बंगालच्या उपसागरातील एक महत्त्वाचे बंदर म्हणजे अक्याब होय . म्यानमार ( पूर्वीचा बहादेश ) देशातील आराकान विभागाचेव अक्याब जिल्ह्याचे हे महत्त्वपूर्णव प्रमुख शहर आहे . कलादन , मायूवलेमरो या तीन नद्यांच्या त्रिभूज प्रदेशातील कलदन नदीच्या बेटावर हे शहर वसलेले आहे . हे शहर ब्रिटिशांच्या ताब्यात असताना तेतांदूळ नियांतीचे मुख्य केंद्र होते . नतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते जपानच्या ताब्यात गेले . म्यानमार मधील इतर सर्व प्रमुख शहरांशी हे वायूमार्ग व जलमार्गाने जोडलेले आहे .
Thursday, 9 April 2020
कवयित्री डॉ.स्वाती शिंदे-पवार
डॉ .स्वाती शिंदे पवार साहित्य क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तीमत्व
सांगली जिल्ह्यातील अष्टपैलू साहित्यिका डॉ. स्वाती शिंदे-पवार यांचा आज ८ एप्रिल हा जन्मदिवस. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील जरंडी हे माहेर तर कडेगाव तालुक्यातील रामापूर हे सासर असलेल्या डाॅ. स्वाती शिंदे या शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. त्यानी आतापर्यंत तेरा पदव्या मिळवत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सद्या मुख्याध्यापिका म्हणून खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा मंगरूळ येथे कार्यरत आहेत.

Wednesday, 8 April 2020
शीतल महाजन यांनी 13 हजार फूट उंचीवरून साडीचे आव्हान स्वीकारले
लोक झाले दंग
जगातील निम्म्याहून अधिक देशांमध्ये कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत भारतीय महिला आणि युवती या कठीण दिवसात विविध आव्हाने स्वीकारून स्वत: ला व्यस्त ठेवत आहेत. अशी सर्जनशील कामे करून महिला आपल्या मित्रांशी संपर्कात राहत आहेत. सध्या साडी चॅलेंजचे सोशल मीडियावर ट्रेंडिंग सुरू आहे. गृहिणी असलेल्या महिलादेखील हे आव्हान स्वीकारत आहेत. भारताचे हे आव्हानही सातासमुद्रापलीकडे पोहोचले आहे.

Tuesday, 7 April 2020
रणजीत देसाई
मराठीत ऐतिहासिक कादंबरी लेखनाची मोठी परंपरा आहे. रणजीत देसाई हे या नामावलीतील फार वरचे नाव. छत्रपती शिवाजी महाराजांवरील त्यांची 'श्रीमान योगी' ही मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरी गणली जाते. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व लेखनातून पेलणे ही बाब सोपी नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी समोरच्या शत्रूशी सुरू असलेली लढाई आणि त्याचवेळी घरच्या आघाडीवर सुरू असलेले समर प्रसंग यातून महाराजांनी कार्य सिद्धीस नेले.
जागतिक आरोग्य दिन(7 एप्रिल)
दरवर्षी 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात जगभरात ‘जागतिक आरोग्य दिन’ पाळला जातो. यावर्षी म्हणजेच 2020 साली “सपोर्ट नर्सेस अँड मिडवाईव्ह्ज” ही या दिनाची संकल्पना आहे. यावर्षी जागतिक आरोग्य दिन आरोग्य सेवा पुरविण्यात सर्व परिचारिका आणि सुईणींची असलेली महत्त्वपूर्ण भूमिका जगापुढे मांडत आहे आणि त्यांचे कार्यदल बळकट करण्यासाठी जगाला आवाहन करीत आहे.
वाढवा सामान्य ज्ञान
१) इंग्लिश खाडी पोहून गेलेली पहिली भारतीय महिला कोण?
२) इंटरपोल काय आहे?
३) जगातील सर्वात क्रियाशील ज्वालामुखी कोणता?
४) पेंग्विनची सर्वात मोठी प्रजाती कोणती?
५) महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा कोणता?
उत्तर : १) आरती शहा २) आंतरराष्ट्रीय पोलिस संघटना ३) एटिना ४) एम्पेरर पेंग्वीन ५) औरंगाबाद.

Monday, 6 April 2020
झाडांची पाने हिवाळयातच का गळतात?
हिवाळा (शिशिर ऋतू) सुरू झाला की वातावरणातील तापमान कमी होते. वृक्षांची वाढ मंदावते. पानांमधील हरितद्रव्य कमी होते, प्रकाशसंप्रेषण मंदावते. हरितद्रव्य (क्लोरोफिल) कमी झाल्यामुळे पिवळ्या रंगाचे झान्थोफिल्स, नारंगी रंगाचे कॅरेटेनॉइड्स, लाल जांभळ्या रंगाचे अँथोसायनीन इत्यादी रंगद्रव्ये वाढतात. म्हणून पानगळ होताना झाडांच्या पानांच्या रंगामध्ये बदल दिसून येतात. हरितद्रव्य कमी होण्याची सुरुवात पानांच्या देठातील पेशींपासून होते. देठातील या पेशींच्या थरामध्ये सबइरीन आणि लीगनिन स्वर्ले जाते. या पदार्थाचा थर ते पान फांदीपासून वेगळे होण्यास मदत करतो.
Subscribe to:
Posts (Atom)