Friday, 28 February 2020

मोरारजी देसाई

मोरारजी रणछोडजी देसाई हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक कार्यकर्ते होते. ते १९७७ ते १९७९ दरम्यान जनता पार्टीने तयार केलेल्या सरकारमध्ये भारताचे ४थे पंतप्रधान बनले. राजकारणाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री, भारताचे गृहमंत्री व अर्थमंत्री आणि भारताचे दुसरे उपपंतप्रधान अशी अनेक महत्वाची पदे भूषविली.पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे निधन झाल्यानंतर देसाई हे १९६६ मध्ये पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार होते. १९६९ पयर्ंत इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात त्यांची उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली. १९६९ च्या काँग्रेसच्या फाळणीच्या वेळी त्यांनी राजीनामा दिला आणि भारतीय राष्ट्रीय कांग्रेस (संगटन)(कांग्रेस)(ओ) मध्ये सामील झाले.

वाढवा आपले सामान्य ज्ञान

वाढवा सामान्य ज्ञान
उत्तर : १) फ्रॉइड २) रसायनशास्त्र ३) राष्ट्रपती शासन पद्धती  ४) दादाभाई नौरोजी ५) कॅल्शियम काबरेनेट
१) सायको अँनालिसीस मांडणारा संशोधक कोण?
२) रासायनिक द्रव्यांचा अभ्यास करणारं शास्त्र कोणतं?
३) माली या देशामध्ये कोणती शासन पद्धती अस्तित्वात आहे?
४) ब्रिटिश संसदेत निवड झालेले पहिले भारतीय कोण?
५) खडूचं रासायनिक नाव काय?

Thursday, 27 February 2020

उद्योगपती लक्ष्मी मित्तल

स्टील किंग लक्ष्मीनिवास मित्तल हे ब्रिटनमधील सर्वात धनाढय़ आणि सार्मथ्यशाली आशियाई व्यक्ती ठरले आहेत. मित्तल हे १५.५ अब्ज पाऊंड (सुमारे १२५४ अब्ज रुपये) संपत्तीचे मालक आहेत. 'ईस्टन आय' या साप्ताहिक वृत्तपत्राने आशियातील १0१ टॉप शक्तिशाली उद्योगपतींची यादी प्रकाशित केली आहे. जगातील अग्रगण्य इस्पात कंपनी आर्सेलर मित्तलचे सीईओ आणि अनिवासी भारतीय (६१) यांना ब्रिटनमधील सर्वांत धनाढय़ आशियाई उद्योगपती म्हणून यादीत उल्लेख करण्यात आला आहे. यादीनुसार मित्तल यांच्याकडे दौलत, प्रतिष्ठा आणि ताकद या सर्वकाही गोष्टी आहेत. केसिंग्जटन पॅलेस गार्डनमध्ये त्यांची मालमत्ता आहे.

Wednesday, 26 February 2020

मराठी साहित्यात अमूल्य योगदान देणारे कुसुमाग्रज

मराठी साहित्यात अमूल्य योगदान देऊन चार दशकांपेक्षा जास्त काळ प्रभाव गाजविणारे प्रतिभावंत कवी, लेखक, नाटककार, लघुनिबंधकार, कादंबरीकार, समीक्षक, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर हे होत. कलात्मक लिखाण करून त्यांनी मराठी साहित्यात विशेष ठसा उमटवला. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. मराठीची दैन्यावस्था पाहून आपल्या माय मराठीत सकस आणि दमदार अशी साहित्य निर्मिती करून त्यांनी मराठी भाषेला एक वेगळेच वैभव प्राप्त करून दिले.या युगातही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या १0 भाषात स्थान पटकवणारी मराठी. या मराठीला कुसुमाग्रजांनी आपल्या स्वप्रतिभेच्या बळावर उत्तुंग शिखरावर नेऊन पोहचवले म्हणूनच त्यांचा जन्म दिन २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १९0६ रोजी सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'सिताराम तिवारी' व आईचे नाव 'जगरानी देवी' असे होते. त्यांचे पूर्वज कानपूरजवळच्या बादरका गावात राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसर्‍या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले.

वाढवा आपले सामान्य ज्ञान

वाढवा सामान्य ज्ञान
उत्तर : १) फ्रॉइड २) रसायनशास्त्र ३) राष्ट्रपती शासन पद्धती  ४) दादाभाई नौरोजी ५) कॅल्शियम काबरेनेट
१) सायको अँनालिसीस मांडणारा संशोधक कोण?
२) रासायनिक द्रव्यांचा अभ्यास करणारं शास्त्र कोणतं?
३) माली या देशामध्ये कोणती शासन पद्धती अस्तित्वात आहे?
४) ब्रिटिश संसदेत निवड झालेले पहिले भारतीय कोण?
५) खडूचं रासायनिक नाव काय?

पाण्याखालून धावणारी भारतातील पहिली मेट्रो

देशात सर्वात पहिल्यांदा मेट्रो सेवा सुरु करुन इतिहास रचणारे कोलकाता शहर आता पुन्हा एकदा इतिहास रचणार आहे. कारण, पाण्याखालून धावणारी देशातील पहिली मेट्रोही आता कोलकाता शहरातून धावणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन होणार आहे. तर कोलकात्यात पहिली मेट्रो सेवा 1984 मध्ये  सुरु झाली होती. त्याची घौडदौड आज एकविसाव्या शतकातही सुरुच आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल बुधवारी कोलकाता ईस्ट-वेस्ट मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.