राम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५0 कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहून गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.
राम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा 'शेक्सपियर' समजले जाते. विविध नाट्यप्रेमी संस्थांनी, राम गणेश गडकरी यांच्या आणि त्यांची पत्नी रमाबाई यांच्या नावाने नाटककारांसाठी आणि नाट्याभिनयासाठी अनेक गडकरी पुरस्कार ठेवले आहेत. गडकरींचा जन्म मे २६, इ.स. १८८५ रोजी नवसारी येथील गणदेवी या गावात झाला. वयाच्या ८व्या वर्षीच त्यांचे वडील गणेश वासुदेव गडकरी निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकरींचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकर्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व त्यानंतरचे शिक्षण फग्यरुसन महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी किलरेस्कर नाटक मंडळीत दाखल झाले. या किलरेस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरिभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.
No comments:
Post a Comment