ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त पाहिले मराठी साहित्यिक विष्णू सखाराम तथा वि. स. खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, लोकप्रिय साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी लिहिलेल्या 'ययाती' कादंबरीला १९६०चा साहित्य अकादमी आणि १९७४चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मराठी वाचकांत गेली पाच दशके ही कादंबरी लोकप्रिय आहे. खांडेकरांनी 'कुमार' या नावाने कविता व 'आदर्श' या नावाने विनोदी लेखही लिहिले; मात्र त्यांची खरी ओळख कादंबरीकार हीच होय. कथाक्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी केली. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकांचीही निर्मिती झाली. 'रूपक कथा' ही खांडेकरांनी मराठी कथेला दिलेली एक देणगीच होय. सांगली जिल्ह्यात जन्म झालेल्या वि. स. खांडेकर यांची कर्मभूमी सिंधुदुर्गातील शिरोडा हे गाव ठरले. याच गावात ते शिक्षक म्हणून सेवेत होते. १९३० ती मध्ये 'हृदयाची हाक' ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. त्यानंतर एक कांचनमृग (१९३१), दोन धुव (१९३४), हिरवा चाफा, दोन मने (१९३८), रिकामा देव्हारा (१९३९), पहिले प्रेम (१९४०) अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. सरकारने १९६८ मध्ये पद्मभूषणने त्यांना गौरवले. शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. बहाल केली. सरकारने पोस्टाचा स्टॅम्प काढून त्यांचा सन्मान केला.
No comments:
Post a Comment