Friday, 28 February 2020

मोरारजी देसाई

मोरारजी रणछोडजी देसाई हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक कार्यकर्ते होते. ते १९७७ ते १९७९ दरम्यान जनता पार्टीने तयार केलेल्या सरकारमध्ये भारताचे ४थे पंतप्रधान बनले. राजकारणाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री, भारताचे गृहमंत्री व अर्थमंत्री आणि भारताचे दुसरे उपपंतप्रधान अशी अनेक महत्वाची पदे भूषविली.पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे निधन झाल्यानंतर देसाई हे १९६६ मध्ये पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार होते. १९६९ पयर्ंत इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात त्यांची उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली. १९६९ च्या काँग्रेसच्या फाळणीच्या वेळी त्यांनी राजीनामा दिला आणि भारतीय राष्ट्रीय कांग्रेस (संगटन)(कांग्रेस)(ओ) मध्ये सामील झाले.

वाढवा आपले सामान्य ज्ञान

वाढवा सामान्य ज्ञान
उत्तर : १) फ्रॉइड २) रसायनशास्त्र ३) राष्ट्रपती शासन पद्धती  ४) दादाभाई नौरोजी ५) कॅल्शियम काबरेनेट
१) सायको अँनालिसीस मांडणारा संशोधक कोण?
२) रासायनिक द्रव्यांचा अभ्यास करणारं शास्त्र कोणतं?
३) माली या देशामध्ये कोणती शासन पद्धती अस्तित्वात आहे?
४) ब्रिटिश संसदेत निवड झालेले पहिले भारतीय कोण?
५) खडूचं रासायनिक नाव काय?

Thursday, 27 February 2020

उद्योगपती लक्ष्मी मित्तल

स्टील किंग लक्ष्मीनिवास मित्तल हे ब्रिटनमधील सर्वात धनाढय़ आणि सार्मथ्यशाली आशियाई व्यक्ती ठरले आहेत. मित्तल हे १५.५ अब्ज पाऊंड (सुमारे १२५४ अब्ज रुपये) संपत्तीचे मालक आहेत. 'ईस्टन आय' या साप्ताहिक वृत्तपत्राने आशियातील १0१ टॉप शक्तिशाली उद्योगपतींची यादी प्रकाशित केली आहे. जगातील अग्रगण्य इस्पात कंपनी आर्सेलर मित्तलचे सीईओ आणि अनिवासी भारतीय (६१) यांना ब्रिटनमधील सर्वांत धनाढय़ आशियाई उद्योगपती म्हणून यादीत उल्लेख करण्यात आला आहे. यादीनुसार मित्तल यांच्याकडे दौलत, प्रतिष्ठा आणि ताकद या सर्वकाही गोष्टी आहेत. केसिंग्जटन पॅलेस गार्डनमध्ये त्यांची मालमत्ता आहे.

Wednesday, 26 February 2020

मराठी साहित्यात अमूल्य योगदान देणारे कुसुमाग्रज

मराठी साहित्यात अमूल्य योगदान देऊन चार दशकांपेक्षा जास्त काळ प्रभाव गाजविणारे प्रतिभावंत कवी, लेखक, नाटककार, लघुनिबंधकार, कादंबरीकार, समीक्षक, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर हे होत. कलात्मक लिखाण करून त्यांनी मराठी साहित्यात विशेष ठसा उमटवला. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. मराठीची दैन्यावस्था पाहून आपल्या माय मराठीत सकस आणि दमदार अशी साहित्य निर्मिती करून त्यांनी मराठी भाषेला एक वेगळेच वैभव प्राप्त करून दिले.या युगातही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या १0 भाषात स्थान पटकवणारी मराठी. या मराठीला कुसुमाग्रजांनी आपल्या स्वप्रतिभेच्या बळावर उत्तुंग शिखरावर नेऊन पोहचवले म्हणूनच त्यांचा जन्म दिन २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १९0६ रोजी सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'सिताराम तिवारी' व आईचे नाव 'जगरानी देवी' असे होते. त्यांचे पूर्वज कानपूरजवळच्या बादरका गावात राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसर्‍या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले.

वाढवा आपले सामान्य ज्ञान

वाढवा सामान्य ज्ञान
उत्तर : १) फ्रॉइड २) रसायनशास्त्र ३) राष्ट्रपती शासन पद्धती  ४) दादाभाई नौरोजी ५) कॅल्शियम काबरेनेट
१) सायको अँनालिसीस मांडणारा संशोधक कोण?
२) रासायनिक द्रव्यांचा अभ्यास करणारं शास्त्र कोणतं?
३) माली या देशामध्ये कोणती शासन पद्धती अस्तित्वात आहे?
४) ब्रिटिश संसदेत निवड झालेले पहिले भारतीय कोण?
५) खडूचं रासायनिक नाव काय?

पाण्याखालून धावणारी भारतातील पहिली मेट्रो

देशात सर्वात पहिल्यांदा मेट्रो सेवा सुरु करुन इतिहास रचणारे कोलकाता शहर आता पुन्हा एकदा इतिहास रचणार आहे. कारण, पाण्याखालून धावणारी देशातील पहिली मेट्रोही आता कोलकाता शहरातून धावणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन होणार आहे. तर कोलकात्यात पहिली मेट्रो सेवा 1984 मध्ये  सुरु झाली होती. त्याची घौडदौड आज एकविसाव्या शतकातही सुरुच आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल बुधवारी कोलकाता ईस्ट-वेस्ट मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

Monday, 24 February 2020

२0५0 पर्यंत १ हजार कोटी

जगाची लोकसंख्या आजच्या घडीला सुमारे ७३0 कोटी आहे. २0५0 पयर्ंत ही लोकसंख्या १ हजार कोटी होईल, असे भाकीत संयुक्त राष्ट्रसंघाच्या ताज्या अहवालात केले गेले आहे. आफ्रिका खंडातील लोकसंख्या सर्वात वेगाने वाढेल व त्याखालोखाल आशिया खंडाची लोकसंख्या वाढेल असा एक अंदाज आहे. ७0 वर्षे ते ८३ वर्षांपयर्ंत वाढलेले आर्युमान व वाढलेला जननदर यामुळे २0५0 पयर्ंत १५ वर्षांखालील मुले व ६0 वर्षांवरील वृद्ध यांची संख्या जवळपास समान असेल व याचा विपरीत परिणाम जागतिक उत्पादन क्षमतेवर होईल. एवढेच नाही तर एवढय़ा लोकसंख्येला पोसणे हे मोठे कठीण काम असेल. यामुळे गरिबी, कुपोषणात वाढ होईलच; शिवाय जगभरातील निर्वासितांच्या समस्येत वाढ होईल. कृषिक्षेत्रावरील ताण वाढेल आणि हवा, पाणी व अन्न प्रदूषणाच्या पातळीतही वाढ होईल. यामुळे जागतिक लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणणे सर्वच देशांचे प्रथम कर्तव्य आहे.
   

शांता आपटे

भारतीय चित्रपटामधील झंझावाती अभिनेत्री म्हणुन ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते अशा काही मोजक्या स्त्रीकलाकारांमधील शांता आपटे हे नाव वर्तमानकाळातील कलाकारांना प्रेरणा देत आहे. त्या काळात पार्श्‍वगायनाची संकल्पना रुजली नसल्याने बहुधा गायक-गायिकाच रुपेरी पडद्यावर भूमिका करत. पण, शांता आपटे म्हणजे गायन आणि चतुरस्र अभिनयाचा आविष्कार होत्या. शांता आपटेंचे शिक्षण चौथी पर्यंतचे, त्यानंतर घरीच त्यांना शिकविण्यासाठी शिक्षक येत. अभ्यासाव्यतिरिक्त वयाच्या पाचव्या वर्षापासून गायनाचे धडेसुद्घा शांता आपटेंना दिले गेले.

अल्बीनो म्हणजे काय?

प्रत्येक जातीच्या प्राण्याचा स्वतःचा एक वेगळा रंग असतो. वाघाला पट्टे असतात, ससे करडे असतात. गायीवर विविध पिवळसर रंगाच्या छटा आढळतात, तर मानवजातीत काळी, गोरी, पिवळी, तपकिरी, गव्हाळ वर्णाची माणसे आढळतात. एखाद्या समूहामधील सर्वांचा रंग बहुधा जुळणारा व सारखाच असतो. अशा वेळी एकदम वेगळ्याच रंगाचा म्हणजे पूर्ण पांढऱ्या रंगाचा प्राणी आढळला, तर त्याकडे सर्वांचे लक्ष कुतुहलाने वेधले जाते. या श्वेतप्राण्यांना 'अल्बिनो' असे म्हटले जाते. खरे म्हणजे आई वडिलांच्या गुणसूत्रांतून हा गुण बहुतेक वेळा उतरलेला असतो. त्यातही गंमत म्हणजे त्याच आई वडिलांची सर्व भावंडे श्वेत असतात,

सजीव म्हणजे काय?

सजीवाची व्याख्या फार सोपी आहे. ज्याची वाढ होते, ज्यापासून पुनरुत्पादन होऊ शकते, जो प्रतिक्रिया व्यक्त करतो, तो सजीव. या व्याख्येत प्रत्येक सजीव बसलाच पाहिजे. एखाद्या बाबतीत शंका असली, तरी तिचे निराकरण करणे हे महत्त्वाचे. हे निकष लावताना सुरुवातीला फसगत होऊ शकते. ज्याची वाढ होते, असा एखादा क्रिस्टलही असू शकतो. साधा मिठाचा खडाही आकाराने वाढू शकतो. पण उरलेले दोन निकष तेथे उपयोगी पडत नाहीत.

स्टीव्ह जॉब्स: आयपॅड, आयफोन, स्मार्टफोनचा संशोधक

(जन्मदिन - फेब्रुवारी २४, इ.स. १९५५)
स्टीव्ह जॉब्स (इंग्लिश: Steve Jobs) (फेब्रुवारी २४, इ.स. १९५५; सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका - ऑक्टोबर ५, इ.स. २०११; पालो आल्टो, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा एक अमेरिकन व्यवसायिक होता आणि तो ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचा सहसंस्थापक व मुख्याधिकारी होता. जॉब्स हा काही काळ पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज‎चा मुख्य व्यवस्थापक होता आणि नंतर तो वॉल्ट डिस्ने कंपनीचा संचालक सदस्य होता. इ.स. १९७० मध्ये जॉब्स याने स्टीव्ह वॉझनियाक, माइक मारक्कुला आणि इतर (ॲपल कंपनीचे सर्व सदस्य) यांच्या समवेत व्यक्तिगत संगणक तयार केला. ॲपल-२ या मलिकेअंतर्गत मॅकिंटॉश नावाची प्रचालन यंत्रणा तयार केली. इ.स. १९८५ मध्ये कंपनीच्या सदस्यांसमावेत झालेल्या वादामुळे त्याने राजीनामा दिला आणि नेक्स्ट या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा (संगणकाचा वापर) किंवा प्रणाली तयार करणारी कंपनी स्थापन केली.

दिनविशेष

२४ फेब्रुवारी – घटना
१६७०: राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म.
१८२२: जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्‍घाटन झाले.
१९१८: इस्टोनिया देशाला रशियापासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९२०: नाझी पार्टीची स्थापना झाली.
१९३८: ड्यु पाँ कंपनीने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरुवात केली.
१९४२: व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केन्द्राचे प्रसारण सुरू झाले.
१९५२: कर्मचारी राज्य विमा योजनेची (ESIC) सुरूवात झाली.

ब्रिटएशिया सौंदर्यस्पर्धा जिंकली श्रद्धा मेघराजनने

लंडन येथे रंगलेल्या ब्रिटएशिया सौंदर्यस्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रद्धा मेघराजनं मिसेस किताब पटकावला आहे. ब्रिटएशिया ही स्पर्धा प्रामुख्यानं लंडनमधील आशियातील नागरिकांसाठी आयोजित केलेली आहे.कामानिमित्त लंडनमध्ये स्थायिक झालेले आशियातील नागरिक या स्पर्धेत भाग घेतात. यंदा मिसेस ब्रिटएशिया २०१९चा किताब श्रद्धानं आपल्या नावावर केला आहे.

अमेरिका राष्ट्राध्यक्ष आणि भारत दौरा

▪️ड्वाइट डी आइजनहॉवर: वर्ष १९५९
 भारताच्या स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत सहा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताला भेट दिली आहे. १९५९ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी आइजनहॉवर यांनी भारत दौरा केला. भारत दौऱ्यावर आलेले ते पहिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत चर्चा केली. त्यांचा हा दौरा भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत करण्यासाठी होता.

निसर्गद्रष्टा डॉ. माधव गाडगीळ

ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या नावाने दिला जाणारा निसर्गसंवर्धन पुरस्कार डॉ. माधव गाडगीळ यांना जाहीर करून ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने एका ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञाचा उचित सन्मान केला आहे. वन्यजीवांबाबत संशोधन, निसर्ग संवर्धन आणि शिक्षण या क्षेत्रांतील कामगिरीबद्दल हा पुरस्कार आहे आणि डॉ. गाडगीळ यांनी या तिन्ही क्षेत्रांत मुद्रा उमटविली आहे.
 डॉ. गाडगीळ हे हस्तिदंती मनोऱ्यात बसून काम करणारे शास्त्रज्ञ नाहीत. अभ्यास व संशोधनासाठी त्यांनी निवडलेला विषयही प्रयोगशाळेपुरता मर्यादित नाही.

भारतीय रेल्वेचा ‘स्वावलंबी रेल्वे स्थानक’ उपक्रम

उत्तम तंत्रज्ञानाचा अवलंब करुन आणि संसाधनांचा इष्टतम वापर करून भारतीय रेल्वे देशाभरात स्वावलंबी रेल्वे स्थानकांचा विकास करीत आहे. या स्थानकांमध्ये वापरकर्त्यासाठी सुरक्षित, अनुकूल अश्या सोयी-सुविधा, मूल्यवर्धित सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच कार्यक्षमता वाढविण्यासाठी उच्च मानके पाळली जाणार आहेत.

लक्ष्मीबाई टिळक

लक्ष्मीबाई टिळक या महाराष्ट्रातील थोर कवयित्री होत्या. त्याकाळातील पद्धतीनुसार त्यांच्या आई वडिलांनी लक्ष्मीबाई यांचा विवाह बालपणीच नारायण वामन टिळक यांच्याशी लावून दिला. ते सुद्धा मराठीतील श्रेष्ठ कवी होते. लक्ष्मीबाई यांनी स्मृती चित्रे नावाने आत्मचरित्र लिहून ठेवले. मराठी साहित्यातील त्याला मोठा ठेवा मानला जातो. ते चार भागांमध्ये प्रसिद्ध झाले. या आत्मचरित्राचे जोसेफाईन इंकस्टर यांनी इंग्रजीमध्ये भाषांतर केले.

वाढवा सामान्य ज्ञान


वाढवा सामान्य ज्ञान
उत्तर : १) १९0५ २) डॉ. एस राधाकृष्णन ३) छाती ४) जम्मू-श्रीनगर महामार्ग ४) चायनिज व्हाइट डॉल्फिन
१) 'भारत सेवक समाज' या संस्थेची स्थापना कधी झाली?
२) 'हिंदू व्हय़ू ऑफ लाइफ' चे लेखक कोण?
३) प्ल्युरसी हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?
४) चेनानी-नाशिरी हा आशियातील सर्वात जास्त लांबीचा बोगदा कोणत्या महामार्गावर आहे?

स्वच्छतेचा कानमंत्र देणारे संत गाडगेबाबा

रामधुनपूर्वी गावं पूर्ण,
व्हावे स्वच्छ, सौंदयवान
कोणाही घरी गलिच्छपण
न दिसावे
देशात सध्या सफाई अभियान जोरात सुरू आहे. देशाच्या पंतप्रधानाने सामान्य माणसाला हातात झाडू घेऊन आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रेरित केले. पण तुम्हाला माहित आहे का स्वच्छतेचे खरे जनक हे फार अगोदर जन्मून गेले आहे. होय, संत गाडगेबाबा यांनी फार वर्षांपूर्वी स्वच्छतेचा कानमंत्र जनसामान्यापयर्ंत पोहोचवलेला.

Saturday, 22 February 2020

नट्या 'आयटम सॉंग' किती पैसे घेतात माहीत आहे का?

बॉलिवूडच्या चित्रपटात आयटम नंबर नसेल तर चित्रपट आपल्यापैकी अनेकांना बेरंग वाटतो. ठेका धरायला लावणार्‍या गाण्यांचे शौकिन आपल्यामध्ये अनेकजण असतात. त्याचबरोबर चित्रपटांची प्रसिद्धी देखील या आयटम नंबरमुळेच होते त्यामुळे प्रत्येक निर्मात्याला आपल्या चित्रपटात एक तरी आयटम नंबर ठेवावाच लागतो. त्यांचा असा विश्‍वास असतो, की आपला चित्रपट या आयटम नंबरमुळे हिट होऊ शकतो. पण तुम्हाला माहित आहे का या आयटम नंबरवर थिरकणार्‍या अभिनेत्री यासाठी किती मानधन घेतात. तर आम्ही आज तुम्हाला याबद्दलची माहिती देणार आहोत.

'श्वास-उच्छवास' माहीत जाणून घ्या

शक्तीच्या उत्पादनासाठी व शारीरिक उष्णता कायम ठेवण्यासाठी आपल्या आहारातील पेस्ट व स्निग्ध पदार्थांचे ज्वलन शरीरातील पेशीजालात सतत चालू असते. या ज्वलनाला प्राणवायूची आवश्यकता असते. ती पूर्ण करण्यासाठी नाकाने हवा आत घेण्याच्या क्रियेस 'श्वास' असे म्हणतात. कर्बद्विप्राणिल वायू, पाण्याची वाफ वैगरे अशुद्ध पदार्थ बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेस 'उच्छ्वास' असे म्हटले जाते. या दोन्हीला मिळून आपण श्वासोच्छ्वास असे म्हणतो. ही क्रिया श्वसनसंस्थेकडुन पूर्ण केली जाते.

काकासाहेब चितळे

वडिलांनी वाढवलेल्या या व्यवसायाला आधुनिक रूप देण्याचे काम काकासाहेबांनी केले. चितळे डेअरी आणि मराठी माणसाचे नाते केवळ घरोघरी सकाळी-सकाळी पोहोचणाऱ्या त्यांच्या दुधामुळे नाही; तर हा व्यवसाय करताना त्यांनी आजवर जपलेले चारित्र्य, मूल्य आणि ग्राहकहित यातून बांधले गेलेले आहे. हे असे अतूट बंध काही एका रात्री तयार होत नाहीत. त्यासाठी सलग तीन तीन पिढय़ांना या उत्पादनाशी तना-मनाने स्वत:ला बांधून घ्यावे लागते.
-  चितळेंच्या या प्रवासातील एक महत्त्वाचे नाव दत्तात्रय भास्कर तथा काकासाहेब चितळे, ज्यांचे नुकतेच देहावसान झाले. मॅकेनिकल इंजिनीअर असलेले काकासाहेब शिक्षण पूर्ण होताच वडील भास्कर तथा बाबासाहेब चितळेंसोबत ‘चितळे उद्योग समूहा’त कार्यरत झाले.

दिनविशेष

२२ फेब्रुवारी – घटना
१८१९: स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.
१९४२: दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.
१९४८: झेकोस्लोव्हाकिया मध्ये कम्युनिस्ट क्रांती.
१९५८: इजिप्त आणि सीरिया या देशांनी एकत्र येऊन युनायटेड अरब प्रजासत्ताक तयार केले.
१९७८: श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९७९: सेंट लुशिया ला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.
२२ फेब्रुवारी – जन्म
१७३२: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १७९९) #1st
१८३६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९०६)
१८५७: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिच हर्ट्‌झ यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी१८९४) #Science
१८५७: बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९४१)
१९०२: जर्मन भौतिकशात्रज्ञ फ्रिट्झ स्ट्रासमान यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९८०)
१९२०: चरित्र अभिनेता इफ्तिखार यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९९५)
१९२२: व्हायोलिनवादक व्ही. जी. जोग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी२००४)
१९६४: मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेमचे निर्माते एड बून यांचा जन्म.
१९७५: अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता ड्रिव बॅरीमोर यांचा जन्म.

Friday, 21 February 2020

दिनविशेष

२० फेब्रुवारी – घटना
१७९२: अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.
१९७८: शेवटचा ऑर्डर ऑफ व्हिक्टरी सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.
१९८७: मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले.
२०१४: तेलंगण हे भारताचे २९ वे राज्य बनले.
२० फेब्रुवारी – जन्म
१८४४: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९०६)
१९०१: इजिप्त चे पहिले अध्यक्ष मिसर मुहम्मद नागुईब यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट १९८४)
१९०४: रशियाचे पंतप्रधान अलेक्सी कोसिजीन यांचा जन्म.

Thursday, 20 February 2020

वाढवा सामान्य ज्ञान


वाढवा सामान्य ज्ञान
उत्तर : १) टोकियो २) ३ मार्च २00६ ३) डॉ. विजय केळकर  ४) २७ ऑक्टोबर २00५ ५) अंबर दिवा
१) १९५८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा कोठे आयोजित केल्या होत्या?
२) बुश आणि मनमोहनसिंग यांनी नागरी अणुसहकार्य करार करण्याची घोषणा कधी केली?
३) तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण?
४) संस्कृत भाषेला अभिजात दर्जा कधी मिळाला?
५) आपत्तीकाळात अग्निशमन वाहनावर कोणता दिवा लावण्याची परवानगी आहे?

जयश्री गडकर

व्ही. शांताराम यांच्या 'झनक झनक पायल बाजे' या चित्रपटात एका गाण्यात संध्या यांच्यामागे समूहात नृत्य करणारी एक युवती असा जयश्रीजींचा प्रवास सुरू झाला व पुढे जाऊन जयश्री गडकर नावाचा एक अलौकिक इतिहास आकाराला आला. मेहनत करण्याची तयारी, कोणत्याही प्रकारच्या कष्टात माघार न घेणे व व्यावसायिक निष्ठा या गुणांवर 'जयश्री गडकर' या नावाभोवती 'वलय आणि वळण' आकाराला आले. राजा परांजपे दिग्दर्शित 'गाठ पडली ठका ठका' या चित्रपटात त्यांना सर्वप्रथम महत्त्वाची भूमिका मिळाली.
१८२९: कित्तूरची राणी चन्नम्मा यांचे निधन.
१८९४ : वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरुप भटनागर यांचा जन्म.
१८९६: हिन्दी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचा जन्म.
१९४२ : अभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म.
१९९१ : चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचे निधन.
१९९८ : चरित्र अभिनेते ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ओमप्रकाश यांचे निधन.
१९९९ : पन्नास वर्षांपासून बंद पडलेली दिल्ली-लाहोर बससेवा सुरू झाली.
२0१३ : शक्तिशाली बाँबस्फोटांच्या मालिकेने हैदराबाद हादरले. दिलसुखनगरमध्ये तीन स्फोट. २0 जण ठार तर ८0 जखमी. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. मुंबईसह राज्यात हाय अँलर्ट.
२0१८ : पीएनबी गैरव्यवहारातील मुख्य आरोपी नीरव मोदीची अलिबागमधील मालमत्ता सीबीआयकडून जप्त.

Tuesday, 18 February 2020

आंग सान स्यूची: लोकशाहीसाठीचा संघर्ष

ब्राह्मी जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा देत, ब्रह्मदेशाचा इतिहास नव्यानं लिहू पाहणाऱ्या आंग सान स्यू या रणरागिणीची संघर्षकथा नव्या पिढीला प्रेरक आहे. ब्रह्मदेश हा आपला अगदी शेजारी देश. मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला म्हणून आणि हा पॅगोडांचा देश आहे. एवढीच आपल्याला या देशाची ओळख आहे. पण, हा देश जगात सर्वाधिक काळ हुकूमशाही असलेला आणि सर्वाधिक काळ संपूर्ण लोकशाहीसाठी लढा देणारा देश आहे. आणि या आपल्या मातृभूमीसाठी इंग्लंडमधली नोकरी, घर, संसार, पती आणि दोन मुलं सगळं सोडून आंग सान स्यू ची ही ब्रह्मदेशी स्त्री, राजकारणात उतरते. सरकारच्या जुलमी राजवटीविरुद्ध अहिंसक मार्गानं लढा देण्यासाठी स्वत: समवेत सगळ्या देशाला उद्यक्त करते, वाटेल त्या हालअपेष्टा सोसत, हकूमशाही विरुद्ध निर्भयपणे उभी राहण्याची शिक्षा म्हणून वर्षानुवर्षे स्थानबद्ध राहते, आपला संसार, हसरं सुखी कुटुंब कायमचं सोडून द्यायला

Monday, 17 February 2020

ट्वेन्टी-20 महिला विश्वचषक स्पर्धेचा इतिहास

महिला ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 21 फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत. या स्पर्धात 10 संघाचा समावेश असून आपल्या भारताला एकदाही विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. मात्र यावेळेला विश्वचषकाची आशा निर्माण झाली आहे. हरमनप्रित कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. 2009 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आतापर्यंत चार वेळा ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले आहे. यजमान ऑस्ट्रेलिया संघ याही वेळेला आपली मक्तेदारी सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे.