Monday, 24 February 2020

भारतीय रेल्वेचा ‘स्वावलंबी रेल्वे स्थानक’ उपक्रम

उत्तम तंत्रज्ञानाचा अवलंब करुन आणि संसाधनांचा इष्टतम वापर करून भारतीय रेल्वे देशाभरात स्वावलंबी रेल्वे स्थानकांचा विकास करीत आहे. या स्थानकांमध्ये वापरकर्त्यासाठी सुरक्षित, अनुकूल अश्या सोयी-सुविधा, मूल्यवर्धित सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच कार्यक्षमता वाढविण्यासाठी उच्च मानके पाळली जाणार आहेत.

 प्रवाशांचे समाधान आणि अनुभव उत्तम करण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेनी अश्या प्रकारचे पहिले स्थानक म्हणून नवी दिल्लीतल्या आनंद विहार स्थानकाचे रूपांतरण केले.
 प्रवाशांना स्वस्त दरात उच्च प्रतीची औषधे देण्याच्या उद्देशाने ‘जेनेरिक औषधालय’ उभारले. हा उपक्रम भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच राबवला जात आहे. स्थानकावर मसाज कियोस्क, पल्स हेल्थ मशीन अश्या सुविधा देखील आहे, ज्यांचा लाभ प्रवासी कमी किंमतीत घेऊ शकतात.
▪️नवी दिल्लीत राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सवाचे आयोजन
 21 फेब्रुवारी 2020 रोजी नवी दिल्लीत ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सव’चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल ह्यांच्या हस्ते झाले.
 “अनलीशिंग इंडियाज ऑर्गेनिक मार्केट पोटेन्शियल” हा या महोत्सवाचा विषय आहे.
भारतातली सेंद्रिय बाजारपेठ वार्षिक 17 टक्क्यांच्या वृद्धीने वाढत आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यावर भर देण्यात येत असल्याने केवळ सेंद्रिय खतांपासून घेतलेल्या पिकांना सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे.

No comments:

Post a Comment