Wednesday, 29 January 2020

रमेश देव

रमेश देव यांचे आडनाव खरे तर ठाकूर देव आहे. त्यांचे बालपण कोल्हापुरात गेले. राजर्षी शाहू महाराजांमुळे त्यांचे आडनाव देव झाले. देव यांचे वडील त्या काळातील प्रसिद्घ फौजदारी वकील. महाराजांनी दिलेल्या स्कॉलरशिपवरच ते वकील झाले. एकदा एका कामात त्यांनी महाराजांना मदत केली तेव्हा महाराज म्हणाले, ठाकूर तुम्ही देवासारखे भेटलात. तुम्ही आता ठाकूर नाही-देवच! आणि तेव्हापासून या परिवाराचे देव हेच आडनाव झाले. पु.ल.देशपांडे यांनी एका चित्रपटातील भूमिका नाकारली म्हणून देव यांना चित्रपटात संधी मिळाली. रमेश देव यांनी आजवर पाचशेहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट केले.
आई, गुरू राजा परांजपे आणि पत्नी सीमा यांच्यामुळेच रमेश देव अशी वेगळी ओळख निर्माण झाली हे मात्र नक्की. रमेश देव म्हणजे राजबिंडा नट. त्या काळात त्यांच्या देखणेपणावर अनेक मुली फिदा असायच्या. रमेश देव यांच्याशिवाय मराठी सिनेसृष्टीचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही. केवळ हिरो म्हणूनच नाही तर खलनायक, चरित्र अभिनेता म्हणूनही त्यांनी कारकीर्द गाजविली

No comments:

Post a Comment