1)जगात दुःख आणि दुःख देणारी माणसे पुष्कळ आहेत,म्हणून तुम्ही हसा आणि दुसऱ्यांना हसवा.-चार्ली चॅप्लिन
2) सकाळच्या वेळी तुम्ही झोपाल तर तुम्हाला बरे वाटेल, पण तुमचे यशदेखील कायमचेच झोपेल.-कर्मवीर भाऊराव पाटील
3) ज्यांनी कधी चुका केल्या नसतील त्यांनी कधी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केलाच नसेल.-अल्बर्ट आईसटाईन
4)नेहमी सर्वांच्या सद्गुणांना पाहाल तर सर्वगुणसंपन्न बनाल.-पं. श्रीराम शर्मा
5)समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यांनीच व्यक्तिविकास होतो.-डॉ.बाबासाहेब आंबेडकर
6)इतरांच्या चुकांतून शिका, कारण स्वतः वर प्रयोग करत राहिलात तर अख्ख आयुष्य कमी पडेल.-चाणक्य
7)खोटी प्रशंसा अत्यंत दुःख देणारी असते.-कवी कालिदास
8)प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून फार छान शिकता येते.-महात्मा गांधी
9)सत्यपालन हाच धर्म,बाकीचे सर्व अधर्म.-महात्मा जोतिबा फुले
10)ध्येय जितके महान, तेवढा त्याचा मार्गही लांब व खडतर असतो.-साने गुरुजी
11)माणसाने माणसाला भ्यावे ही शरमेची गोष्ट आहे.-लोकमान्य टिळक
12)जीवन म्हणजे सुखद शय्या नसून एक समरभूमी आहे.-सुभाषचंद्र बोस
13) उदात्त प्रीतिभावना मानवी संबंध जपते, वाढवते.-वि. स.खांडेकर
14) भ्रमाला आलेला प्रत्यक्ष आकार म्हणजे अहंकार.-वामनराव पै
15) यशाचा आनंद घ्या,पण पराभवाने शिकवलेले धडे कधीच विसरू नका.-बिल गेट्स
16)दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाहीत.- संत गाडगेबाबा
17)मोठे काम करण्याचा एकच मार्ग आहे, जे काम करत आहात ते प्रेमाने करा.-डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम
18) अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्दकोशात असतो.-नेपोलियन बोनापार्ट
19) प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे.-पु. ल.देशपांडे
20)सामर्थ्य हे जिंकण्यातून मिळत नसते ते संघर्षातून निर्माण होत असते.-आर्नोल्ड श्वार्झनेगर
21)तुमचा पराभव तेव्हाच होतो, जेव्हा तुम्ही प्रयत्न सोडून देता.-रॉबिन शर्मा
22) चांगल्यातून चांगले निर्माण होते.-रामकृष्ण परमहंस
23) परिश्रम हे जीवनाच्या साफल्याचे रहस्य आहे.-भगवान महावीर
24)माणसाची मैत्री हीच त्याची किंमत ओळखण्याचे सर्वोत्तम परिमाण आहे.-चार्ल्स डार्विन
25) वेळेचा सदुपयोग करणाऱ्याला वेळेचा अभाव जाणवत नाही.-लिओनार्दो दा विंची
26)कोणतीही गोष्ट योग्य रित्या करण्याची इच्छा नसणे ,हे गोष्टीच्या अज्ञानापेक्षा लाजिरवाणे होय.- बेंजामिन फ्रॅंकलिन
27) जे कसलीच अपेक्षा करत नाहीत ते खरे भाग्यवान; कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळी येत नाही.- डेरेक वालकट
28)स्वतःला प्रामाणिक माणूस बनवलं की जगातील एक लबाड माणूस कमी होतो.- थॉमस कार्लाईल
संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे
No comments:
Post a Comment