1) ज्याचे मन मजबूत नाही, त्याचे शरीर कितीही धिप्पाड असले तरी त्याचा उपयोग नाही.-लोकमान्य टिळक
2) माझा सर्वात चांगला मित्र तोच जो
मला मी न वाचलेले एक पुस्तक भेट देईल.- अब्राहम लिंकन
3) एक वेळ सर्वस्व गमावले तरी चालेल,पण आपली बुद्धी गमावू नका.- आर्य चाणक्य
4) वैफल्य वणवणू शकते. ते वाट शोधू शकत नाही.- बाबा आमटे
5) मी कोणालाही काही शिकवू शकत नाही.
मी फक्त त्यांना विचार करायला लावू शकतो.- सॉक्रेटिस
6) होणार ते होय. न होणार ते न होय। सुखदु:ख पाहे कर्माधीन॥- संत चोखामेळा
7) दुसर्यापेक्षा
अधिक सुखी होण्याची इच्छा बाळगली नाही तर प्रत्येक माणूस सुखी होईल.-गौतम बुद्ध
8) ज्ञानावर आधारलेला संयम, अज्ञानावर आधारलेल्या भोळेपणापेक्षा अधिक चांगला.- डॉ.
सर्वपल्ली राधाकृष्णन
9) वीराची योग्यता त्याच्या मरणावर अवलंबून
नसून तो लढतो कसा यावर आहे.- स्वातंत्र्यवीर सावरकर
10) उचित ध्येयाच्या दिशेने उद्दिष्टपूर्तीकडे
होणारी वाटचाल म्हणजे यश.- अर्ल नाइटिगेल
11) मनाने खचून न जाता आलेल्या अपयशाचा
स्वीकार करणे ही ध्येयाची सर्वात मोठी कसोटी आहे.- रॉबर्ट ग्रीन
12) स्वत:च्या अज्ञानाची
नम्र कबुली हाच तत्त्वज्ञानाचा परिपाक होय.- आर.डी. हीचकॉक
13) जे माणसाला माणूस म्हणून जगू देत नाही
ते तत्त्वज्ञान व्यर्थ समजावे.- जॉर्ज हर्बर्ट
14) काहीही करण्यापूर्वी त्या गोष्टीची
पूर्ण तयारी करणे हेच यशस्वी होण्याचे रहस्य आहे.- अलेक्झांडर
ग्रॅहम बेल
15) पुस्तकासारखा प्रामाणिक मित्र नाही.-
अर्नेस्ट हेमिंग्वे
16) स्वातंत्र्याचा सुवर्ण दरवाजा उघडण्यासाठी
शिक्षण हीच महत्त्वाची बाब आहे.-जॉर्ज वॉश्गिंटन कार्व्हर
17) तुमचा पराभव तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही
प्रयत्न सोडून देता.- रॉबिन शर्मा
18) निढळाचा घाम गाळून श्रमतो त्याचीच पृथ्वीवर
खरी मालकी आहे.-महात्मा गांधी
19) फक्त पुस्तके वाचून ज्ञान साठवणे म्हणजे
विद्या नव्हे. ते ज्ञान जीवनात उतरवणे म्हणजे खरी विद्या.-
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (संकलन-मच्छिंद्र ऐनापुरे)
No comments:
Post a Comment