डॉ .स्वाती शिंदे पवार साहित्य क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तीमत्व
सांगली जिल्ह्यातील अष्टपैलू साहित्यिका डॉ. स्वाती शिंदे-पवार यांचा आज ८ एप्रिल हा जन्मदिवस. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील जरंडी हे माहेर तर कडेगाव तालुक्यातील रामापूर हे सासर असलेल्या डाॅ. स्वाती शिंदे या शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. त्यानी आतापर्यंत तेरा पदव्या मिळवत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सद्या मुख्याध्यापिका म्हणून खानापूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा मंगरूळ येथे कार्यरत आहेत.
नोकरी आणि घरसंसार सांभाळत दहा हजाराहून अधिक व्याख्याने देणाऱ्या डाॅ. स्वाती शिंदे यांचे सात कवितासंग्रह , पाच निबंध व भाषण संग्रह, एक समीक्षा ग्रंथ प्रकाशित आहेत. राज्यातील अनेक विद्यापीठातून त्यांच्या कवितासंग्रहाचा अभ्यासासाठी समावेश असून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांना त्यांनी गवसणी घातली आहे. याबरोबरच
सामाजिक कृतज्ञता म्हणून काम करणाऱ्या डाॅ. स्वाती शिंदे यानी दरवर्षी दहा मुली दत्तक घेऊन त्यांना स्वावलंबी बनवले आहे. तसेच आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त सलग २२ वर्षे अक्षरयात्री ग्रामीण मराठी साहित्य संमेलने घेऊन एक वेगळी परंपरा सुरू ठेवली आहे. आपल्या सहवासातील अनेक साहित्यिकांच्या सुखदुःखात सहभागी होत आपली जबाबदारी पार पाडतात.
महापुरावेळी तीन गावे दत्तक घेऊन त्या गावाना अन्नधान्य, कपडे व इतर सोयी सुविधा देत आपुलकी आणि जिव्हाळा जपण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन असल्याने गोरगरिबांचे हाल होत आहेत. हे लक्षात घेऊन वाढदिवसानिमित्त घरकाम करणाऱ्या अकरा कुटुंबांना महिनाभराचे संसार उपयोगी कीट घर पोहच केले आहे. खरं तर या त्यांच्या कामात पती अनिल पवार आणि दोन्ही मुलांची साथ खूप महत्त्वाची आहे. त्यामुळेच त्या नेहमीच उत्साहाने आणि आनंदाने कोणत्याही विधायक कामात पुढाकार घेण्यासाठी सदैव तत्पर असतात.
No comments:
Post a Comment