Tuesday, 21 January 2020

सूर्यकांत त्रिपाठी 'निराला'

सूर्यकांत त्रिपाठी 'निराला' यांचा जन्म बंगालमधील महिषादल रियासत (जिल्हा मिदनापूर) येथे झाला. वसंत पंचमीला त्यांच्या जन्मदिवस साजरा करण्याची परंपरा १९३0 पासून सुरू झाली. त्यांचे वडील पं. रामसहाय तिवारी उन्नावचे राहणारे होते. ते मिदनापूर येथे शिपाई म्हणुन काम करीत होते. निराला यांचे शिक्षण हायस्कूलपर्यंत झाले. नंतर त्यांनी हिंदी, संस्कृत आणि बंगाली या भाषांचा अभ्यास केला.
वडिलांच्या छोट्याश्या नोकरीत निराला यांना सुरुवातीपासूनच प्रतिकूल जीवन मिळाले. पीडित-शोषित असल्याची भावना लहानपणापासून अगदी अबोध अवस्थेपासूनच त्यांच्या मनात रूजली होती. तीन वर्षांचे असताना माता तर विसाव्या वर्षात पदार्पण करताच वडिलांनी साथ सोडली. स्वत:सह संयुक्त कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी निराला यांच्यावर येऊन पडली. पहिल्या महायुद्घानंतर आलेल्या साथीच्या आजाराने पत्नी, काका, भाऊ आणि वहिनी यांचे निधन झाले. तरीही उर्वरित कुटुंबाची जबाबदारी ही त्यांच्या आर्थिक स्थितीच्या मानाने न पेलवणारीच होती. प्रतिकूल स्थितीतही ते तत्वनिष्ठ होते. जीवनाचा उत्तरार्ध त्यांनी अलाहाबाद येथे घालविला. त्यांच्या लेखनाला आजही हिंदी साहित्यात प्रचंड मान आहे. त्यांच्या कविता वेदनेतून आल्याने त्यात समकालिन कवींच्या तुलनेत अधिक आशयगर्भता जाणवते.

   

No comments:

Post a Comment