विख्यात मराठी कवी. संपूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढारकर. जन्म सातारा जिल्हयातील चाफळचा. शिक्षण सांगलीस झाले. मॅट्रिक झाल्यानंतर पुण्यास लेखनिकाची नोकरी केली.
कवी साधुदास (गोपाळ गोविंद मुजुमदार) हयांचे काव्यरचनेसंबंधीचे मार्गदर्शन आरंभीच्या काळात त्यांना मिळाले. यशवंतांची मूळ प्रवृत्ती राष्ट्रीय स्वरूपाची कविता लिहीण्याकडे होती. पुढे रविकिरण मंडळात ते आल्यानंतर इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. यशोधन (१९२९) हा त्यांचा पहिला मोठा आणि लोकप्रिय असा कवितासंग्रह.
त्यानंतरचे त्यांचे यशोगन्ध (१९३४), यशोनिधी (१९४१), शोगिरी(१९४४), ओजस्विनी (१९४६), इ. काव्यसंग्रह प्रसिदध झाले. गेय, भावोत्कट, सामान्यांच्या सुखदु:खाशी समरस होणारी, सहजसुगम अशी त्यांची कविता आहे. त्यामुळे रविकिरण मंडळातील सर्वांपेक्षा अधिक लोकप्रियता त्यांना मिळाली.
उत्कट आत्मपरता हा यशवंतांच्या प्रतिभेचा स्थायीभाव आजच्या गतिमान जीवनप्रवाहातील संवेदनशीलतेला कदाचित मानवणारे नाही. पण, एकेकाळी यशवंतांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची मुद्रा जनमानसावर उमटवली होती. एकत्र कुटुंबपद्धतीतील शाश्वत जीवनमूल्यांचा त्यांनी उद्घोष केला. त्यांची कुंटुंबवेल्हाळ वृत्ती त्यांच्या आत्मनिष्ठ कवितांतून प्रकट होते. १९२२ मध्ये त्यांना लिहिलेल्या ह्लआई या कवितेतील गोडवा आजही कायम राहिला आहे.
ह्लआई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी
ती हाक येई कानी, मज होय शोककारी
स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी
या ओळींतील आर्तता आणि करुणा अंत:करणाला स्पर्श करते. मातेची महत्ता समुचित शब्दांत कवीने वर्णिलेली आहे.
आई! तुझ्याच ठायी सार्मथ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे अद्वैत तापसांचे
ह्लदैवतें माय-तात या कवितेतही आई वडिलांविषयी कृतज्ञताभाव परिणामकारक शब्दांत व्यक्त झाला आहे. आपल्या मनातील भाव-भावनांचे कढ, आशा-निराशेची स्पंदने आणि तीव्र दु:खाच्या छटा यशवंतांनी समरसतेने रंगवल्या. सर्मथांच्या पायांशी, माण्डवी व बाळपण अशा कितीतरी आत्मप्रकटीकरण करणार्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत. लाल-फुले या कवितेत आपल्या जीवनातील प्रखर वास्तवाचे चित्रण कवी करतो. माझें हें जीवित तापली कढई मज माझेंपण दिसेचि ना माझें जीवित तापली कढई तींत जीव होई लाही-लाही वसन्त, हेमन्त, निशा किंवा उषा लाहीच्या विकासासारखेंच लाल-फुलें ऐशीं देहीं फुलतात. ऐश्वर्य अनन्त हेंच आम्हां!
यशवंतांच्या प्रेमकवितेत प्रीतिसाफल्य, तिची विफलता, मृत्यूवर मात करणारे तिचे चिरंजीवीत्व इत्यादी छटांचे चित्रण आढळते. त्यांच्या प्रेमकवितेवर रविकिरणमंडळातील कवींचा ठसा उमटलेला दिसतो. केवळ प्रियकराच्या नवथर भावनांचे प्रकटीकरण करण्यात त्यांची प्रतिभा रमत नाही. कल्पनासृष्टीतील प्रेयसीच्या सौंदर्याचे मानसिक चिंतन करण्याची प्रवृत्ति त्यांच्यात आढळते. स्त्रीच्या शारीरिक सौंदयार्मुळे पुरुषाच्या मनात प्रीतीभाव निर्माण होत असला तरी, त्याची परिणती आत्मिक मिलनात होणे ही खरी कसोटी. प्रेयसीच्या अंत:करणातील उदात्ततेला कवी प्राधान्य देतो. यादृष्टीने तूच रमणी ही त्यांची कविता उल्लेखनीय होय. प्रीतिसंगम, प्रेमाची दौलत, चमेलीचे झेले आणि एक कहाणी या कवितांचा आवर्जून निर्देश करायला हवा. एक कहाणीमध्ये बारा कवितांचा गुच्छ आहे. चमेलीचे झेलेमध्ये तीन कविता एकत्र गुंफलेल्या आहेत. एका ह्य या कवितेत सुरवातीला प्रसन्न भावनांचे प्रतिबिंब आढळते.. ती तू दिसतां हृदयी येती कितीक आठवणी मम सौख्यांची झाली होती तुज्यांत साठवणी! या कवितेत आठ कवितांची मालिका आहे. प्रेमनैराश्यामुळे निर्माण झालेल्या व्यथेंचे चित्रण करताना कवी उद्गारतो.. सुहासिनी, कां दर्शन देसी? मी हा दरवेशी! समोरूनी जा, झाकितोंच वा हृदयाच्या वेशी!
No comments:
Post a Comment