संगीतातील एक अभ्यासू विदुषी सुनंदा पटनाईक यांचे नुकतेच निधन झाले. वयाच्या चौदाव्या वर्षी आकाशवाणीवरून आपले गायन सादर करणार्या सुनंदाबाईंनी संगीताचे सुरुवातीचे शिक्षण कुंदला आदिनारायण यांच्याकडून आणि नंतर ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि विष्णू दिगंबर पलुस्करांचे शिष्य पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे घेतले. पुण्यात त्यांचे संगीत अध्ययन सुरू असतानाच त्यांनी संगीत विषयात पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांना संगीत शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही मिळाली.
ओडिशा संगीत नाटक अकादमी, ओडिशा सोसायटी ऑफ अमेरिकन्स यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झाल्या. हे नाव अभिजात संगीताच्या क्षेत्रात विशेषत्वाने लक्षात राहिले ते त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या गायनशैलीमुळे. तारसप्तकात लीलया हिंडून येताना, त्यांचा सुरांवरचा ताबा कधी ढळला नाही आणि भान व्यक्त करण्याच्या हातोटीलाही ओहोटी लागली नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी आकाशवाणीवरून आपले गायन सादर करणार्या सुनंदाबाईंनी संगीताचे सुरुवातीचे शिक्षण कुंदला आदिनारायण यांच्याकडून आणि नंतर ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि विष्णू दिगंबर पलुस्करांचे शिष्य पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे घेतले. पुण्यात त्यांचे संगीत अध्ययन सुरू असतानाच त्यांनी संगीत विषयात पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांना संगीत शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही मिळाली. ओडिशा संगीत नाटक अकादमी, ओडिशा सोसायटी ऑफ अमेरिकन्स यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झाल्या. सुनंदा पटनाईक यांनी भारतातील बहुतेक सगळ्या संगीत परिषदांमधून आणि महोत्सवांमधून आपले गायन सादर केले. देशाच्या कानाकोपर्यात आपले गायन पोहोचले पाहिजे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची डॉक्टर ऑफ म्युझिक ही पदवी त्यांनी संपादन केली होती. संगीत सादर करणार्या कलावंताने त्या विषयातील आपला अभ्यासही नेटाने सुरू ठेवण्याचे सुनंदा पटनाईक हे आगळे उदाहरण. त्यांच्या निधनाने संगीतातील एक अभ्यासू विदुषी काळाच्या पडद्याआड गेली आहे. भारतीय अभिजात संगीतात स्त्री कलावंतांची संख्या नेहमीच कमी राहिली आहे. विष्णू दिगंबरांनी त्या दृष्टीने केलेल्या अथक प्रयत्नांनंतर विविध घराण्यांमध्ये महिला अभिजात संगीत शिकू लागल्या. स्त्रीला जन्मत:च गायनानुकूल गळा लाभल्याने या कलेत निपुण होण्यास फार सायास करावे लागत नाहीत, असेही दिसून आले. मात्र प्रतिभा आणि सर्जनशीलता यांचे वरदान लाभलेल्या कलावंतांनाच रसिकांकडून मनोमन दाद मिळते
No comments:
Post a Comment