Wednesday, 1 April 2020

तुम्हाला ठाऊक आहे का?

*ICICI बँकेनी एक सेवा सुरू केली जी ग्राहकांना या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून बँकिंग सेवा प्रदान करते - व्हॉट्सअ‍ॅप.
*ICICI लोंबार्ड कंपनीने या व्यापारी देयक व्यासपीठासह भागीदारीत दुकानदारांसाठी 'कोविड-19 संरक्षण विमा' सेवा सुरू केली – भारत पे.
*जगातले सर्वात थंड महाद्वीप जिथे शास्त्रज्ञांनी सन 2019-20 उन्हाळ्यात प्रथमच उष्णलहरीच्या घटनेची नोंद केली - अंटार्क्टिका.
*लिबियावरील संयुक्त राष्ट्रसंघाच्या शस्त्रास्त्र बंदीची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने या देशाने भूमध्य समुद्रात ‘ऑपरेशन इरिनी’ नावाने नौदल मोहीम सुरू करण्याची घोषणा केली – युरोपिय संघ.

*स्कोल फाउंडेशनचा ग्लोबल ट्रेझर अवॉर्ड 2020 याचा विजेता - द एल्डर्स.
*या संस्थेनी आणि जागतिक बँकेनी जगातल्या सर्वात गरीब राष्ट्रांकडून कर्ज देयके रोखण्यासाठी सरकारांना आवाहन केले जेणेकरुन ते कोरोना महामारीशी लढा देऊ शकतील - आंतरराष्ट्रीय नाणेनिधी.
*7 भारतीय भाषांमध्ये "अहम!" नावाचे AI आधारित आभासी मदतणीस सेवा सुरू करणारे - धीयंत्र.
*महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतल्या ग्रामीण कामगारांच्या वेतनात 1 एप्रिलपासून लागू केलेली वाढ - रू. 20.
*सध्या चालू असलेल्या देशव्यापी बंदीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उत्पादनांचा पुरवठा सुलभ करण्यासाठी रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) यांच्या वतीने घेण्यात आलेला पुढाकार - 'फूड सोल्जर प्रोजेक्ट'.
*UNJSPF कोषमधील गुंतवणूकीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांचे प्रतिनिधी या पदाचा राजीनामा देणारे भारतीय - सुधीर राजकुमार.
*या राज्य सरकारने कोविड-19 संकटातून निघण्यासाठी व्यवसाय आणि लोकांना मदत करण्यासाठी पुढील पाच वर्षात वीज दरात सरासरी 8 टक्के कपात करण्याची घोषणा केली – महाराष्ट्र.
*अमेरिकेची ही कंपनी ‘Ad26 SARS-CoV-2’ लसीवर काम करीत आहे - जॉनसन अँड जॉनसन.
*NSE इंडिया (नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड) - स्थापना: 27 नोव्हेंबर 1992; मुख्यालय: मुंबई.
*BSE (बॉम्बे स्टॉक एक्सचेंज) - स्थापना: 09 जुलै 1875; संस्थापक: प्रेमचंद रॉयचंद.
*राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय – स्थापना: 29 मार्च 1954; स्थानः नवी दिल्ली.
*ओडिशा राज्य - निर्मितीः 1 एप्रिल 1936 (बिहारपासून वेगळे झाले); राजधानी: भुवनेश्वर.
*रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (RAI) याची स्थापना – वर्ष 2004.

No comments:

Post a Comment