कवयित्री संजीवनी या नावाने काव्यलेखन करणाऱ्या कवयित्री तर होत्याच , शिवाय कविसमेलनात स्वत : च्या कविता सुरेल आवाजात त्या गातही असत . त्या शाळकरी वयातच कविता लिह लागल्या . १९३२ साली कोल्हापूरला भरलेल्या साहित्य ते संमेलनात त्यांचा काव्यक्षेत्रात प्रवेश झाला . त्यांचा पहिला मग कवितासंग्रह ' काव्यसंजीवनी ' त्याच वर्षी प्रकाशित झाला . पुढे अनेक कवितासंग्रहातून आणि ' भावपूष्प ' व ' परिमला ' गीतमाहांतुन त्यांची ते काव्यजीवनातील वाटचाल रसिकांना अनुभवता आली . संजीवनी मराठे यांच्या कविता तरल आणि संजीवक स्वप्नांची निर्मिती आहे.
संजीवनी मराठे यांच्या कविता आणि गीते यांनी मराठी मनाला एकेकाळी मोहिनी घातली होती . संजीवनी मराठे यांच्या बालकविताही लक्षवेधी आहेत . बालमनाची संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यांनी शिशुगीते , कुमारगीते लिहिली आहेत . त्यात वात्सल्यभावनेचा परिपोष आढळतो . त्याचबरोबर मुलांचे खेळकर , चंचल , निरागस भावजीवन त्यात प्रतिबिंबित झालेले दिसते . मुलांशी संवाद साधत लिहिलेल्या या गीतांमध्ये गोडवा आहे . त्यांच्यावर रवींद्रनाथ टागोर यांचा आणि भा . रा . ताबे यांच्या भावगीतांचाही प्रभाव होता . टागोरांच्या ' गीतांजली ' आणि ' गार्डनर ' मधील निसर्गरूपात परमतत्त्व दृष्टीचा ठसा दिसतो. संजीवनी मराठेच्या कवितांमध्येही जाणवतो . संजीवनीबाईच्या कविता वाचताना काळाच्या अंतरावरून तिच्या काही मर्यादा जाणवतात .
No comments:
Post a Comment