Saturday, 6 October 2018
डॉ. मोहन आगाशे यांना विष्णुदास भावे पुरस्कार
ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना रंगभूमीवरील योगदानासाठी मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या रंगभूमीदिनी ५ नोव्हेंबर २0१८ रोजी सांगलीत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. अखिल भारतीय नाट्य विद्यामंदीर समिती, सांगलीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी पत्रकार बैठकीत आज घोषणा केली. यावेळी डॉ. भास्कर ताम्हणकर उपस्थित होते. गौरव पदक आणि २५ हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment