांचा गोळाही तयार होतो. तो मेणासारखा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही उलटी उपयुक्त आहे की नाही याची चाचणी विशिष्ट ठिकाणीच करता येते. स्पर्म व्हेल संरक्षित घटक खोल समुद्रात सापडणारा ‘स्पर्म’ व्हेल हा संरक्षित घटक आहे. हा मासा सीआयटीइएस (Convention on International Trade in Endangered Species of Wild Fauna and Flora) यामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे स्पर्म व्हेलची शिकार किंवा त्यांच्याशी निगडीत कोणत्याही घटकाची विक्री करण्यास बंदी आहे.  व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अ‍ॅम्बरग्रीस (उलटी) हे अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीनें विकले जाते. त्यात अ‍ॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अ‍ॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. अत्तरात उलटीचा वापर हा फिक्सेटीव्ह (स्थिरीकरण द्रव्य) म्हणून वापरतात. सेंट कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकावे यासाठी हे फिक्सेटीव्ह उपयुक्त असते. यासाठी काही केमिकल्स आहेत; परंतु त्याचा शरीरावर परिणाम होतो. उलटी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे त्याला मागणी अधिक आहे. सेंटबरोबरच औषधातही वापर होतो. शरीरातील अपचन झालेले पदार्थ बाहेर टाकले जातात. वैज्ञानिक भाषेत याला अ‍ॅम्बरग्रीस असे म्हटले जाते. स्पर्म व्हेलच्या शरीरातून निघणारा हा पदार्थ काळ्या रंगाचा असून हा ज्वलनशील पदार्थ मानला जातो. व्हेलचे आवडतं खाद्य म्हणजे, म्हाकुळ होय. म्हाकुळचा तोंडाचा भाग पोपटाच्या चोचीसारखा असतो. तो पचत नाही. तसेच व्हेल कोळंबी खातो. ज्याचा भाग कडक असल्यामुळे तो पचत नाही. न पचलेला भाग व्हेल उलटून टाकतो. त्यात विविध प्रकारची रसायनेही असतात. उलटी लाटांवर तरगंत राहिल्यामुळे आपसूक त्यावर प्रक्रिया होते आणि ती मेणासारखी बनते. समुद्राच्या लाटाबरोबर ती तरंगत किनार्‍याला लागते. या उलटीची तस्करी केली जात आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली