2.जो खूपच सुरक्षित आहे,तो नेहमीच असुरक्षित असतो.
3.आपलं सत्त्व सिद्ध करण्यासाठी सोन्याला अग्निदिव्य करावं लागतं आणि हिऱ्याला घाव सोसावे लागतात.
4.काही करून दाखवायचं असेल तर आपण काय आहोत, यापेक्षा आपण काय करू शकतो हा विचार महत्त्वाचा.
5.आयुष्य सरळ आणि साधंच असतं. ओझं असतं ते गराजांचं.
6.खूप बोलण्यानं समजत नाही ते काही वेळा चूप बसण्याने समजतं.
7. चांगला स्वभाव गणितातल्या शून्यासारखा असतो.ज्याच्यासोबत तो असतो,त्याची किंमत नेहमीच जास्त असते.
8.जेवढे उंच शिखर निवडाल,तेवढे सोबती कमी मिळतील.
9.वैद्याच्या औषधाइतकेच त्यांच्या स्फूर्तिप्रद शब्दांचे डोस रोग्याला उत्तेजित करतात.
10.ताण नाहीसा करण्यासाठी नेहमी योग आणि ध्यानच केले पाहिजे असे नाही.कधी कधी चार शिव्याही ते काम करतात.
11.एखाद्या बाबतीत बोलणी फिसकटली तर व्यवहार फिसकटला समजून प्रेम फिसकटू देऊ नये.
12.जगण्याची इच्छा ही लाकडासारखी असते.कितीही खोल बुडवा ती वर येतेच.
13.रोज पाच तास तुम्ही काहीही वाचा;तुम्ही विद्वान व्हाल.
14.सर्व सुखाचे मूळ कोणते असेल तर ते आरोग्य.
15.अज्ञान हा सर्व अधोगतीचा पाया आहे.
16.मैत्री असली की सर्व ओझी आपलीच वाटतात.
17.स्वप्नं मोफतच असतात.त्यांचा पाठलाग मात्र आयुष्यात बराच खर्चिक ठरू शकतो.
18.यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे.
19.गुरू मार्ग दाखवतो.चालावे मात्र तुम्हालाच लागते.
20.तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते.ज्यांना आवडत नाही त्यांना कसल्याही स्पष्टीकरणाचा उपयोग नसतो.
21.शरीराला श्रमकडे,बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण.
22.शांत डोक्याने निर्णय घेतला की चुकत नाही.भाषा गोड असेल तर माणूस तुटत नाही.
23.नम्रता संपली की मणुसकीही संपते.
24.चांगल्या माणसांचा शोध करावा लागत नाही.तुम्ही चांगले वागलात की तो तुम्हाला शोधत येतात.
25.सतत छोटे छोटे दोष आणि चुका दाखवून देणाऱ्याला तुमची गरज नाही हे ओळखावे.
26.ज्ञान दुसऱ्याला देता येते.पण शहाणपण मात्र देता येत नाही.
27.केवळ चिंता करणे ही सर्वात सोपी आणि निरुपयोगी गोष्ट आहे.
28.कीर्ती म्हणजे सद्गुणांची सावली.
29.विचार न करता वाचन म्हणजे न पचवता खाणं.
30.जगाच्या चिरंतर नाविन्याची जाणीव म्हणजे जीवन.
31.वाचन माणसास पूर्णत्त्वास नेते;संभाषणाने माणूस तत्पर बनतो,आणि लेखन त्यास सुयोग्य बनविते.
32.शिकण्याची इच्छा नसणे ही अज्ञानी असण्यापेक्षा जास्त कमीपणाची गोष्ट होय.
33.जो स्वतः च्या प्रगतीसाठी प्रयत्नांत असतो,त्याला दुसऱ्याचं वाईट करायला वेळच मिळत नाही.
34.एखादी व्यक्ती आपल्याला दुर्लक्ष करू लागली की ओळखावे-त्याच्या दृष्टीने आपली गरज संपली आहे.
35.आनंदात असताना वाचन आणि रागात असताना उत्तर देऊ नये तर दुःखात असताना कोणता निर्णय घेऊ नये.
36. श्वास शरीर आणि विश्वास नातं जिवंत ठेवतो.
37.दुसऱ्यासाठी डोळ्यांत पाणी आलं तर ते कमीपणाचं नव्हे,माणुसकी असल्याचं चिन्ह आहे.
38.एकटे असताना विचारांवर आणि अनेकांत एक असताना बोलण्यावर नियंत्रण असणे चांगले.
No comments:
Post a Comment