गीता बाली तथा हरिकीर्तन कौर या १९५0 आणि १९६0च्या दशकांतील हिंदी चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांचे कुटुंब सध्याच्या पाकिस्तानमधील सरगोधा शहरातून मुंबईस स्थलांतरित झाल्यावर त्यांनी चित्रपटांत कामे करण्यास सुरुवात केली. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी द कॉबलर या चित्रपटात पहिली भूमिका केली तर १९४६मध्ये बदनामी या चित्रपटात मुख्य भूमिका केली. १९५५मध्ये गीता बाली यांनी शम्मी कपूर यांच्याशी लग्न केले.
शम्मी कपूर हे गीता बालीपेक्षा दोन वर्षांनी लहान होते. जेव्हा हे लग्न झाले तेव्हा शम्मी कपूर फार मोठे अभिनेता या पदाला पोहोचले नव्हते. लग्नापूर्वी गीता बाली यांनी राजकपूर आणि पृथ्वीराज कपूर यांच्यासोबतही काम केले होते. योगिता बाली या गीता बाली यांची पुतणी होत. जानेवारी १९६५मध्ये 'एक चादर मैली सी' या कादंबरीवर आधारित 'राणो' या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असताना त्यांना देवीची बाधा झाली व वयाच्या ३५व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
No comments:
Post a Comment