1)' बदाम ' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?
पर्शियन ,
2) ' हारा - किरी ' या जपानी शब्दाचा शब्दशः अर्थ काय ?
पोट कापणे , जपानी पद्धतीची आत्महत्या .
3) ' एस्कीमो ' म्हणजे काय ?
कच्चे मांस खाणारा .
4) कलकत्ता हे नाव इंग्रजांनी दिले . या शहराचे मूळ बंगाली नाव कोणते ?
कालीकट्टा किंवा कालीघाट .
5) बिहार हे नाव कसे निर्माण झाले ?
व्हिर या शब्दापासून . बौद्ध मठाला ' विहार ' म्हणतात .
6) केरळ हा शब्द ' केरा ' या शब्दापासून निर्माण झाला आहे . ' केरा ' चा अर्थ काय ?
नारळ . केरळ राज्यात भारताच्या एकूण नारळ उत्पादनापैकी ६० टक्के नारळ पिकतात .
7) तामिळनाडू या शब्दातील ' नाडू ' म्हणजे काय ?
भूमी .
8) मिझोराम या शब्दातील ' मिझो ' म्हणजे काय ?
टेकडीवर राहणारा .
9) भाषेमध्ये 0 . K . हा शब्द कसा आला ?
अमेरिकन बोलभाषेत ' oll Korrect म्हणतात , त्याचा अर्थ ' सर्व काही ठीक आहे !
10)' बायबल ' हा शब्द ग्रीक भाषेतून आला . त्याचा शब्दश : अर्थ काय ?
पुस्तक . ग्रीक भाषेत biblion हा शब्द biblos या शब्दापासून निमाण झाला आहे . त्याचा अर्थ ' कागद ' .
No comments:
Post a Comment