ऑक्सपेकर हे पक्षी जंगलामधील प्राप्यांच्या अंगावर राहतात , या प्राण्यांच्या अंगावर असणाऱ्या गोचीड , किडे खाऊन ते जगतात , म्हणजे एक प्रकारे ते या प्राण्यांची मदतच करत असतात . आपल्या अंगावर किडे किंवा मुंगी चढली , तर आपण मिळेल ती हाताने झटकू शकतो . पण गेंडा , जिराफ , जंगली म्हैस यासारख्या ' मोठया प्राण्यांना आपल्या अंगावर बसलेले कीटक काढणे शक्य नसते . त्यासाठीच त्यांना ऑक्सपेकरची गरज लागते . म्हणूनच हे मोठे प्राणी ऑक्सपेकर पाठीवर बसले तरी त्यांना काहीही करत नाहीत . ऑक्सपेकर हा विशेष पक्षी साळुकीच्या आकाराचा असतो .
प्राण्यांच्या कानातील मलही तो खातो आणि त्यांचे कान स्वच्छ करतो . गेंडा किंवा जंगलातील इतर प्राण्यांना या पक्ष्याचा आणखी एक फायदा होतो . ज्यावेळी हे प्राणी शांतपणे विश्रांती घेत असतात तेव्हा ऑक्सपेकर त्यांच्या पाठीवर किंवा आजूबाजूलाच असतात . त्यांना धोका जाणवल्यास ते पटकन उडून दूर जातात . त्यामुळे कोणतेही मोठे प्राणीही सावध होतात . ऑक्सपेकरच्या सर्व गोष्टी इतर प्राण्यांच्या पिणे अंगाखांद्यावरच होतात . म्हणजे जोडी जमणे , प्रजनन , पिलांचे संगोपन इत्यादी गोष्टी . फक्त घरटे झाडांच्या किंवा खडकांच्या सांधीमध्ये बांधतात . घरट्यांसाठी सुक्या गवताचा वापर करतात . लाल चोचीचे आणि पिवळ्या चोचीचे असे दोन प्रकार ऑक्सपेकरचे बघायला मिळतात .
No comments:
Post a Comment