Saturday, 4 April 2020

घरात सतत मुंग्या होत असतील तर...

अगदी चिमुरड्या असल्या तरी घरामध्ये सर्वत्र वावरणार्‍या मुंग्या अतिशय त्रासदायक ठरू शकतात. मुंग्या लागल्याने किती तरी खाद्यपदार्थ अगदी टाकूनच द्यावे लागतात. या शिवाय मुंग्यांनी केलेली बिळे अतिशय त्रासदायक ठरतात. तसेच कपड्यांमधून आणि अंथरुणात मुंग्या शिरल्या तर काही विचारायलाच नको. त्यामुळे मुंग्यांचा प्रादुर्भाव वाढायला लागला, की दरवेळी आपण कसले ना कसले स्प्रे, पावडर्स घालून मुंग्यांच्या विरुद्ध जंग पुकारत असतो.
पण काही उपाय असे आहेत जे केल्याने मुंग्या मुळातच घरामध्ये शिरणार नाहीत. त्यामुळे त्यांना मारायचा पुढचा त्रास आपोआपच वाचू शकतो. हे उपाय अगदी घरच्याघरी करता येण्यासारखे आणि कमी खर्चिक आहेत. मुंग्या सर्वात जास्त आढळतात, ते किचनमधील कपाटांमध्ये आणि ओट्यावर. यासाठी सोपा औपाय असा, की एका स्प्रे बॉटलमध्ये तीन भाग पाणी आणि एक भाग व्हिनेगर असे मिर्शण तयार करावे. स्वयंपाक झाल्यानंतर हे मिश्रण  स्प्रे करून ओटा पुसून काढावा. कपाटे पुसत असताना देखील या मिर्शणाचा वापर करावा. याने कपाटांच्या आतील दुर्गंधी निघून जाईल, आणि मुंग्याही नाहीशा होतील. दिवसातून तीन ते चार वेळा हे मिर्शण ओट्यावर स्प्रे करून पुसून काढावे. बोरॅक्स आणि पिठीसाखर यांचे मिर्शण करून, जिथे मुंग्या जास्त असतील त्या भागामध्ये भुरभुरावे. पण घरामध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी असल्यास, त्यांनी हे मिर्शण उचलून खाऊ नये ह्याची काळजी घ्यावी. हे मिर्शण पसरविताना काळजी घेणे अत्यावश्यक आहे.जिथे मुंग्यांचा प्रादुर्भाव जास्त असेल, तिथे काकडीची, लिंबाची किंवा संत्र्याची साले ठेवावीत, त्यांच्या वासामुळे मुंग्या नाहीशा होतात. मैदा किंवा मीठ भुरभुरल्याने देखील मुंग्या नाहीशा होतात.

No comments:

Post a Comment