कियारा अडवाणी हिचा जन्म 31 जुले 1992 रोजी मुंबईत झाला. ती जय हिंद कॉलेज फॉर मास कम्युनिकेशन, मुंबईतून पदवीप्राप्त आहे. वडिलांचे नाव जगदीप अडवाणी, आई जेनेवीव जाफरी असून एक बहीण-भाऊ आहे. तिची संपती सुमारे 25 कोटी रु. आहे.
बॉलीवुडची सर्वात चर्चित नायिकांपैकी कियारा अडवाणीला कधी काळी बॉलीवूड चित्रपट पाहिल्याने अपमानित व्हावे लागले होते. कियारा सांगते, ती मुंबईतील सर्वात मोठ्या शाळेपैकी कॅथेडलमध्ये शिकली आहे. येथे हिंदी चित्रपट पाहणे कमीपणाचे समजले जायचे. ती लपून बॉलीवूड चित्रपट बघायची. चित्रपटात जाण्याआधी तिच्या आईने तिला व्यावसायिक पदवी प्राप्त करायला सांगितले म्हणजे करिअरसाठी बॅकअप तयार राहील. उद्योगपती मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी तिची मैत्रीण आहे. जुही चावला तिला मावशी लागते.
कियारा अडवाणीचे वडील जगदीप अडवाणी उद्योगपती तर आई जेनेवीव जाफरी शिक्षिका आहेत. कियाराचे आजोबा मुसलमान होते तर आजी स्कॉटिश खिश्चन होती. तिचे खरे नाव आलिया अडवाणी आहे. बॉलीवूडमध्ये प्रवेशाआधीच आलिया भट्ट आली होती, यामुळे तिने सलमान खानच्या सांगण्यावरून आपले नाव बदलून कियारा अडवाणी करून घेतले. बॉलीवूड कलाकार, निर्माते, दिग्दर्शक अशोक कुमार म्हणजे दादामुनी तिचे सावत्र आजोबा आहेत.
अभियानाच्या आधी तिने मुंबईच्या अली बर्ड प्ले स्कूलमध्ये टीचिंगपासून करिअरची सुरुवात केली. २०१४ मध्ये आलेला 'फगली' तिचा पहिला चित्रपट होता, जो फ्लॉप ठरला. मात्र पुढचाच चित्रपट एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरीत शानदार अभिनयाने आपली छाप पाडली. या नंतर आलेल्या कबीर सिंहने स्टार बनवले. तिने तेलुगू चित्रपटातही काम केले आहे. आतापर्यंत जवळपास १५ चित्रपट केले आहेत. कियारा आठ महिन्यांची असताना आई जेनेबीवसोबत बेबी क्रीमची जाहिरात केली होती. अलिकडेच तिचा सिद्धार्थ मल्होत्रा सोबत विवाह झाला आहे.
No comments:
Post a Comment