Wednesday, 11 October 2023

काही परिचित इंग्रजी शब्द

 basket ( बास्किट) - टोपली.

 on the terrace (टेरेस ) — गच्चीवर. 

cupboard ( कबर्ड) — कपाट. 

banyan trees ( बन्यन्‌ ट्रीझ) - वडाची झाडे. behind ( बिहाइण्ड्‌ ) --च्या मागे. 

dictionary ( डिक्शनरि ) - शब्दकोश. 

ring (रिंग) - अंगठी. 

on his finger - (फिंगर)- त्याच्या बोटात. 

pot ( पॉट्‌ ) - भांडे. 

fridge ( फ्रिज ) - शीतकपाट, फ्रिज. 

oil ( ऑइल्‌ ) - तेल. 

 tin ( टिन) - डबा. 

stranger (स्ट्रॅंजर) -परका इसम, नवखा इसम. 

at the door — दाराशी. 

upper ( अप्पर ) - वरचा. 

drawer ( ड्रॉअर्‌) - खण. कप्पा

in the upper drawer — वरच्ण खणात. 

coin ( कॉइन्‌ ) -नाणे. 

stream ( स्ट्रीम) - ओढा. 

near the village -खेड्याजवळ. गावाजवळ

honey ( हनी ) - मध. 

bottle ( बॉटल ) — बाटली. 

stable ( स्टेबल्‌ ) - तबेला. 

workshop ( वर्कशॉपू ) - कारखाना. 

tent (टेण्ट्‌ ) -तंबू. 

field ( फील्ड ) - शेत. 

Peg ( पेग्‌ ) - खुंटी. 

hexagon ( हेक्‍सॅगॉन्‌ ) - षट्कोन 

ant (अँण्ट्‌ ) -मुंगी. 

ant ( अँण्ट्‌ हिल्‌ ) - वारूळ. 

video - व्हिडिओ. 

frinds( फ्रेण्ड्स हाउस) - मित्राचे घर. 

ornament ( ऑर्नमेण्ट) - दागिना. 

gold ornament (गोल्ड ऑर्नमेण्ट्स्‌ ) - सोन्याचे दागिने. 


Saturday, 13 May 2023

चालू घडामोडी 13 मे 2023

1. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलाच्या हेरिटेज सेंटरचे उद्घाटन कोठे केले आहे?

 (a) दिल्ली (b) मुंबई (c) कोलकाता (d) चंदीगड

2. IPL च्या इतिहासात 7,000 धावा करणारा पहिला क्रिकेटर कोण आहे?

 (A) विराट कोहली (B) डेव्हिड वॉर्नर (C) शिखर धवन (D) रोहित शर्मा

3. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी कोणत्या शहरात पंतप्रधान जनऔषधी केंद्राचे उद्घाटन केले?

 (A) लखनौ (B) भोपाळ (C) पाटणा (D) सिकंदराबाद

4.  ड्वेन ब्राव्होसह आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण बनला आहे?

 (A) रवींद्र जडेजा (B) सुनील नरेन (C) पियुष चावला (D) युझवेंद्र चहल

५.  पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने राष्ट्रीय विक्रम केला आहे?

 (A) मुरली श्रीशंकर (B) नयना जेम्स (C) प्रवीण चित्रवेल (D) शैली सिंग

उत्तर- 1. D 2. A 3. D 4. D 5. C

Thursday, 11 May 2023

व्हेलची उलटी हिऱ्यापेक्षा मौल्यवान

व्हेल प्रजातीचे अनेक मासे समुद्रात आढळत असले तरीही ‘स्पर्म’ व्हेलच्या उलटीला परफ्युम उद्योगात अतिशय महत्त्व असून तिला भरमसाठ दर मिळून कोट्यवधीची कमाई मिळते. परफ्युमचा वास दीर्घकाळ दरवळत राहण्यासाठी नैसर्गिक तत्त्व म्हणून ती वापरतात. त्याचा आरोग्यावर विघातक परिणाम होत नसल्याने या उलटीचा वापर केलेल्या अत्तरांना दर अधिक मिळतो. यामुळे जिथे व्हेल मासा दिसतो, तिथे मच्छीमारांची नजर या उलटीवर असते. मत्स्यक्षेत्रातील अभ्यासकांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतात इतर किनारपट्टीप्रमाणे कोकण किनारपट्टीवर काही काळापासून व्हेल मासा आढळत आहे. व्हेल माशामध्ये दात नसलेले आणि दात असलेले अशा दोन प्रकारच्या प्रजाती आहेत. उलटी उपयुक्त असलेला ‘स्पर्म व्हेल’ हा दात असलेल्या प्रजातीतील आहे. साधारणत: व्हेल हा समुद्र किनार्‍यापासून खूप दूर असतो. उलटीसारखा हा भाग किनार्‍यावर येण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागतो. याचे वजन 50 किलोपर्यंत असते असे अभ्यासकांचे मत आहे. स्पर्म व्हेलच्या उलटी ओळखण्यासाठी काही प्राथमिक गोष्टी सांगितल्या जातात. उलटीतील न पचलेल्या भागात म्हाकुळच्या दातासारखे किंवा कडक कवचासारखे भाग आढळतात. गरम सुई उलटीच्या गोळ्यात खुपसली तर तो वितळतो आणि त्यातून काळा धूर येतो. त्याचा रंग काळपट असतो. तसेच काहीवेळा जहाजाचं तेल किंवा त्यातील बाहेर टाकलेले घटकांचा गोळाही तयार होतो. तो मेणासारखा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही उलटी उपयुक्त आहे की नाही याची चाचणी विशिष्ट ठिकाणीच करता येते. स्पर्म व्हेल संरक्षित घटक खोल समुद्रात सापडणारा ‘स्पर्म’ व्हेल हा संरक्षित घटक आहे. हा मासा सीआयटीइएस (Convention on International Trade in Endangered Species of Wild Fauna and Flora) यामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे स्पर्म व्हेलची शिकार किंवा त्यांच्याशी निगडीत कोणत्याही घटकाची विक्री करण्यास बंदी आहे.  व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अ‍ॅम्बरग्रीस (उलटी) हे अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीनें विकले जाते. त्यात अ‍ॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अ‍ॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. अत्तरात उलटीचा वापर हा फिक्सेटीव्ह (स्थिरीकरण द्रव्य) म्हणून वापरतात. सेंट कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकावे यासाठी हे फिक्सेटीव्ह उपयुक्त असते. यासाठी काही केमिकल्स आहेत; परंतु त्याचा शरीरावर परिणाम होतो. उलटी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे त्याला मागणी अधिक आहे. सेंटबरोबरच औषधातही वापर होतो. शरीरातील अपचन झालेले पदार्थ बाहेर टाकले जातात. वैज्ञानिक भाषेत याला अ‍ॅम्बरग्रीस असे म्हटले जाते. स्पर्म व्हेलच्या शरीरातून निघणारा हा पदार्थ काळ्या रंगाचा असून हा ज्वलनशील पदार्थ मानला जातो. व्हेलचे आवडतं खाद्य म्हणजे, म्हाकुळ होय. म्हाकुळचा तोंडाचा भाग पोपटाच्या चोचीसारखा असतो. तो पचत नाही. तसेच व्हेल कोळंबी खातो. ज्याचा भाग कडक असल्यामुळे तो पचत नाही. न पचलेला भाग व्हेल उलटून टाकतो. त्यात विविध प्रकारची रसायनेही असतात. उलटी लाटांवर तरगंत राहिल्यामुळे आपसूक त्यावर प्रक्रिया होते आणि ती मेणासारखी बनते. समुद्राच्या लाटाबरोबर ती तरंगत किनार्‍याला लागते. या उलटीची तस्करी केली जात आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Saturday, 18 February 2023

महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली?

 प्रश्न 1: महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली?

उत्तर- महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांनी 18 फेब्रुवारी 2023 रोजी शपथ घेतली. 

प्रश्न 2: जीएसटी परिषदेने राज्यांना किती रुपयांची थकीत नुकसानभरपाई देण्यास मान्यता दिली? 

उत्तर- राज्यांना केंद्र सरकारकडून देण्यात येणारी जून 2022 पर्यंतची थकीत नुकसानभरपाई 16 हजार 982 कोटी  रुपये देण्यास मान्यता दिली.

प्रश्न 3: द्राक्ष उन्हाळ्यातील सर्वश्रेष्ठ फळ मानले जाते.

उत्तर- द्राक्ष खाल्ल्यामुळे शरीरात गारवा व शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी चांगली मदत होते. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी द्राक्ष फायदेशीर आहेत. म्हणून द्राक्ष उन्हाळ्यातील सर्वश्रेष्ठ फळ मानले जाते.

प्रश्न 4: द्राक्षदिन कोनात्यादिवशी मानण्यात येतो? 

उत्तर- महाशिवरात्री दिवशी 2023 पासून द्राक्षदिन साजरा करण्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी ठरवले आहे. 

प्रश्न 5: हुतात्मा उद्योग समूहाच्यावतीने देण्यात येणारा अरुण नायकवडी स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर- हुतात्मा उद्योग समूहाच्यावतीने देण्यात येणारा अरुण नायकवडी स्मृती पुरस्कार बीजमाता राहीबाई पोपरे यांना जाहीर झाला आहे?

प्रश्न 7: कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी किती चित्ते दाखल झाले आहेत?

उत्तर- दक्षिण आफ्रिकेतून आणखी बारा चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात दाखल झाले आहेत. आता एकूण वीस चित्ते भारतात आहेत. 

प्रश्न 8: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने कोणत्या महिला क्रिकेट खेळाडूला आपल्या संघाचा कर्णधार केले आहे?

उत्तर-भारतीय क्रिकेट संघाची सलामीची आक्रमक फलंदाज स्मृती मानधना हिला महिलांच्या आयपीएल स्पर्धमधील संघ असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने (आरसीबी) कर्णधारपदावर नियुक्‍त केले आहे. महिलांच्या आयपीएलचे हे पहिलेच वर्ष आहे. स्मृतीला बंगळूरच्या संघाने ३.४० कोटी रुपये खर्च करून, आपल्या संघात घेतले आहे. त्यामुळे ती महिलांच्या आयपीएलमधील सर्वांत महागडी खेळाडू ठरली आहे. 

प्रश्न 9: नाशिकमध्ये किती उंचीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे?

उत्तर-  नाशिकमधील अशोकस्तंभ चौक परिसरात ६१ फूट उंच, २२ फूट रुंदीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे.  

प्रश्न 10: अमूल या १९४६ साली स्थापन झालेल्या देशातील पहिल्या दूध सहकारी संस्थेची सत्ता हस्तगत करण्यात कोणत्या पक्षाला यश आले आहे? 

उत्तर- अमूल या १९४६ साली स्थापन झालेल्या देशातील पहिल्या दूध सहकारी संस्थेची सत्ता हस्तगत करण्यात भाजपला यश आले आहे. अमूलच्या संचालक मंडळात ११ पैकी नऊ संचालक काँग्रेसचे होते. |त्यापैकी सात जणांनी वेगवेगळ्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसने ' अमूल' ची सत्ता गमावली ' आहे. गुजरातमध्ये १८ दूध सहकारी संस्था आहेत. त्यापैकी केवळ अमूलमध्ये आता काँग्रेसचे दोन  सदस्य उरले आहेत. 




बँकांवरील सायबर हल्ले रोखण्यासाठी कोणत्या त्रिसूत्रीचा वापर महत्त्वाचा आहे?

 प्रश्न 1: बँकांवरील सायबर हल्ले रोखण्यासाठी कोणत्या त्रिसूत्रीचा वापर महत्त्वाचा आहे? 

उत्तर- डिटेक्शन (शोध) , प्रिव्हेन्शन (प्रतिबंध) आणि प्रोटेक्शन (सुरक्षा) या त्रिसूत्रीचा वापर केल्यास बँकांवर होणारे सायबर हल्ले रोखता येतील. कोरोनाकाळात कॅशलेस व्यवहार वाढले आहेत. अनेकांनी टेक्नॉंलॉजी स्वीकारली आहे. सहकार, बँका अशा विविध क्षेत्रांत टेक्नॉंलॉजीचा वापर वाढला आहे. ही एक डिजिटल क्रांतीच आहे. डिजिटल बँकिंग काळाची गरज आहे. पण, टेक्नॉलोंजी हाताळताना चुका झाल्यास सायबर क्राइम होऊ शकते. काही क्षणात कोट्यवधी रुपये काढल्याच्या घटना घडल्या आहेत. असे सायबर हल्ले देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहेत. ते टाळण्यासाठी सायबर सुरक्षेवर भर द्यायला हवा. टेक्नॉलॉजी हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षेबाबत प्रशिक्षण द्यायला हवे. काही बँका स्वतः टेक्नॉंलॉजी विकसित करून वापरतात. पण, काही बँका बाहेरची यंत्रणा वापरतात. ती वापरताना आंतरिक सुरक्षेचा विचार करायला हवा. त्यासाठी डिटेक्शन (शोध), प्रिव्हेन्शन (प्रतिबंध) आणि प्रोटेक्शन (सुरक्षा) या त्रिसूत्रीचा वापर करायला  हवा. रिझर्व्ह बँकेकडून सायबर सुरक्षेबाबत सर्व बँकांना माहिती दिली जात आहे. मात्र, सायबर सुरक्षेबाबत काळजी घेतली जात नाही. शिवाय, टेक्नॉंलॉजी हाताळण्याची पुरेशी माहिती नसल्याने बँका सायबर अटॅकला बळी पडतात. असा सायबर अटॅक ओळखता आला पाहिजे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. टेक्नॉलॉजी वापरताना सुरक्षेचे ज्ञान घेतल्यास सायबर हल्ले टाळता येतील.

शस्त्रकलेच्या प्रशिक्षणातून वारसा जतन

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन शस्त्रकलेचा वसा पवन माळवे जपत आहेत. या कामात त्यांची पत्नी कोमल याचाही सहभाग असतो. नाशिकमधील सिडकोतील छत्रपती संभाजी स्टेडिअममध्ये दोघे विद्यार्थांना शस्त्रकलेचे प्रशिक्षण देतात. काही दशकांपूर्वी मर्दानी खेळाच्या रूपाने ही कला पाहायला मिळत होती. मात्र अलीकडे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पवन यांनी प्रशिक्षण वर्ग सुरू केले. या वर्गात तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी आदींचे प्रशिक्षण दिले जाते. सहा ते चाळीस वर्षे वयोगटातील महिला, पुरुष सहभागी होतात. दररोज सकाळी ७ते ८ या वेळेत हे प्रशिक्षण चालते. प्रशिक्षणात युद्धकला, शस्त्र याचा इतिहास, शस्त्र वापरायचे तंत्र , ते कोणत्या धातूनी बनवले जाते आदींची माहिती दिली जाते. 

प्रशिक्षणात सर्वप्रथम सर्व शास्त्रांचे मूळ असणाऱ्या काठीचे प्रशिक्षण दिले जाते. काठीमध्ये पारंगत झाल्यावर प्रशिक्षणार्थींना धार नसलेल्या तलवारी, दांडपट्टा , काठी बंदिश, रुमाल बंदिश आदी शिकवले जाते. जाते. पुण्याचे 'फाईट मास्टर' नितीन शेलार यांच्याकडून पवन यांनी दहा वर्षांपूर्वी युद्धकलेचे प्रशिक्षण घेतले. तेव्हापासून आजपर्यत तेविद्यार्थांना ही कला शिकवतात. राष्ट्रवीर संघ युद्धकला प्रशिक्षण व संस्कृती संवर्धन ही त्यांची संस्था आहे. कोमल या मुली आणि महिलांना प्रशिक्षण देतात. सात ते पन्नास वर्षे वयोगटातील चाळीस जण त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतात. पवन हा पर्यटन विभागाचा अधिकृत गाइड आहे. पर्यटकांना नाशिकमधील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, लेणी दाखवतात. 'ट्रेकिंग ग्रुपला गड-किल्ल्यांचा इतिहास सांगून किल्ला कसा बघावा हे ते सांगतात. त्यांनी मोडी लिपीचे पायाभूत शिक्षण घेतले. 


तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात AI, सायबर सुरक्षेत भरपूर संधी

क्लाउड कॉम्प्युटिंग हा सर्वात लोकप्रिय आणि मागणी करणारा कोर्स आहे.  संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीचे विद्यार्थी या क्षेत्रात सहज करिअर करू शकतात. एक्सपर्ट सॉफ्टवेअर आर्किटेक्ट इत्यादी पदावर काम करू शकतात.

सायबर सुरक्षा
सायबर सिक्युरिटी किंवा सायबर सेफ्टी हा एक प्रकारचा सुरक्षितता आहे जो इंटरनेट कनेक्टेड सिस्टमसाठी सुरक्षा आहे. यासह हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा डेटा सुरक्षित ठेवला जातो जेणेकरून डेटा चोरीला जाऊ नये.  यासाठी संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये बी.टेक.  तुम्ही फॉरेन्सिकमध्ये स्पेशलायझेशन करू शकता.

नॅनो तंत्रज्ञान
हे एक अतिशय मनोरंजक क्षेत्र आहे.  हे असे एक उपयोजित विज्ञान आहे ज्यामध्ये 100 नॅनोमीटरपेक्षा लहान कणांवर संशोधन केले जाऊ शकते. विशेष बाब म्हणजे हा कोर्स केल्यानंतर उत्पादन विकास (प्रोडक्ट डेवलपमेंट), अनुवांशिक (जेनेटिक), कृषी तंत्रज्ञान (एग्रीकल्चर टेक्नोलॉजी), फॉरेन्सिक सायन्स, आरोग्य उद्योग (हेल्थ इंडस्ट्री) इत्यादी क्षेत्रात नोकरीच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजेंस)
यामध्ये अशी मशीन्स तयार करावी लागतात जी माणसांप्रमाणे काम करतात. विशेष बाब म्हणजे ही यंत्रे उच्चार ओळखणे (स्पीच रिकॉग्निशन), शिकणे (लर्निंग ) आणि समस्या सोडवणे (प्रॉब्लम सॉल्विंग) यासारख्या गोष्टीही करतात. त्यासाठी गणित (मॅथेमेटिक्स), मानसशास्त्र (सायकोलॉजी) आणि भौतिकशास्त्र (फिजिक्स) किंवा जीवशास्त्र (बायोलॉजी) या विषयांचे बारकावे जाणून घ्यावे लागतील.  प्रोग्रामिंग भाषा देखील शिकणे आवश्यक आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल लोक डॉक्टर, सीए किंवा वकील याशिवाय इतर नोकऱ्यांना प्राधान्य देतात, जे सर्जनशील असण्यासोबतच भरपूर कमाई देखील करतात. तंत्रज्ञानाचे क्षेत्र या बाबतीत प्रसिद्ध तसेच आकर्षक आहे. यामध्ये करिअर आणि पैसा दोन्हीही भरपूर आहे. सॉफ्टवेअर आर्किटेक्ट व्यतिरिक्त अॅनालिटिक्स मॅनेजर, डेटा सायंटिस्ट, क्वालिटी मॅनेजर, कॉम्प्युटर हार्डवेअर इंजिनीअर, सिक्युरिटी अॅनालिसिस, प्रोजेक्ट मॅनेजर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इत्यादी अनेक पदांवर काम करण्याची संधी आहे.

न्यूझीलंडचा नवा कायदा धूम्रपानमुक्त करण्यासाठी

बहुतांश स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडीशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात.  जाणून घ्या, असेच शब्द जे चर्चेत आहेत आणि परीक्षेत विचारले जाऊ शकतात…

वर्ल्ड फर्स्ट टोबैको लॉ
न्यूझीलंड सरकारने नवीन पिढीमध्ये धूम्रपान रोखण्याच्या उद्देशाने आपल्या देशात नवीन तंबाखू कायदा आणला आहे.हा नवा कायदा २०२३ मध्ये लागू होणार आहे.  पुढील पिढीसाठी धूम्रपान बेकायदेशीर ठरवणारा हा जगातील पहिला कायदा आहे.  न्यूझीलंड सरकारने 2025 पर्यंत देशाला धूम्रपानमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कार्बन न्यूट्रल ड्रोन
भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन स्टार्टअप गरुड एरोस्पेसने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावर पहिले कार्बन न्यूट्रल ड्रोन लॉन्च केले आहे.या ड्रोनच्या प्रक्षेपणामुळे भारताचे नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल.  येत्या 15 महिन्यांत 25 हजारांहून अधिक ड्रोन तयार केले जातील जे कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणतील.

गुगल बार्ड
Google ने अलीकडेच ChatGPT शी स्पर्धा करण्यासाठी Google Bard नावाचा एक कृत्रिम बुद्धिमत्ता समर्थित चॅटबॉट लॉन्च केला आहे.Google चा हा बार्ड LaMDA भाषेच्या बोर्डवर आधारित आहे.  गुगलच्या चॅटजीपीटी आणि बार्डमधील मुख्य फरक म्हणजे बार्डमध्ये रिअल टाईममध्ये वेब सर्फ करण्याची क्षमता आहे आणि माणसाप्रमाणे प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.

Friday, 17 February 2023

चालू घडामोडी 2

1. सौदी अरेबियातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे, जी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या मोहिमेत सहभागी आहे?

(A) जेसिका मीर (B) रायना बर्नावी (C) नौरा अल मात्रोश (D) जास्मिन मोघबेली

2. अलीकडेच जानेवारी महिन्याचा ICC मेंस प्लेयर ऑफ द मंथ (पुरूष खेळाडूचा मंथ)  पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) शुभमन गिल (B) मोहम्मद सिराज (C) डेव्हॉन कॉनवे (D) विराट कोहली

3. अलीकडेच सायप्रसचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?
(a) डेमेट्रिस सिलोरिस (b) अॅनिता डेमेट्रिओ (c) अदामोस अदामौ (d) निकोस क्रिस्टोडॉलिड्स

4. '‘स्वस्थ मन, स्वस्थ घर’ हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे?
(A) आयुष मंत्रालय (B) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (C) शिक्षण मंत्रालय (D) गृह मंत्रालय

उत्तर- 1(b) 2(a) 3(d) 4(d)

एकाच वेळी प्रदर्शित झालेल्या 'लगान' आणि 'गदर' या आयकॉनिक चित्रपटांमध्ये बाजी मारली कोणी?

15 जून 2001 रोजी गदर रिलीज झाला.  पण तुम्हाला माहीत आहे का, या दिवशी आणखी एक मोठा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकला होता. तो म्हणजे आमिर खानचा 'लगान' चित्रपट.  बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक चित्रपट आले आहेत ज्यांनी इतिहास रचला आहे. त्यापैकीच एक सनी देओलचा 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट होता. यामध्ये सनीसोबत अभिनेत्री अमिषा पटेल मुख्य भूमिकेत होती.  आता या सिनेमाचा सिक्वेल 'गदर 2' बनवला जात आहे. सनी आणि अमिषा पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. 15 जून 2001 रोजी प्रदर्शित झालेल्या गदर चित्रपटासोबत अमिरखानचा 'लगान'देखील प्रदर्शित झाला होता. आशुतोष गोवारीकर यांचा 'लगान' हा स्पोर्ट्स ड्रामा होता.  या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते.  पण आता प्रश्न असा आहे की त्या काळात या दोन चित्रपटांपैकी कोणत्या चित्रपटाने बाजी मारली होती.

वास्तविक हे दोन्हीही चित्रपट 2001 मध्ये सुपरहिट ठरले होते. दोघांनाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.  'गदर' 19 कोटींच्या बजेटमध्ये तर 'लगान' 25 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. दोन्ही चित्रपट अभूतपूर्व होते, पण एका गोष्टीबाबतीत 'लगान' सनीच्या 'गदर' चित्रपटापेक्षा मागे राहिला. ते म्हणजे बॉक्स ऑफिस कलेक्शन.  1994 च्या 'हम आपके है कौन' नंतर अनिल शर्माच्या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम केला. अहवालांनुसार  'लगान'चे एकूण कलेक्शन 65.97 कोटी इतके आहे.  तर 'गदर'चे कलेक्शन 133 कोटी इतके आहे. गदर त्या वर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. दुसरीकडे, आमिर खानचा चित्रपट पुरस्कारांच्या बाबतीत मात्र गदरपेक्षा सरस ठरला. लगानला 49 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आठ श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले.  याशिवाय 'बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म' या श्रेणीत अकादमी पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते.

Thursday, 16 February 2023

ओएनजीसी फाउंडेशनकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत


ONGC फाउंडेशनने ONGC मेरिट स्कॉलरशिप 2023 साठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ongcscholar.org द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

योग्यता काय आहे
अर्जदार SC, ST, OBC किंवा EWS श्रेणीतील असणे आवश्यक आहे. यातील 50% शिष्यवृत्ती विद्यार्थिनींसाठी राखीव आहेत. या सर्व प्रवर्गातील विद्यार्थी अभियांत्रिकी, एमबीबीएस, एमबीए किंवा जिओफिजिक्स किंवा भूगर्भशास्त्र (जियोलॉजी) या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असले पाहिजेत.
कोणत्या श्रेणीत किती
या शिष्यवृत्तीसाठी निवडलेल्या 2000 विद्यार्थ्यांना दरवर्षी 48,000 रुपये दिले जातील.योजनेअंतर्गत, SC/ST विद्यार्थ्यांना 1000 शिष्यवृत्ती, 500 OBC आणि 500 ​​EWS श्रेणीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल.  अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 मार्च 2023 आहे.
आवश्यक कागदपत्रे
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, 10वी आणि 12वीचे मार्कशीट, उत्पन्नाचा दाखला, बँक तपशील यासारखी आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील.  तपशीलवार माहितीसाठी अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.

नॉलेज कोपरा 1

१) मातीच्या भांड्यात पाणी थंड का राहते?

उत्तरः जेव्हा द्रवाचे तापमान वाढते तेव्हा वाफ तयार होते. वाफेबरोबरच द्रवाची उष्णताही निघून जाते. यामुळे द्रवाचे तापमान कमी राहते. मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी बाहेरच्या उष्णतेमध्ये बाष्पीभवन होऊन त्या भांड्याला असलेल्या असंख्य छिद्रांच्या साहाय्याने बाहेर पडते आणि आतील पाणी थंड ठेवते. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता जास्त असल्याने बाष्पीभवनाची ही प्रक्रिया मंदावते, त्यामुळे पावसाळ्यात हा परिणाम दिसून येत नाही.


२) प्रौढांपेक्षा लहान मुलांची हाडे जास्त का असतात?
उत्तर- मुलांच्या शरीरातील सर्व हाडे मोठी झाल्यावर एकमेकांशी जोडून एक होतात. तुमच्या लक्षात आले असेल की अगदी लहान मुलांच्या डोक्यात मऊ भाग असतो. त्यावेळी डोक्याचे हाड अनेक भागात असते.  नंतर ते एक होते.


३) सिक्स्थ सेन्स म्हणजे काय?
उत्तर- सर्वसाधारणपणे माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांचा विचार केला जातो. दृष्टी, श्रवण, स्पर्श, वास आणि जिभेची चव. सहाव्या इंद्रियांचा (सिक्स्थ सेंस) अर्थ यापेक्षा वेगळा अनुभव. याला अतीन्द्रिय ज्ञान (एक्स्ट्रासेन्सरी पर्सेप्शन) किंवा मानसिक अनुभव म्हणतात.आपण त्याला आंतरिक अनुभव म्हणतो  किंवा अंतर्मन इ. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, परंतु याची अनेक उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ, एखाद्याला स्वप्नात काहीतरी दिसते जे खरे होते.

 
4) अशोक स्तंभ म्हणजे काय?
उत्तर – सम्राट अशोकाने सारनाथमध्ये उभारलेल्या स्तंभाच्या वरच्या भागाला सिंह चतुर्मुख म्हणतात. या मूर्तीमध्ये चार सिंह पाठीला पाठी लावून उभे आहेत. त्याच्या तळाच्या मध्यभागी बांधलेले चार सिंह शक्ती, धैर्य, शौर्य आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. पायथ्याशी असलेले सिंह, हत्ती, घोडा आणि वृषभ हे चारही दिशांचे रक्षक आहेत. पायथ्याच्या मध्यभागी असलेले धर्मचक्र गतिशीलतेचे प्रतीक आहे. भारताच्या राष्ट्रध्वजात मधल्या पांढऱ्या पट्टीतही तो लावलेला आहे. हे गतिशीलतेचे प्रतीक आहे.  खाली लिहिलेले 'सत्यमेव जयते' हे मुंडक उपनिषदातून घेतलेले आहे.

 
5) भारतात ईमेल कधी सुरू झाला?
उत्तर - 15 ऑगस्ट 1995 रोजी भारताच्या विदेशी कम्युनिकेशन कॉर्पोरेशनने देशात इंटरनेट सेवा सुरू केली.  त्यानंतर ई-मेल सेवाही सुरू झाली.

चालू घडामोडी 1

1. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये भारतीय रेल्वेसाठी किती लाख कोटी रुपये भांडवली परिव्यय वाटप करण्यात आला आहे?

(a) 1.90 लाख कोटी (b) 3.00 लाख कोटी (c) 2.00 लाख कोटी (d) 2.40 लाख कोटी
2. संपूर्ण पर्यटन पॅकेज म्हणून देशातील किती पर्यटन स्थळे विकसित केली जातील?
(a) 50 (b) 30  (c) 20 (d) 40
3. MSME साठी क्रेडिट गॅरंटी योजनेचे नूतनीकरण करण्यासाठी बजेटमध्ये किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?
(a) 1000 कोटी (b) 9,000 कोटी  (c) 5000 कोटी
(d) 8000 कोटी
4. दरवर्षी भारतीय तटरक्षक दिन कधी साजरा केला जातो?
(A) 31 जानेवारी (B) 01 फेब्रुवारी  (c) 02 फेब्रुवारी (d) 30 जानेवारी
5. बजेट 2023-24 नुसार, ITR साठी सुधारित सरासरी प्रक्रिया वेळ किती आहे?
(a) 21 दिवस (b) 20 दिवस (c) 18 दिवस (d) 16 दिवस
उत्तर- 1) c  2) a  3)c  4)b  5) a

विक्टोरिया क्राउन्ड


कबूतर या पक्ष्याला सगळेच ओळखतात, परंतु व्हिक्टोरिया क्राउन्ड कबूतर, ज्याला गौरा व्हिक्टोरिया असेही म्हटले जाते त्याबद्दल मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे.  पोत, रंग आणि दिसण्यात ते इतर कबूतरांपेक्षा खूप वेगळे आहे. हे खोल शाई निळ्या रंगाचे असतात. व्हिक्टोरिया क्राउन्ड कबूतराचे पंख निळे असतात, तोंडाजवळील भाग काळा आणि गडद जांभळा व भुऱ्या रंगाचा असतो. त्याच्या रचनेतील सर्वात खास भाग म्हणजे डोक्यावरचा सुंदर मुकुट. फिकट पांढरा आणि निळा मुकुट त्याचा चेहरा व्यापून टाकतो. सेहरानुमा मुकुट त्यांच्या सौंदर्यातच भर घालतो. इतर कबुतरांप्रमाणे, विक्टोरिया क्राउन्ड देखील खूप मिलनसार आहेत म्हणजेच त्यांच्या समूहात राहतात.कधी कधी झाडांच्या फांद्यावर एकमेकांशी भांडतानाही दिसतात. जेव्हा ते अन्नाच्या शोधात बाहेर पडतात तेव्हा ते समूहाने जातात. अनेकदा ते जोड्यांमध्ये दिसतात.  त्यांचे अन्न झाडांवरून पडलेल्या फळांवर आणि बियांवर अवलंबून असते. याशिवाय छोटे सूक्ष्म जीवदेखील त्यांचा आहार बनतात. व्हिक्टोरिया कबूतर पाण्याने भरलेल्या मैदानात म्हणजे नदी आणि समुद्र किनार्‍याजवळील भागात देखील आढळतात.अशा भागात ते समुद्रातून झाडांच्या खोडांपर्यंत दररोज उड्डाण करतात. ते जंगलात आणि 1000 फूट उंचीच्या पहाडी भागातदेखील घरटी बांधताना दिसले आहेत.

Wednesday, 15 February 2023

देशभरातील 311 नद्यांचे पट्टे प्रदूषित

देशभरातील ३११ नद्यांचे पट्टे प्रदूषित आढळले आहेत. विशेष बाब म्हणजे सर्वाधिक प्रदूषित नदी पट्टे महाराष्ट्रातील असून त्यांची संख्या ५५ इतकी आहे. तर मध्य प्रदेश दुसऱ्या, बिहार व केरळ तिसऱ्या तर कर्नाटक व उत्तर प्रदेश ही राज्ये चौथ्या स्थानी आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) जल गुणवत्ता व्यवस्थापन विभागाचा 'पोल्युटेड रिव्हर स्ट्रेचेस फॉर रिस्टोरेशन ऑफ वॉटर क्‍्वालिटी' अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यातून या धक्कादायक नोंदी समोर आल्या आहेत. शहरांतील घाण सांडपाणी, औद्योगिक वसाहतींमधील रसायने मिश्रित सांडपाणी नद्यांमध्ये किंवा नाल्यांद्वारे सोडले जाते. परिणामी नद्या प्रदूषित होतात, हे प्रदूषित पाणी पिण्याने विविध विकार जडतात. सिंचनासाठी असे पाणी वापरल्यास पिकांवर आणि मृदेवरही याचे हानिकारक परिणाम होतात. परिणामी 'पाण्याची गुणवत्ता' ही पर्यावरणाच्या प्रमुख चिंतांपेकी एक आहे. परिणामी जलप्रदूषणास कारणीभूत घटक नियंत्रित करण्यासाठी प्रभावी कृती कार्यक्रम सीपीसीबीकडून राबविले जातात. त्याची अंमलबजावणी संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून सामुदायिक योगदानातून केली जाते. सीपीसीबीकडून २०१९ आणि २०२१ मध्ये देशभरातील ६०३ नद्यांचे मूल्यांकन करण्यात आले. यासाठी १ हजार ९२० ठिकाणांचे नमुने घेतले, यासाठी पाण्यात असलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण गृहीत धरले. 

महाराष्ट्रातील प्रदूषित नद्या

 भीमा, मिठी, मुठा, सावित्री, गोदावरी, कन्हान, मुळा, मुळा-मुठा आणि पवना या नऊ नद्यांची पात्रे सर्वाधिक प्रदूषित (प्रायॉरीटी १ व २ मध्ये सामील) पट्ट्यांत सामील आहेत.अंबा, अमरावती, बोरी, बुराई, भातसा, बिंदुसरा, चंद्रभागा, दारणा, घोड, गोमाई, गिरणा, हिवरा, इंद्रायणी, कळू, कन, कोलार, कोयना, कृष्णा, कुंडलिका, मंजिरा, मोर, मोरणा, मूचकुंडी, मोरणा, नीरा, पांझरा, पाताळगंगा, पैनगंगा, पेढी, पेहलर, पूर्णा, रंगावली, सीना, सूर्या, तानसा, तापी, तितूर, उल्हास, उरमोडी, वैतरणा, वशिष्टी, वेण्णा, वाघूर, वैनगंगा, वर्धा, वेणा या नद्यांचे पट्टे प्रदूषित आढळून आलेली आहेत.  

Tuesday, 14 February 2023

लोकप्रिय नाटककार जयवंत दळवी

मराठीतील प्रसिद्ध नाटककार आणि कथा-कादंबरीकार जयवंत दळवी यांच्या नाटकांमुळे मराठी रंगभूमीला नवे चैतन्य लाभले. जबरदस्त ताकदीच्या व्यक्तिरेखा हे दळवींच्या नाटकांचे वैशिष्ट्य. त्यांच्या कथांवर आणि कादंबऱ्यांवर त्यांनीच नाटके लिहिली आणि ती प्रचंड गाजली, लोकप्रिय झाली. दळवींची 'चक्र' ही पहिलीच कादंबरी मराठीच्या अनुभव क्षेत्राची कक्षा वाढविणारी म्हणून वाखाणली गेली. दळवी यांची आणखी एक विशेष ओळख म्हणजे 'ठणठणपाळ'. त्यांनी 'पुलं'च्या साहित्यातील निवडक लिखाण वेचून 'पु. ल. देशपांडे : एक साठवण' हे अप्रतिम पुस्तक संपादित केले. 

जयवंत दळवी यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी गोव्यातील हडफडे गावी झाला. त्यांचे बालपण सिंधुदुर्गातील आरवली गावात गेले. कादंबरी, स्तंभलेखन, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी कथा अशा सर्व प्रांतांत त्यांचे लेखन गाजले. त्यांचे १५ कथासंग्रह, १९ नाटके लोकप्रिय आहेत. 'गहिवर', “एदीन', 'रुक्मिणी', स्पर्श इत्यादी १५ कथासंग्रह; चक्र, 'स्वगत', ‘महानंदा’, 'अथांग', 'अल्बम' आदी २१ कादंबऱ्या; संध्याछाया', 'बॅरिस्टर', 'सूर्यास्त', 'महासागर', 'पुरुष', 'नातीगोती' आदी १९ नाटके दळवी यांनी लिहिली. 'लोक आणि लौकिक' हे प्रवासवर्णन आणि ‘सारे प्रवासी घडीचे’ हे कोकणातील विलक्षण व्यक्तींचे आणि त्यांच्या कर्तृत्वाचे, विक्षिप्तपणाचे चित्रण करणारे त्यांचे विनोदी पुस्तक वाचकप्रिय ठरले. 


द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ९८ टक्के

देशात निर्यातीमध्ये महाराष्ट्र राज्य हे अव्वल आहे. राज्यातील द्राक्षांना युरोप, चीन, मध्य-पूर्व आशियासह जगभरात मोठी मागणी असते. भारतातील एकूण द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ९८ टक्के इतका असून महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादनांपैकी केवळ आठ टक्के माल निर्यात होतो. सुधारित वाणांच्या वापराने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात भरघोस वाढ होईल, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. राज्य द्राक्ष बागाईतदार संघ सातत्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी नवनवीन संशोधनांना पाठबळ देत आहे. शिवाय अधिकाधिक सक्षम, निरोगी आणि उत्पादनक्षम द्राक्ष वाणांच्या विकसनासाठी कार्य करत आहे. मांजरी फार्म (ता. हवेली) येथील प्रयोगशाळेत द्राक्षाचे नवे वाण विकसित केले आहे. नवे वाण विकसित करण्यासाठी मागील तीन-चार वर्षांपासून सातत्याने संशोधन करण्यात येत होते.  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन उत्कृष्ट रंग, चव, चांगली वजनदार आणि सुवासिक द्राक्षे प्रजाती विकसित करण्यात द्राक्ष बागाईतदार संघाला यश आले आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांत, वेगवेगळ्या भौगोलिक आणि वातावरणात या वाणाची चाचणी व्हावी, या उद्देशाने मांजरी फार्म येथील प्रयोगशाळेसोबतच बागाईतदार संघाच्या काही प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रयोग करण्यासाठी भारत शिंदे (अध्यक्ष, पुणे विभाग), अभिषेक कांचन (उरुळी कांचन) आणि अशोक गायकवाड (नाशिक) यांना या नव्या वाणाची रोपे दिली होती. या सर्व शेतकऱ्यांच्या प्लॉटवर चांगले निष्कर्ष निघाले आहेत. या चाचणीवेळी प्राप्त झालेल्या सूचनांचा अभ्यास करून, या वाणात आणखी काही सुधारणा करता येतील, हे तपासले जाणार आहे.  या प्रजातीची जनुकीय चाचणी केली असता ती ‘क्रिमसन’ प्रजातीशी काही अंशी साधर्म्य साधणारी आहे. द्राक्षांचा आकार, वजन आणि रंग इतर प्रजातींपेक्षा सरस असून फळ अधिक मधुर आणि सुवासिक (अरोमॅटिक) आहे. द्राक्षाचे आवरण मजबूत असून अवकाळी पावसाचा मारा सहजपणे सहन करू शकते. या झाडांना वाढीसाठी आवश्यक हार्मोन्सची गरज अत्यंत मर्यादित असून महाराष्ट्राच्या सर्व भागांत या वाणाचे उत्पादन घेता येईल.

सांगलीच्या स्मृती मानधनाने मारली बाजी

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि सांगलीची कन्या स्मृती मानधना हिला पहिल्या वुमन्स प्रीमिअर लीगच्या लिलावामध्ये सर्वाधिक बोली लागली आहे. आयपीएलच्या पहिल्याच मोसमात तिच्यावर फ्रेंचायसींनी पाण्यासारखा पैसा ओतला आहे. वुमन्स प्रीमिअर लीगमधील रॉयल चॅलेंर्जस बंगळुरू संघाने 3.40 कोटींची बोली लावत तिला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.

स्मृती मानधनाची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. तिच्याकडे असलेल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर तिला इतकी मोठी किंमत मिळाली आहे. स्मृती मानधना ही जगातील टी-20 क्रिकेट मधील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळून आपली क्षमता सिद्ध केली आहे. स्मृती मानधना श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू कुमार संगकारा आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू मॅथ्यू हेडन यांना आपला आदर्श मानते.

स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणार्‍या महिला बिग बॅश लीगमध्ये 38 सामन्यांमध्ये 784 धावा केल्या आहेत. 139 च्या स्ट्राईक रेटने मानधनाने धावा केल्यात. इतकेच नाहीतर द हंड्रेडमध्येही ती खेळली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्‍वचषकात स्मृती मानधना भारतीय संघाची मुख्य खेळाडू आहे.

स्मृती मंधानाचा जन्म 18 जुलै 1996 रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास आणि आईचे नाव स्मिता आहे. वडील श्रीनिवास मानधना हे माजी जिल्हास्तरीय क्रिकेटपटू होते. स्मृती दोन वर्षाची असताना कुटुंब सांगली येथे स्थलांतरीत झाले. सांगलीत स्मृतीने प्रारंभिक शिक्षण पूर्ण केले.

स्मृतीचा क्रिकेटप्रवास मोठा रंजक आहे. तिचा भाऊ श्रवण क्रिकेट सरावासाठी चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर जात असे. वडील श्रीनिवास त्याला घेऊन जायचे. छोटी स्मृती सोबत असायची. श्रवणचा सराव सुरू असताना वडील स्मृतीला चेंडू टाकत बसायचे. ती ते तडकवायची. हळूहळू तिला क्रिकेटची गोडी लागली. विष्णू शिंदे, अनिल जोब, अनंत तांबवेकर, प्रकाश फाळके असे सांगलीतील प्रशिक्षक 'स्मृतीला चांगले भवितव्य आहे.' असे सांगायचे. तिने मेहनतीने ते सिद्ध करून दाखवले. भारतीय संघाचे दार तिच्यासाठी उघडले गेले, तेव्हा तिचे कुटुंब भाड्याने छोटा बंगला घेऊन राहत होते. 

 स्मृती नऊ वर्षांची असताना तिची महाराष्ट्र अंडर 15 या संघात निवड झाली. यानंतर स्मृती अकरा वर्षाची असताना महाराष्ट्र अंडर 19 संघात निवडली गेली. 2013 मध्ये स्मृती मानधनाने एकदिवसीय सामन्यात डबल शतक करणारी पहिली भारतीय महिला ठरली. स्मृतीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला 2014 मध्ये सुरूवात झाली. इंग्लंडविरुद्ध वॉर्मस्के पाक येथे कसोटीत पदार्पण झाले. वेस्ट इंडीज येथे 2018 मध्ये झालेल्या महिला विश्‍वचषक टी-20 साठी तिची भारतीय संघात निवड झाली. गुवाहाटी येथे टी-20 मध्ये इंग्लंडविरुद्ध महिला संघाचे नेतृत्व केले होते तेंव्हा ती भारतातील सर्वात तरुण टी-20 कर्णधार बनली. स्मृतीला आणखी खुप क्रिकेट खेळायचे आहे.

Monday, 13 February 2023

आधुनिक कवी केशवसुत

कवी केशवसुत यांना  आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हटले जाते. कारण मराठीत सर्वप्रथम  आधुनिक कविता लिहिली. आधुनिक म्हणजे नव्या विषयावरची, नवा आशय सांगणारी. तोपर्यंत काव्य हे देवादिकांवर आणि राजामहाराजांवर लिहिले जात होते. केशवसुतांनी माणसांवर कविता लिहिल्या. केशवसुतांनी काव्याची खरी प्रकती आत्मलेखनाची आहे हे लेखनातून दाखवले. काव्याच्या बाह्यांगातही त्यांनी परिवर्तन घडवून आणले. उत्कट अनुभूती स्फुट स्वरूपाची असते. त्या स्फुट आविष्कारासाठी गणवृत्तांपेक्षा मात्रावृत्तेच अधिक  अनुकूल असतात, हे त्यांनी दाखवून दिले. केशवसुतांचे पूर्ण नाव कृष्णाची केशव दामले. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड गावी झाला. शिक्षण खेड, बडोदे, वर्धा, नागपूर व पुणे या ठिकाणी झाले. केशवसुतांनी विद्यार्थिदशेतच काव्यलेखनास आरंभ केला असला, तरी त्यांचा मुख्य काव्यरचनाकाल १८८५ ते १९०५ हा होता. या काळातील त्यांच्या १३५ कविता आज ग्रंथरूपात उपलब्ध आहेत. केशवसुतांनी लिहिलेल्या कवितांपैकी, 'स्फूर्ति' (१८९६), 'कवितेचे प्रयोजन' (१८९९), 'आम्ही कोण?' (१९०१), 'तुतारी' (१८९३), ‘नवा शिपाई' (१८९८) आणि “प्रतिभा' (१९०४) या महत्त्वाच्या कविता आहेत. त्यांची 'झपूर्झा' (१८९३) ही कविता विशेष गाजली. 

शाहीर अण्णा भाऊ साठे

मुंबई गं नगरी बडी बांका, जशी रावणाची दुसरी लंका वाजतो डंका... किंवा माझी मैना गावावर राहिली... यांसारख्या शाहिरी गाण्यांतून संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीचा आवाज बुलंद करणारे शाहीर अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्यातील एक मानदंड होय. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्‍त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. त्यासाठी जागृती करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर “माझी मुंबई' या लोकनाट्याचे प्रयोग केले होते. अण्णांचे मूळ नाव तुकाराम. जन्मस्थळ सांगलीतील वाटेगाव. त्यांना शालेय शिक्षण घेता आले नसले, तरी त्यांनी अनुभवाच्या शाळेत प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळवले. १९३२ मध्ये वडिलांसोबत मुंबईत आल्यावर चरितार्थासाठी मिळतील ती कामे त्यांनी केली. शहरातील कामगारांचे कष्टमय, ‘ दुःखाचे जीवन त्यांनी  जवळून पाहिले. त्यामुळेच त्यांच्या एकूण साहित्यात वास्तवाचे चित्रण आलेले पाहायला मिळते. माणुसकीचा विजय हेच त्यात मुख्य सूत्र असल्याचे दिसते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात लेखकांची एक प्रतिभावान पिढी निर्माण झाली. त्यांनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले. कथा, कादंबरीच्या क्षेत्रातही त्यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या लेखनाला अमाप लोकप्रियता मिळाली. त्यांच्या 'फकिरा' कादंबरीला १९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला.