Monday, 24 February 2020

शांता आपटे

भारतीय चित्रपटामधील झंझावाती अभिनेत्री म्हणुन ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते अशा काही मोजक्या स्त्रीकलाकारांमधील शांता आपटे हे नाव वर्तमानकाळातील कलाकारांना प्रेरणा देत आहे. त्या काळात पार्श्‍वगायनाची संकल्पना रुजली नसल्याने बहुधा गायक-गायिकाच रुपेरी पडद्यावर भूमिका करत. पण, शांता आपटे म्हणजे गायन आणि चतुरस्र अभिनयाचा आविष्कार होत्या. शांता आपटेंचे शिक्षण चौथी पर्यंतचे, त्यानंतर घरीच त्यांना शिकविण्यासाठी शिक्षक येत. अभ्यासाव्यतिरिक्त वयाच्या पाचव्या वर्षापासून गायनाचे धडेसुद्घा शांता आपटेंना दिले गेले.
पुण्यात असताना बापूराव केतकर यांच्याकडे शिक्षणाचे पहिले प्रशिक्षण घेतले. कालांतराने त्यांच्या वडिलांची बदली पंढरपूरला झाली. त्यामुळे तिथे गायन आणि संगीताचे प्रशिक्षण नारायण बिवा थिटे व मास्टर कृष्णराव यांच्याकडून घेतले. लहान वयातच शांताबाई गायनाचे लहान-मोठे जलसेही करू लागल्या. अशा या गोड गळय़ाच्या गायिकेला अभिनयाचीही संधी मिळाली. पण, अभिनयासाठी सर्वच गोष्टी अवगत असणे गरजेचे आहे हे त्यांना माहिती असल्याने त्यांनी ड्रायव्हिंग, स्वीमिंग यासारखे प्रकार शिकून घेतले. नृत्यात तर त्या निपुणच होत्या.

No comments:

Post a Comment