Wednesday, 11 October 2023

काही परिचित इंग्रजी शब्द

 basket ( बास्किट) - टोपली.

 on the terrace (टेरेस ) — गच्चीवर. 

cupboard ( कबर्ड) — कपाट. 

banyan trees ( बन्यन्‌ ट्रीझ) - वडाची झाडे. behind ( बिहाइण्ड्‌ ) --च्या मागे. 

dictionary ( डिक्शनरि ) - शब्दकोश. 

ring (रिंग) - अंगठी. 

on his finger - (फिंगर)- त्याच्या बोटात. 

pot ( पॉट्‌ ) - भांडे. 

fridge ( फ्रिज ) - शीतकपाट, फ्रिज. 

oil ( ऑइल्‌ ) - तेल. 

 tin ( टिन) - डबा. 

stranger (स्ट्रॅंजर) -परका इसम, नवखा इसम. 

at the door — दाराशी. 

upper ( अप्पर ) - वरचा. 

drawer ( ड्रॉअर्‌) - खण. कप्पा

in the upper drawer — वरच्ण खणात. 

coin ( कॉइन्‌ ) -नाणे. 

stream ( स्ट्रीम) - ओढा. 

near the village -खेड्याजवळ. गावाजवळ

honey ( हनी ) - मध. 

bottle ( बॉटल ) — बाटली. 

stable ( स्टेबल्‌ ) - तबेला. 

workshop ( वर्कशॉपू ) - कारखाना. 

tent (टेण्ट्‌ ) -तंबू. 

field ( फील्ड ) - शेत. 

Peg ( पेग्‌ ) - खुंटी. 

hexagon ( हेक्‍सॅगॉन्‌ ) - षट्कोन 

ant (अँण्ट्‌ ) -मुंगी. 

ant ( अँण्ट्‌ हिल्‌ ) - वारूळ. 

video - व्हिडिओ. 

frinds( फ्रेण्ड्स हाउस) - मित्राचे घर. 

ornament ( ऑर्नमेण्ट) - दागिना. 

gold ornament (गोल्ड ऑर्नमेण्ट्स्‌ ) - सोन्याचे दागिने. 


Saturday, 13 May 2023

चालू घडामोडी 13 मे 2023

1. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलाच्या हेरिटेज सेंटरचे उद्घाटन कोठे केले आहे?

 (a) दिल्ली (b) मुंबई (c) कोलकाता (d) चंदीगड

2. IPL च्या इतिहासात 7,000 धावा करणारा पहिला क्रिकेटर कोण आहे?

 (A) विराट कोहली (B) डेव्हिड वॉर्नर (C) शिखर धवन (D) रोहित शर्मा

3. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी कोणत्या शहरात पंतप्रधान जनऔषधी केंद्राचे उद्घाटन केले?

 (A) लखनौ (B) भोपाळ (C) पाटणा (D) सिकंदराबाद

4.  ड्वेन ब्राव्होसह आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण बनला आहे?

 (A) रवींद्र जडेजा (B) सुनील नरेन (C) पियुष चावला (D) युझवेंद्र चहल

५.  पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने राष्ट्रीय विक्रम केला आहे?

 (A) मुरली श्रीशंकर (B) नयना जेम्स (C) प्रवीण चित्रवेल (D) शैली सिंग

उत्तर- 1. D 2. A 3. D 4. D 5. C

Thursday, 11 May 2023

व्हेलची उलटी हिऱ्यापेक्षा मौल्यवान

व्हेल प्रजातीचे अनेक मासे समुद्रात आढळत असले तरीही ‘स्पर्म’ व्हेलच्या उलटीला परफ्युम उद्योगात अतिशय महत्त्व असून तिला भरमसाठ दर मिळून कोट्यवधीची कमाई मिळते. परफ्युमचा वास दीर्घकाळ दरवळत राहण्यासाठी नैसर्गिक तत्त्व म्हणून ती वापरतात. त्याचा आरोग्यावर विघातक परिणाम होत नसल्याने या उलटीचा वापर केलेल्या अत्तरांना दर अधिक मिळतो. यामुळे जिथे व्हेल मासा दिसतो, तिथे मच्छीमारांची नजर या उलटीवर असते. मत्स्यक्षेत्रातील अभ्यासकांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतात इतर किनारपट्टीप्रमाणे कोकण किनारपट्टीवर काही काळापासून व्हेल मासा आढळत आहे. व्हेल माशामध्ये दात नसलेले आणि दात असलेले अशा दोन प्रकारच्या प्रजाती आहेत. उलटी उपयुक्त असलेला ‘स्पर्म व्हेल’ हा दात असलेल्या प्रजातीतील आहे. साधारणत: व्हेल हा समुद्र किनार्‍यापासून खूप दूर असतो. उलटीसारखा हा भाग किनार्‍यावर येण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागतो. याचे वजन 50 किलोपर्यंत असते असे अभ्यासकांचे मत आहे. स्पर्म व्हेलच्या उलटी ओळखण्यासाठी काही प्राथमिक गोष्टी सांगितल्या जातात. उलटीतील न पचलेल्या भागात म्हाकुळच्या दातासारखे किंवा कडक कवचासारखे भाग आढळतात. गरम सुई उलटीच्या गोळ्यात खुपसली तर तो वितळतो आणि त्यातून काळा धूर येतो. त्याचा रंग काळपट असतो. तसेच काहीवेळा जहाजाचं तेल किंवा त्यातील बाहेर टाकलेले घटकांचा गोळाही तयार होतो. तो मेणासारखा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही उलटी उपयुक्त आहे की नाही याची चाचणी विशिष्ट ठिकाणीच करता येते. स्पर्म व्हेल संरक्षित घटक खोल समुद्रात सापडणारा ‘स्पर्म’ व्हेल हा संरक्षित घटक आहे. हा मासा सीआयटीइएस (Convention on International Trade in Endangered Species of Wild Fauna and Flora) यामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे स्पर्म व्हेलची शिकार किंवा त्यांच्याशी निगडीत कोणत्याही घटकाची विक्री करण्यास बंदी आहे.  व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अ‍ॅम्बरग्रीस (उलटी) हे अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीनें विकले जाते. त्यात अ‍ॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अ‍ॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. अत्तरात उलटीचा वापर हा फिक्सेटीव्ह (स्थिरीकरण द्रव्य) म्हणून वापरतात. सेंट कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकावे यासाठी हे फिक्सेटीव्ह उपयुक्त असते. यासाठी काही केमिकल्स आहेत; परंतु त्याचा शरीरावर परिणाम होतो. उलटी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे त्याला मागणी अधिक आहे. सेंटबरोबरच औषधातही वापर होतो. शरीरातील अपचन झालेले पदार्थ बाहेर टाकले जातात. वैज्ञानिक भाषेत याला अ‍ॅम्बरग्रीस असे म्हटले जाते. स्पर्म व्हेलच्या शरीरातून निघणारा हा पदार्थ काळ्या रंगाचा असून हा ज्वलनशील पदार्थ मानला जातो. व्हेलचे आवडतं खाद्य म्हणजे, म्हाकुळ होय. म्हाकुळचा तोंडाचा भाग पोपटाच्या चोचीसारखा असतो. तो पचत नाही. तसेच व्हेल कोळंबी खातो. ज्याचा भाग कडक असल्यामुळे तो पचत नाही. न पचलेला भाग व्हेल उलटून टाकतो. त्यात विविध प्रकारची रसायनेही असतात. उलटी लाटांवर तरगंत राहिल्यामुळे आपसूक त्यावर प्रक्रिया होते आणि ती मेणासारखी बनते. समुद्राच्या लाटाबरोबर ती तरंगत किनार्‍याला लागते. या उलटीची तस्करी केली जात आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Saturday, 18 February 2023

महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली?

 प्रश्न 1: महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली?

उत्तर- महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांनी 18 फेब्रुवारी 2023 रोजी शपथ घेतली. 

प्रश्न 2: जीएसटी परिषदेने राज्यांना किती रुपयांची थकीत नुकसानभरपाई देण्यास मान्यता दिली? 

उत्तर- राज्यांना केंद्र सरकारकडून देण्यात येणारी जून 2022 पर्यंतची थकीत नुकसानभरपाई 16 हजार 982 कोटी  रुपये देण्यास मान्यता दिली.

प्रश्न 3: द्राक्ष उन्हाळ्यातील सर्वश्रेष्ठ फळ मानले जाते.

उत्तर- द्राक्ष खाल्ल्यामुळे शरीरात गारवा व शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी चांगली मदत होते. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी द्राक्ष फायदेशीर आहेत. म्हणून द्राक्ष उन्हाळ्यातील सर्वश्रेष्ठ फळ मानले जाते.

प्रश्न 4: द्राक्षदिन कोनात्यादिवशी मानण्यात येतो? 

उत्तर- महाशिवरात्री दिवशी 2023 पासून द्राक्षदिन साजरा करण्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी ठरवले आहे. 

प्रश्न 5: हुतात्मा उद्योग समूहाच्यावतीने देण्यात येणारा अरुण नायकवडी स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर- हुतात्मा उद्योग समूहाच्यावतीने देण्यात येणारा अरुण नायकवडी स्मृती पुरस्कार बीजमाता राहीबाई पोपरे यांना जाहीर झाला आहे?

प्रश्न 7: कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी किती चित्ते दाखल झाले आहेत?

उत्तर- दक्षिण आफ्रिकेतून आणखी बारा चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात दाखल झाले आहेत. आता एकूण वीस चित्ते भारतात आहेत. 

प्रश्न 8: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने कोणत्या महिला क्रिकेट खेळाडूला आपल्या संघाचा कर्णधार केले आहे?

उत्तर-भारतीय क्रिकेट संघाची सलामीची आक्रमक फलंदाज स्मृती मानधना हिला महिलांच्या आयपीएल स्पर्धमधील संघ असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने (आरसीबी) कर्णधारपदावर नियुक्‍त केले आहे. महिलांच्या आयपीएलचे हे पहिलेच वर्ष आहे. स्मृतीला बंगळूरच्या संघाने ३.४० कोटी रुपये खर्च करून, आपल्या संघात घेतले आहे. त्यामुळे ती महिलांच्या आयपीएलमधील सर्वांत महागडी खेळाडू ठरली आहे. 

प्रश्न 9: नाशिकमध्ये किती उंचीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे?

उत्तर-  नाशिकमधील अशोकस्तंभ चौक परिसरात ६१ फूट उंच, २२ फूट रुंदीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे.  

प्रश्न 10: अमूल या १९४६ साली स्थापन झालेल्या देशातील पहिल्या दूध सहकारी संस्थेची सत्ता हस्तगत करण्यात कोणत्या पक्षाला यश आले आहे? 

उत्तर- अमूल या १९४६ साली स्थापन झालेल्या देशातील पहिल्या दूध सहकारी संस्थेची सत्ता हस्तगत करण्यात भाजपला यश आले आहे. अमूलच्या संचालक मंडळात ११ पैकी नऊ संचालक काँग्रेसचे होते. |त्यापैकी सात जणांनी वेगवेगळ्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसने ' अमूल' ची सत्ता गमावली ' आहे. गुजरातमध्ये १८ दूध सहकारी संस्था आहेत. त्यापैकी केवळ अमूलमध्ये आता काँग्रेसचे दोन  सदस्य उरले आहेत. 




बँकांवरील सायबर हल्ले रोखण्यासाठी कोणत्या त्रिसूत्रीचा वापर महत्त्वाचा आहे?

 प्रश्न 1: बँकांवरील सायबर हल्ले रोखण्यासाठी कोणत्या त्रिसूत्रीचा वापर महत्त्वाचा आहे? 

उत्तर- डिटेक्शन (शोध) , प्रिव्हेन्शन (प्रतिबंध) आणि प्रोटेक्शन (सुरक्षा) या त्रिसूत्रीचा वापर केल्यास बँकांवर होणारे सायबर हल्ले रोखता येतील. कोरोनाकाळात कॅशलेस व्यवहार वाढले आहेत. अनेकांनी टेक्नॉंलॉजी स्वीकारली आहे. सहकार, बँका अशा विविध क्षेत्रांत टेक्नॉंलॉजीचा वापर वाढला आहे. ही एक डिजिटल क्रांतीच आहे. डिजिटल बँकिंग काळाची गरज आहे. पण, टेक्नॉलोंजी हाताळताना चुका झाल्यास सायबर क्राइम होऊ शकते. काही क्षणात कोट्यवधी रुपये काढल्याच्या घटना घडल्या आहेत. असे सायबर हल्ले देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहेत. ते टाळण्यासाठी सायबर सुरक्षेवर भर द्यायला हवा. टेक्नॉलॉजी हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षेबाबत प्रशिक्षण द्यायला हवे. काही बँका स्वतः टेक्नॉंलॉजी विकसित करून वापरतात. पण, काही बँका बाहेरची यंत्रणा वापरतात. ती वापरताना आंतरिक सुरक्षेचा विचार करायला हवा. त्यासाठी डिटेक्शन (शोध), प्रिव्हेन्शन (प्रतिबंध) आणि प्रोटेक्शन (सुरक्षा) या त्रिसूत्रीचा वापर करायला  हवा. रिझर्व्ह बँकेकडून सायबर सुरक्षेबाबत सर्व बँकांना माहिती दिली जात आहे. मात्र, सायबर सुरक्षेबाबत काळजी घेतली जात नाही. शिवाय, टेक्नॉंलॉजी हाताळण्याची पुरेशी माहिती नसल्याने बँका सायबर अटॅकला बळी पडतात. असा सायबर अटॅक ओळखता आला पाहिजे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. टेक्नॉलॉजी वापरताना सुरक्षेचे ज्ञान घेतल्यास सायबर हल्ले टाळता येतील.

शस्त्रकलेच्या प्रशिक्षणातून वारसा जतन

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन शस्त्रकलेचा वसा पवन माळवे जपत आहेत. या कामात त्यांची पत्नी कोमल याचाही सहभाग असतो. नाशिकमधील सिडकोतील छत्रपती संभाजी स्टेडिअममध्ये दोघे विद्यार्थांना शस्त्रकलेचे प्रशिक्षण देतात. काही दशकांपूर्वी मर्दानी खेळाच्या रूपाने ही कला पाहायला मिळत होती. मात्र अलीकडे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पवन यांनी प्रशिक्षण वर्ग सुरू केले. या वर्गात तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी आदींचे प्रशिक्षण दिले जाते. सहा ते चाळीस वर्षे वयोगटातील महिला, पुरुष सहभागी होतात. दररोज सकाळी ७ते ८ या वेळेत हे प्रशिक्षण चालते. प्रशिक्षणात युद्धकला, शस्त्र याचा इतिहास, शस्त्र वापरायचे तंत्र , ते कोणत्या धातूनी बनवले जाते आदींची माहिती दिली जाते. 

प्रशिक्षणात सर्वप्रथम सर्व शास्त्रांचे मूळ असणाऱ्या काठीचे प्रशिक्षण दिले जाते. काठीमध्ये पारंगत झाल्यावर प्रशिक्षणार्थींना धार नसलेल्या तलवारी, दांडपट्टा , काठी बंदिश, रुमाल बंदिश आदी शिकवले जाते. जाते. पुण्याचे 'फाईट मास्टर' नितीन शेलार यांच्याकडून पवन यांनी दहा वर्षांपूर्वी युद्धकलेचे प्रशिक्षण घेतले. तेव्हापासून आजपर्यत तेविद्यार्थांना ही कला शिकवतात. राष्ट्रवीर संघ युद्धकला प्रशिक्षण व संस्कृती संवर्धन ही त्यांची संस्था आहे. कोमल या मुली आणि महिलांना प्रशिक्षण देतात. सात ते पन्नास वर्षे वयोगटातील चाळीस जण त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतात. पवन हा पर्यटन विभागाचा अधिकृत गाइड आहे. पर्यटकांना नाशिकमधील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, लेणी दाखवतात. 'ट्रेकिंग ग्रुपला गड-किल्ल्यांचा इतिहास सांगून किल्ला कसा बघावा हे ते सांगतात. त्यांनी मोडी लिपीचे पायाभूत शिक्षण घेतले. 


तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात AI, सायबर सुरक्षेत भरपूर संधी

क्लाउड कॉम्प्युटिंग हा सर्वात लोकप्रिय आणि मागणी करणारा कोर्स आहे.  संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीचे विद्यार्थी या क्षेत्रात सहज करिअर करू शकतात. एक्सपर्ट सॉफ्टवेअर आर्किटेक्ट इत्यादी पदावर काम करू शकतात.

सायबर सुरक्षा
सायबर सिक्युरिटी किंवा सायबर सेफ्टी हा एक प्रकारचा सुरक्षितता आहे जो इंटरनेट कनेक्टेड सिस्टमसाठी सुरक्षा आहे. यासह हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा डेटा सुरक्षित ठेवला जातो जेणेकरून डेटा चोरीला जाऊ नये.  यासाठी संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये बी.टेक.  तुम्ही फॉरेन्सिकमध्ये स्पेशलायझेशन करू शकता.

नॅनो तंत्रज्ञान
हे एक अतिशय मनोरंजक क्षेत्र आहे.  हे असे एक उपयोजित विज्ञान आहे ज्यामध्ये 100 नॅनोमीटरपेक्षा लहान कणांवर संशोधन केले जाऊ शकते. विशेष बाब म्हणजे हा कोर्स केल्यानंतर उत्पादन विकास (प्रोडक्ट डेवलपमेंट), अनुवांशिक (जेनेटिक), कृषी तंत्रज्ञान (एग्रीकल्चर टेक्नोलॉजी), फॉरेन्सिक सायन्स, आरोग्य उद्योग (हेल्थ इंडस्ट्री) इत्यादी क्षेत्रात नोकरीच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजेंस)
यामध्ये अशी मशीन्स तयार करावी लागतात जी माणसांप्रमाणे काम करतात. विशेष बाब म्हणजे ही यंत्रे उच्चार ओळखणे (स्पीच रिकॉग्निशन), शिकणे (लर्निंग ) आणि समस्या सोडवणे (प्रॉब्लम सॉल्विंग) यासारख्या गोष्टीही करतात. त्यासाठी गणित (मॅथेमेटिक्स), मानसशास्त्र (सायकोलॉजी) आणि भौतिकशास्त्र (फिजिक्स) किंवा जीवशास्त्र (बायोलॉजी) या विषयांचे बारकावे जाणून घ्यावे लागतील.  प्रोग्रामिंग भाषा देखील शिकणे आवश्यक आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल लोक डॉक्टर, सीए किंवा वकील याशिवाय इतर नोकऱ्यांना प्राधान्य देतात, जे सर्जनशील असण्यासोबतच भरपूर कमाई देखील करतात. तंत्रज्ञानाचे क्षेत्र या बाबतीत प्रसिद्ध तसेच आकर्षक आहे. यामध्ये करिअर आणि पैसा दोन्हीही भरपूर आहे. सॉफ्टवेअर आर्किटेक्ट व्यतिरिक्त अॅनालिटिक्स मॅनेजर, डेटा सायंटिस्ट, क्वालिटी मॅनेजर, कॉम्प्युटर हार्डवेअर इंजिनीअर, सिक्युरिटी अॅनालिसिस, प्रोजेक्ट मॅनेजर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इत्यादी अनेक पदांवर काम करण्याची संधी आहे.