हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन शस्त्रकलेचा वसा पवन माळवे जपत आहेत. या कामात त्यांची पत्नी कोमल याचाही सहभाग असतो. नाशिकमधील सिडकोतील छत्रपती संभाजी स्टेडिअममध्ये दोघे विद्यार्थांना शस्त्रकलेचे प्रशिक्षण देतात. काही दशकांपूर्वी मर्दानी खेळाच्या रूपाने ही कला पाहायला मिळत होती. मात्र अलीकडे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पवन यांनी प्रशिक्षण वर्ग सुरू केले. या वर्गात तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी आदींचे प्रशिक्षण दिले जाते. सहा ते चाळीस वर्षे वयोगटातील महिला, पुरुष सहभागी होतात. दररोज सकाळी ७ते ८ या वेळेत हे प्रशिक्षण चालते. प्रशिक्षणात युद्धकला, शस्त्र याचा इतिहास, शस्त्र वापरायचे तंत्र , ते कोणत्या धातूनी बनवले जाते आदींची माहिती दिली जाते.
प्रशिक्षणात सर्वप्रथम सर्व शास्त्रांचे मूळ असणाऱ्या काठीचे प्रशिक्षण दिले जाते. काठीमध्ये पारंगत झाल्यावर प्रशिक्षणार्थींना धार नसलेल्या तलवारी, दांडपट्टा , काठी बंदिश, रुमाल बंदिश आदी शिकवले जाते. जाते. पुण्याचे 'फाईट मास्टर' नितीन शेलार यांच्याकडून पवन यांनी दहा वर्षांपूर्वी युद्धकलेचे प्रशिक्षण घेतले. तेव्हापासून आजपर्यत तेविद्यार्थांना ही कला शिकवतात. राष्ट्रवीर संघ युद्धकला प्रशिक्षण व संस्कृती संवर्धन ही त्यांची संस्था आहे. कोमल या मुली आणि महिलांना प्रशिक्षण देतात. सात ते पन्नास वर्षे वयोगटातील चाळीस जण त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतात. पवन हा पर्यटन विभागाचा अधिकृत गाइड आहे. पर्यटकांना नाशिकमधील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, लेणी दाखवतात. 'ट्रेकिंग ग्रुपला गड-किल्ल्यांचा इतिहास सांगून किल्ला कसा बघावा हे ते सांगतात. त्यांनी मोडी लिपीचे पायाभूत शिक्षण घेतले.
No comments:
Post a Comment