रांगेय राघव हिंदी साहित्यातील विलक्षण
कादंबरीकार,कथाकार, निबंधकार,
टीकाकार, नाटककार, कवी आणि
इतिहास होते. त्यांना हिंदी साहित्यातील सेक्सपिअर म्हटले जाते.
ते मुळता: तामिळभाषी होते. त्यांचा जन्म 17 जानेवारी 1923 रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे झाला होता. राघव यांचे
मूळ नाव तिरुमलै नंबाकम वीर राघव आचार्य होते. त्यांना नंतर रांगेय
राघव या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांचे शिक्षण आग्रा येथे झाले.
1944 मध्ये सेंट जोन्स कॉलेजमधून पदवीत्तेर शिक्षण घेतले. नंतर 1948 मध्ये त्यांनी आग्रा विद्यापीठातून गुरु गोरखनाथ
यांच्यावर पीएचडी केली. वयाच्या तेराव्या वर्षांपासून रांगेय
राघव यांनी लिहायला सुरुवात केली होती. त्यांच्या लिखाणाची सुरुवात
कवितेने झाली. रांगेय राघव यांची पहिली रचना 1946 मध्ये घरौंदा शिर्षकाने प्रकाशित झाली. ही विद्यापीठ
जीवनावर लिहिलेली पहिली कादंबरी होती. घरौंदा या कादंबरीने ते
प्रगतिशील कथाकार रुपाने चर्चेत आले. 1942 मध्ये दुष्काळग्रस्त
बंगालचा प्रवास करून आल्यानंतर त्यांनी तुफानोंका बीच रिपोर्ताज लिहिला. त्याला खूपच प्रसिद्धी मिळाली. साहित्याव्यतिरिक्त त्यांना
चित्रकला, संगीत आणि पुरातत्त्व क्षेत्रातही रुची होती.
रांगेय राघव यांच्या बहुतांश ऐतिहासिक
कादंबर्या महिलांच्या नावाने लिहिल्या आहेत.चरित्रात्मक कादंबर्या आहेत. जसं
की भारती का सपूत. की भारतेंदु हरिश्चंद्र
यांच्या जीवनावर आधारित आहे. लखिमा की आँखे विद्यापतींच्या जीवनावर
आहे. रत्ना की बात तुलसींच्या जीवनावर तर देवकी का बेटा श्रीकृष्णवर
आधारित आहे. याशिवाय रांगेय राघव यांनी ऐतिहासिक किंवा पौराणिक
पात्रांना एका स्त्रीच्या नजरेतून पाहण्याच्या प्रयत्न केला आहे. त्याकाळात हिंदी साहित्यात आधुनिक स्त्री विमर्शाच पदार्पणही ठीकसं झालं नव्हतं.
गदल ही कथा आधुनिक स्त्री विमर्शाच्या कसोटीवर पूर्णपणे उतरली होती. ही कथा खूप प्रसिद्ध झाली.
या कथेचा विदेशी भाषांमध्येही अनुवाद झाला. रांगेय
राघव यांच्या कब तक पुकारुं या प्रसिद्ध कादंबरीवर एक टिव्ही मालिकाही बनली होती.1948
मध्ये मुर्दों का टीला ही दुसरी कादंबरी प्रसिद्ध झाली. याची कथा सिंधु घाटीच्या संस़्कृतीवर आधारित होती.
रांगेय राघव यांनी जर्मन आणि फ्रान्समधील
काही लेखकांच्या रचना हिंदीत अनुवादीत केल्या. त्यांनी
सेक्सपिरच्या दहा नाटकांचा हिंदीमध्ये अनुवाद केला. अनुवाद मूळ
रचनेशी साधर्म्य साधणारे असल्याने त्यांना हिंदीचे सेक्सपिअर म्हटले जाऊ लागले.
संस्कृत रचनांबरोबरच विदेशी साहित्यांचाही हिंदीत अनुवाद केला.
रांगेय राघव यांच्याबाबतीत सांगितले जाते की, जितक्या
कालावधीत एकादे पुस्तक वाचले जाते, तितक्या कालावधीत ते पुस्तक
लिहून पूर्ण करायचे.
रांगेय राघव यांनी तामिळ, तेलगूशिवाय हिंदी, इंग्रजी,
ब्रज आणि संकृत भाषेचे विद्वान होते. त्यांना साहित्यातील
सगळ्या प्रकारात प्राविण्य होते. त्यांनी एकोणचालीस वर्षाच्या
अल्प आयुष्यात कादंबरी, कथा, कविता,
टीका, नाटक, प्रवास वर्णन,
रिपोर्ताज लिहिले. याशिवाय संस्कृती, समाजशास्त्र,मानवशास्त्र, अनुवाद,
चित्रकारी, शोध आणि व्याख्या या क्षेत्रात दीडशेपेक्षा
अधिक पुस्तके लिहिली. आपल्या अद्भुत प्रतिभा, असाधारण ज्ञान आणि लेखन क्षमता या कारणाने त्यांना अद्वितीय लेखक मानले जाते.
रांगेय राघव यांना 1951 मध्ये हिंदुस्थानी अकादमी पुरस्कार, 1954
मध्ये दालमिया पुरस्कार, 1957 आणि 1959
मध्ये उत्तर प्रदेश सरकारचा पुरस्कार आणि 1961 मध्ये राजस्थान साहित्य अकादमीने सन्मानित करण्यात आले. 1966 मध्ये मरणोत्तर महात्मा गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे निधन 12 सप्टेंबर 1962 मध्ये झाले.
No comments:
Post a Comment