Saturday, 28 March 2020

ग्रहणे क्वचित का घडतात ?

चंद्र भ्रमण करीत असताना कधी कधी तो पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये थेटपणे आडवा येतो . त्या वेळी पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्याची सावली पडते आणि सूर्यग्रहण घड़ते ! चंद्र जेव्हा नवा असतो तेव्हा सूर्यग्रहण होते , तर मग प्रत्येक पौर्णिमेनंतर चंद्र जेव्हा नवा बनतो तेव्हा दर वेळी सूर्यग्रहण का घडत नाही ? कारण दर वेळी चंद्र थेट आडवा येत नाही . त्याचे भ्रमण पृथ्वीच्या कक्षेच्या थोडेसे वर - खाली होते . सूर्यग्रहण पूर्णत : म्हणजे खग्रास असू शकते किंवा अंशतः असू शकते . चंद्राचे अंतर पृथ्वीपासून नेहमी सारखे नसते .
जेव्हा चंद्र सूर्याला पृथ्वीपासून पूर्णत : झाकतो तेव्हा खग्रास सूर्यग्रहण होते . काही वेळा अंशत : सूर्यग्रहणात सूर्याची बारीक वर्तुळाकार कडा दिसते . चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेच्या दिवशी होते . कारण तो सूर्यापासून पृथ्वीच्या अगदी विरुद्ध दिशेला असतो . सूर्याच्या बाजूने पाहिल्यास जेव्हा चंद्र पृथ्वीच्या थेट मागे येतो , तेव्हा तो पृथ्वीच्या सावलीमधून सावकाशपणे दृष्टीआड होतो . अशा वेळी खग्रास चंद्रग्रहण होते . काही वेळा अंशत : चंद्रग्रहण होऊ शकते .चंद्रग्रहण काही वर्षांमध्ये होत नाही . उलट काही वर्षांमध्ये एक ते तीन चंद्रग्रहणे होतात ; पण प्रत्येक वर्षांत निदान दोन सूर्यग्रहणे होतातच , काही वेळा एका वर्षात पाच सूर्यग्रहणे झाली होती . पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कोणत्याही एका स्थळी खग्रास सूर्यग्रहण सुमारे ३६० वर्षाच्या कालावधीनंतर एकदाच दिसू शकेल !

No comments:

Post a Comment