लंडन येथे रंगलेल्या ब्रिटएशिया सौंदर्यस्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रद्धा मेघराजनं मिसेस किताब पटकावला आहे. ब्रिटएशिया ही स्पर्धा प्रामुख्यानं लंडनमधील आशियातील नागरिकांसाठी आयोजित केलेली आहे.कामानिमित्त लंडनमध्ये स्थायिक झालेले आशियातील नागरिक या स्पर्धेत भाग घेतात. यंदा मिसेस ब्रिटएशिया २०१९चा किताब श्रद्धानं आपल्या नावावर केला आहे.
ब्रिटएशिया सौंदर्यस्पर्धेत महाराष्ट्राच्या श्रद्धा मेघराजनं मिसेस ब्रिटएशियाचा किताब पटकावला आहे. ब्रिटएशिया ही स्पर्धा प्रामुख्यानं आशियातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात येते. कामानिमित्त लंडनमध्ये स्थायिक झालेले आशियातील नागरिक या स्पर्धेत भाग घेतात. यंदा मिसेस ब्रिटएशिया २०१९चा किताब श्रद्धानं आपल्या नावावर केला आहे. श्रद्धा मुळची मुंबईतील गिरगाव येथील असून लग्नानंतर ती लंडनमध्ये स्थायिक झाली. लंडनमधील हॅरो शहराचे महापौर नितीन पारेख यांच्यासोबत श्रद्धा. ब्रिटएशियानं लंडनमध्ये स्थायिक असलेल्या आशियातील तरुण-तरुणींसाठी मोठी संधी उपलब्ध केली आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात अनेक तरूण मंडळी या स्पर्धेत आपलं नशीब आजमवतात.
No comments:
Post a Comment