Saturday, 4 April 2020

घरात सतत मुंग्या होत असतील तर...

अगदी चिमुरड्या असल्या तरी घरामध्ये सर्वत्र वावरणार्‍या मुंग्या अतिशय त्रासदायक ठरू शकतात. मुंग्या लागल्याने किती तरी खाद्यपदार्थ अगदी टाकूनच द्यावे लागतात. या शिवाय मुंग्यांनी केलेली बिळे अतिशय त्रासदायक ठरतात. तसेच कपड्यांमधून आणि अंथरुणात मुंग्या शिरल्या तर काही विचारायलाच नको. त्यामुळे मुंग्यांचा प्रादुर्भाव वाढायला लागला, की दरवेळी आपण कसले ना कसले स्प्रे, पावडर्स घालून मुंग्यांच्या विरुद्ध जंग पुकारत असतो.

नारायणराव व्यास

नारायणराव व्यास हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक होते. ते ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. ते पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य होते. ख्याल, भजन व ठुमरी गायनासाठी ते विशेष प्रसिद्ध होते. नारायणराव व्यासांचा जन्म इ.स. १९0२ मध्ये महाराष्ट्रात कोल्हापूर येथे संगीत उपासकांच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील, काका हे कोल्हापुरात संगीत क्षेत्रात नाव कमावून होते. विख्यात संगीतकार व गायक शंकरराव व्यास हे नारायणरावांचे वडील बंधू होत. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी लाहोर येथे विष्णू दिगंबर पलुसकर यांनी सुरू केलेल्या गंधर्व महाविद्यालयात ह्यगुरुकुल पद्धतीत संगीत शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

Thursday, 2 April 2020

वाढवा आपले सामान्य ज्ञान


१) 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट' ची सुरुवात कोणत्या शहरातून झाली?
२) जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश कोणता?
३) 'सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स' ची स्थापना कधी झाली?
४) पहिलं वाफेचं इंजिन बांधणारा ब्रिटिश अभियंता कोण?
५) अमेरिकन ध्वजाचं टोपण नाव कोणतं?

ऑक्सपेकर

ऑक्सपेकर हे पक्षी जंगलामधील प्राप्यांच्या अंगावर राहतात , या प्राण्यांच्या अंगावर असणाऱ्या गोचीड , किडे खाऊन ते जगतात , म्हणजे एक प्रकारे ते या प्राण्यांची मदतच करत असतात . आपल्या अंगावर किडे किंवा मुंगी चढली , तर आपण मिळेल  ती हाताने झटकू शकतो . पण गेंडा , जिराफ , जंगली म्हैस यासारख्या '  मोठया प्राण्यांना आपल्या अंगावर बसलेले कीटक काढणे शक्य नसते . त्यासाठीच त्यांना ऑक्सपेकरची गरज लागते . म्हणूनच हे मोठे प्राणी  ऑक्सपेकर पाठीवर बसले तरी त्यांना काहीही करत नाहीत . ऑक्सपेकर हा विशेष पक्षी साळुकीच्या आकाराचा असतो .

संजीवनी मराठे

कवयित्री संजीवनी या नावाने काव्यलेखन करणाऱ्या कवयित्री तर होत्याच , शिवाय कविसमेलनात स्वत : च्या कविता सुरेल आवाजात त्या गातही असत . त्या शाळकरी वयातच  कविता लिह लागल्या . १९३२ साली कोल्हापूरला भरलेल्या साहित्य ते  संमेलनात त्यांचा काव्यक्षेत्रात प्रवेश झाला . त्यांचा पहिला  मग कवितासंग्रह ' काव्यसंजीवनी ' त्याच वर्षी प्रकाशित झाला . पुढे अनेक  कवितासंग्रहातून आणि ' भावपूष्प ' व ' परिमला ' गीतमाहांतुन त्यांची ते  काव्यजीवनातील वाटचाल रसिकांना अनुभवता आली . संजीवनी मराठे यांच्या कविता तरल आणि संजीवक स्वप्नांची निर्मिती आहे.

श्री राम नवमी

भारतात हिंदू धर्माचे आराध्यदैवत मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम असून ते सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींमध्ये पुजनीय देवता आहेत. रामनवमी उत्सव साजरा करण्यासाठी निस्सीम परमभक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात, म्हणूनच जगात हिंदू भक्त जेथे निवास करून असतील त्या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात जुनी संस्कृती आहे. यावरूनच बाकीच्या सगळ्या प्रथा आणि परंपरांचा उगम झालेला दिसतो.

Wednesday, 1 April 2020

तुम्हाला ठाऊक आहे का?

*ICICI बँकेनी एक सेवा सुरू केली जी ग्राहकांना या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून बँकिंग सेवा प्रदान करते - व्हॉट्सअ‍ॅप.
*ICICI लोंबार्ड कंपनीने या व्यापारी देयक व्यासपीठासह भागीदारीत दुकानदारांसाठी 'कोविड-19 संरक्षण विमा' सेवा सुरू केली – भारत पे.
*जगातले सर्वात थंड महाद्वीप जिथे शास्त्रज्ञांनी सन 2019-20 उन्हाळ्यात प्रथमच उष्णलहरीच्या घटनेची नोंद केली - अंटार्क्टिका.
*लिबियावरील संयुक्त राष्ट्रसंघाच्या शस्त्रास्त्र बंदीची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने या देशाने भूमध्य समुद्रात ‘ऑपरेशन इरिनी’ नावाने नौदल मोहीम सुरू करण्याची घोषणा केली – युरोपिय संघ.