प्रश्न 1: बँकांवरील सायबर हल्ले रोखण्यासाठी कोणत्या त्रिसूत्रीचा वापर महत्त्वाचा आहे?
उत्तर- डिटेक्शन (शोध) , प्रिव्हेन्शन (प्रतिबंध) आणि प्रोटेक्शन (सुरक्षा) या त्रिसूत्रीचा वापर केल्यास बँकांवर होणारे सायबर हल्ले रोखता येतील. कोरोनाकाळात कॅशलेस व्यवहार वाढले आहेत. अनेकांनी टेक्नॉंलॉजी स्वीकारली आहे. सहकार, बँका अशा विविध क्षेत्रांत टेक्नॉंलॉजीचा वापर वाढला आहे. ही एक डिजिटल क्रांतीच आहे. डिजिटल बँकिंग काळाची गरज आहे. पण, टेक्नॉलोंजी हाताळताना चुका झाल्यास सायबर क्राइम होऊ शकते. काही क्षणात कोट्यवधी रुपये काढल्याच्या घटना घडल्या आहेत. असे सायबर हल्ले देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहेत. ते टाळण्यासाठी सायबर सुरक्षेवर भर द्यायला हवा. टेक्नॉलॉजी हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षेबाबत प्रशिक्षण द्यायला हवे. काही बँका स्वतः टेक्नॉंलॉजी विकसित करून वापरतात. पण, काही बँका बाहेरची यंत्रणा वापरतात. ती वापरताना आंतरिक सुरक्षेचा विचार करायला हवा. त्यासाठी डिटेक्शन (शोध), प्रिव्हेन्शन (प्रतिबंध) आणि प्रोटेक्शन (सुरक्षा) या त्रिसूत्रीचा वापर करायला हवा. रिझर्व्ह बँकेकडून सायबर सुरक्षेबाबत सर्व बँकांना माहिती दिली जात आहे. मात्र, सायबर सुरक्षेबाबत काळजी घेतली जात नाही. शिवाय, टेक्नॉंलॉजी हाताळण्याची पुरेशी माहिती नसल्याने बँका सायबर अटॅकला बळी पडतात. असा सायबर अटॅक ओळखता आला पाहिजे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. टेक्नॉलॉजी वापरताना सुरक्षेचे ज्ञान घेतल्यास सायबर हल्ले टाळता येतील.
No comments:
Post a Comment