Thursday, 2 April 2020

श्री राम नवमी

भारतात हिंदू धर्माचे आराध्यदैवत मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम असून ते सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींमध्ये पुजनीय देवता आहेत. रामनवमी उत्सव साजरा करण्यासाठी निस्सीम परमभक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात, म्हणूनच जगात हिंदू भक्त जेथे निवास करून असतील त्या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात जुनी संस्कृती आहे. यावरूनच बाकीच्या सगळ्या प्रथा आणि परंपरांचा उगम झालेला दिसतो.
भगवान श्रीरामाचे आदर्श आजही प्रासंगिकआहेत. रघुकुळाचे राजपाठ रामाला मिळू नये असे राजा दशरथची दुसरी पत्नी कैकैयीला वाटत होते. अर्थात हे सर्व षडयंत्र दासी मंथराच्या सांगण्यावरून तिने केल्याने रामाला वनवासी जीवन व्यतीत करावे लागले. हेही विधीचे विधानच समाजल्या जाते. श्रीलंकेतील रावणाला गर्व चढल्याने सर्वत्र दबदबा वाढला होता. या अहंकारी शासकाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने श्रीरामाच्या रूपाने जन्म घेतला. रावणाच्या दुष्टप्रवृत्तीचा नाश करण्यासाठी श्रीरामांनी हे शत्र उचलले.
काहींना रामायण हे काल्पनिक वाटत असेल. श्रीलंकेत आजही अशोक वाटिका, रावणाचे शिवलिंगाचे पुजनीय स्थान, समुद्रातील गोड पाण्याची विहीर, तसेच थडग्यात झाकोळून ठेवली गेलेले मृत अवशेष संशोधनात सापडले. संशोधकांच्या हाती हे अफाट यश मिळाले. त्यामुळे भाविकांची र्शद्धा प्रगाढ झाली. ती शीला, वास्तू, जागा, समुद्रतील खंडरांचे अवशेष अजूनही अस्तित्वात आहेत. हे सारे मनोकल्पित पात्रे कशी रामायणात, स्कंदपुराणात, महाभारतात, रामचरितमानस यातील बरीचशी माहिती व स्थान आजही पृथ्वीवर खंडराच्या अवस्थेत कायम व निपचित पडलेल्या कशा आहेत? रामायणातील ठिकाणे आजतागायत अस्तित्वात असून त्या खंडरांची निर्मिती कोणी तरी केलेली असावी? आणि सर्वात औत्सुक्याचा विषय म्हणजे,आपल्याला आपल्या मागील दहा पिढीचे काहीच माहीती नाही पण, रामायणातील पात्रांची, स्थानकांची आणि पौराणिक कथेची महती जाणतो.याचे कारण र्शद्धेने जतन करून ठेवल्या गलेली ऐतिहासिक, पौराणिक, आध्यात्मिक बाबी जशीच्या तशीच पिढय़ानपिढय़ा आस्थेने व भक्तीतून पुढे सरकत जात आहे. हेही आव्हान चमत्कारापेक्षा काय कमी आहे? शोकांतिका म्हणजे आपण आपल्या संस्कृती आणि सभ्येतेवरच ताशेरे ओढण्यात धन्यता मानतोय आणि बाजारात कोंबड्या जशा भांडवतो तसे आपल्या घरात भांडत बसतो. तशी अवस्था आपली नको व्हायला इतकेच ! आजही तेवढय़ाच आपुलकीने व आस्थेने रामलल्लाच्या मंदिरात व जन्मस्थळी सारेच जण गुण्यागोविंदाने दर्शन करतात. दिवाळीच्या, प्रगटदिनाच्य दिवशी झगमगत्या दिव्यांनी अयोध्या नगरीचा स्वर्गमय दृश्य पाहून कुणाचेही पारणे फिटेल. असा जन्मोत्सव आजच्या दिवशी आनंदोत्सव मोठय़ा दिमाखात साजरा करण्यात येतो.
महर्षि ऋषी वाल्मिकी रामायणात राम जन्मस्थान ते वनवासी जीवनात आलेले प्रत्येक प्रसंगवर्णन बारकाईने संस्कृतात अतिशय सुरेखपणे मांडले आहेत. रामचरितमानसमध्येही रामाच्या अनेक कल्याणकारी कामाचे गुणगान, कौतुकास्पद गोष्टीचा उलगडा आहे. घनदाट जंगल, दयाखोर्‍यातून भ्रमण करीत असताना श्रीरामांनी जंगलस्थित मानवांची सेवा केली. धनुष्यबाण चालविणे, नीटनेटके राहणे, अनुशासित जगणे, एकनिष्ठ जीवन व्यतीत करणे, समुहाने राहणे आदी शिक्षण देत गेले.यादरम्यान शबरी आर्शमाला भेट दिली विशेष म्हणजे हे तलाव आजही कायम आहे. श्रीराम हे आग्याकारी, भविष्यवेधिक, इमानदार, न्यायिक देव पुरूष होते. विशेष म्हणजे त्यांनी आपली र्मयादा कधीच ओलांडली नाही,किंबहुना आपल्या आध्यात्मिक दैवी शक्तीचा गैरफायदाही घेतला नाही. त्यांच्या मुखातून अनंत शब्द सुमनांचा वर्षाव होत राहायचा. त्यांच्यात अगाध आत्मविश्‍वास आणि चमत्कारिक महिमा अपरंपार असल्याचे भक्त सांगतात. भक्तांना मिळालेल्या अनुभूतीच्या आधारेच ते सांगत असतील. श्रीरामानी मी स्वत: देवदूत आहे असे कधीच म्हटले नव्हते. मात्र त्यांनी दाखवलेल्या मार्गाचा लाभ अलौकिक असल्याने ही काय साधारण पुरुष नाहीये, असे जनतेच्या लक्षात आले. उदोउदो आणि जयकाराची प्रथा तेथूनच पडली. प्रत्येक मानवाने धैर्यशील बनून, आलेल्या संकटांना सामोरे जावून जीवनाचे सार्थक करून घ्यावे. याचीच प्रचिती सदैव त्यांनी करून दिली. आपले सद्सद्विवेक बुद्धीचा सर्वोपरी वापर करून जीवन सुखमय करून जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगितला. ते स्वत: देवादीदेव होते तरीही त्यांना चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला आणि आपण तर सामान्य माणसे आहोत. मग आपणास कठीण परिस्थितीतीला घाबरायचे कारण काय? श्रीराम मानव जीवनशैली वृध्दिंगत करून संसाररूपी सागर तरण्यासाठी भूतलावर अवतरीत झाले. सखल समाजाला मानवीय मूल्यांची जाणीव जागृती निर्माण करून जीवनाचे र्मम उलगडून दाखवली. संघर्ष , कष्ट, यातना ही मानवी जीवनात अविभाज्य अंग असून यामुळे जीवनाला चकाकी लाभते. हीच शिकवण पदोपदी रामायनातूूून आपणास शिकायला मिळते.

No comments:

Post a Comment