Wednesday, 22 January 2020

सोन्यापेक्षा महाग धातू पॅलेडीयम

जगाच्या बाजारात सध्या सोन्याच्या किमती वाढत असल्या तरी सोन्यापेक्षाही अधिक वेगाने एका धातूच्या किमती बाजारात वाढत चालल्या असून या धातूचे नाव आहे पॅलेडीयम. गेल्या दोन आठवड्यात या धातूंच्या किमती २५ टक्क्यांनी वाढल्या असून गेल्या एक वर्षात त्या दुप्पट झाल्या आहेत.

प्लॅटीनम, रुथेनियम, र्‍होडीयम, ओस्मिनीयम, इरिडियम या कुळातला पॅलेडीयम हा चमकदार पांढरा धातू असून त्याची सध्याची किंमत १ औसाला २५00 डॉलर्स इतकी आहे. हा धातू रशिया आणि द. आफ्रिकेत अधिक प्रमाणात सापडतो. प्लॅटीनम आणि निकेलचा उपधातू म्हणून त्याचा वापर होतो. पेट्रोल आणि हायब्रीड कार मधील एग्झोस्ट मध्ये वापर होणार्‍या कॅटेलिस्ट बनविण्यासाठी तो वापरला जातो. विशेष म्हणजे ८0 टक्के पॅलेडीयमचा वापर कार्बन मोनोक्साईड आणि नायट्रोजन डाय ऑक्साईड या विषारी वायूचे रूपांतर कार्बन डाय ऑक्साईड सारख्या कमी नुकसानकारक वायूमध्ये करण्यासाठी होतो. वीज उपकरणे, दंत चिकित्सा, दागिने यासाठीही त्याचा वापर होतो आणि आजकाल या धातूची मागणी लक्षणीयरित्या वाढली आहे. त्यामानाने त्याचे उत्पादन कमी असल्याने त्याच्या किमती वाढत आहेत असे समजते.
जगभरातील कार उत्पादक कंपन्या, प्रदूषण कमी करण्यासाठी झटत असलेले चीन सारखे देश हे या धातूचे मुख्य ग्राहक आहेत आणि युरोपमध्ये डिझेल कार संबंधी सुरु असलेले विवाद यामुळेही या धातूला मागणी वाढते आहे असे सांगितले जात आहे.

No comments:

Post a Comment