महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा मुंबईच्या चर्चगेट येथील जयहिंद महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी भाषा व साहित्याच्या? विकासासाठी कार्यरत साहित्यिकांना पुरस्कृत करण्याकरिता दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. या पुरस्कार वितरण कार्यक्रमास हिंदी साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. शीतलाप्रसाद दुबे, फिल्मसिटीचे उपाध्यक्ष, अमरजित मिर्श तसेच विविध क्षेत्रातील साहित्यप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
हिंदी अकादमीतर्फे तीन प्रकारचे पुरस्कार दिले जातात. यावर्षी देण्यात येणार्या पुरस्कारांमध्ये २ अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, ८ राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, तसेच २१ विधा पुरस्कार अश्या एकूण ३१ पुरस्कारांचा समावेश आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांना अकादमीकडून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम दिली जाते.अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कारासाठी रु. १ लाख, राज्यस्तरीय सम्मान जीवनगौरव पुरस्कारासाठी रु. ५१,000 आणि विधा पुरस्कारासाठी स्वर्ण, रजत, कांस्य अशा तीन प्रकारात अनुक्रमे रु. ३५,000, रु. २५,000 आणि रु. ११,000 रोख देण्यात येतात.
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत साहित्यिकांना पुरस्कृत करण्याकरिता दरवर्षी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. महाराष्ट्रातल्या लेखकांनी मराठीबरोबरच इतर भाषांमध्ये लेखन करणेही आवश्यक आहे. आजही ही अकादमी विविध पातळ्यांवर साहित्यिकांची नोंद घेते, त्यांच्या साहित्याचे संवर्धन करते. इतर भाषांतील उच्च दर्जाचे साहित्य हिंदी भाषेत उपलब्ध झाल्यास साहित्यिकांचा हा ठेवा महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचेल.
महाराष्ट्र शासनाच्या हिंदी साहित्य अकादमीमार्फत सन २0१८-१९ या वर्षाचे पुरस्कार प्रदान शनिवारी करण्यात आले. हिंदी साहित्य अकादमीच्या पुरस्कारामध्ये सर्वोच्च समजला जाणारा अखिल भारतीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार डॉ. बलभीमराज गोरे आणि हस्तीमल हस्ती यांना प्रदान करण्यात आला. प्रत्येकी एक लाख रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
No comments:
Post a Comment