Monday, 24 February 2020

लक्ष्मीबाई टिळक

लक्ष्मीबाई टिळक या महाराष्ट्रातील थोर कवयित्री होत्या. त्याकाळातील पद्धतीनुसार त्यांच्या आई वडिलांनी लक्ष्मीबाई यांचा विवाह बालपणीच नारायण वामन टिळक यांच्याशी लावून दिला. ते सुद्धा मराठीतील श्रेष्ठ कवी होते. लक्ष्मीबाई यांनी स्मृती चित्रे नावाने आत्मचरित्र लिहून ठेवले. मराठी साहित्यातील त्याला मोठा ठेवा मानला जातो. ते चार भागांमध्ये प्रसिद्ध झाले. या आत्मचरित्राचे जोसेफाईन इंकस्टर यांनी इंग्रजीमध्ये भाषांतर केले.
त्याला फालो आफ्टर हे नाव देण्यात आले. तर नारायण टिळक यांनी मराठी ख्रिस्तायन ग्रंथ लिहिला. यामध्ये त्यांनी भगवान येशू ख्रिस्ताच्या कार्याविषयी माहिती दिली. नारायणराव टिळकांनी ख्रिस्तीधर्म स्वीकारला तेव्हा असह्य होऊन खोलीचे दार लावून भावना मोकळ्या करतांना लक्ष्मीबाई काही ओळी कागदावर लिहितात, म्हणे जातो सोडून नाथ माझा । अतां कवणाला बाहुं देवराजा । सर्व व्यापी सर्वज्ञ तूंच आहे । सांग कोणाचे धरू तरी पाये ।। इथेच त्यांच्या पहिल्या कवितेचा जन्म होतो. ज्याकाळी महिला घराबाहेर पडत नसत त्याकाळी एक बाई १९३३ सालच्या कवी संमेलनाची स्वागताध्यक्षा होऊन आपल्या धारदार भाषणाने कवी संमेलन गाजवते ही आश्‍चर्याचीच गोष्ट होती. रे. टिळकांनी लिहिलेल्या ह्यख्रिस्तायनाच्या साडेदहा अध्यायात चौसष्ट अध्यायांची भर घालून लक्ष्मीबाईंनी ते महाकाव्य पूर्ण केले. १९0९ च्या मनोरंजनच्या दिवाळी अंकात करंज्यतला मोदक ही कल्पनापूर्ण भावकविता प्रसिद्ध झाली आणि महाराष्ट्रात त्यांची कवयित्री म्हणून कीर्ती पसरली.

No comments:

Post a Comment