राज्यभरात डेंग्यू, हिवताप, चिकुनगुनियासह इतर कीटकजन्य आजारांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. मागील तीन वर्षांमध्ये डेंग्यूमुळे राज्यभरात १६४ रुग्णांचा, तर हिवतापाने ५९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे.
हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, हत्तीरोग, ए.ई.एस., जे.ई., चंडिपुरा, काला आजार, प्लेग आदी कीटकजन्य आजार आहेत. चंडिपुरा, काला आजार व प्लेग हे तीन आजार सोडल्यास इतर आजारांची राज्यभरात चांगलीच दहशत असल्याचे दिसून येत आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २0१६ या वर्षभरात २३ हजार ९८३ जणांना हिवतापाची लागण झाली, तर २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २0१७ मध्ये १७ हजार ७१0 जणांना लागण, तर २0 जणांचा मृत्यू झाला. २0१८ मध्ये १0 हजार ७५७ जणांना लागण, तर १३ जणांचा मृत्यू झाला. अशा तीन वर्षांत एकूण ५२ हजार ४५0 जणांना लागण तर ५९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद सहसंचालक आरोग्य सेवा पुणे कार्यालयात आहे. हिवतापापेक्षा डेंग्यूची मोठी दहशत आहे. २0१६ मध्ये ६ हजार ७९२ जणांना डेंग्यूची लागण झाली. ३३ रुग्णांचा मृत्यू झाला. २0१७ मध्ये ७ हजार ८२९ जणांना लागण, तर ६५ रुग्णांचा मृत्यू झाला. २0१८ मध्ये ११ हजार ३८ जणांना लागण, तर ६६ रुग्णांचा मृत्यू झाला. तीन वर्षात एकूण २५ हजार ६५९ जणांना लागण, तर १६४ रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. २0१६ मध्ये चिकुनगुनियाची २९४९ जणांना लागण झाली. २0१७ मध्ये १४३८ जणांना, तर २0१८ मध्ये १0२६ जणांना लागण झाली. तीन वर्षांत चिकुन गुनियाची एकूण ५ हजार ४१३ जणांना लागण झाली. मात्र, या आजाराने एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही.
No comments:
Post a Comment