Sunday, 22 March 2020

कोरोनाविषयी माहिती

जगभरात कोरोना व्हायरसमुळे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसचा सगळ्यात जास्त फटका चीनला बसला असे म्हटले जात असले तरी आता सर्वाधिक दणका इटलीला बदला आहे. इथल्या लोकांनी वेळीच काळजी न घेतल्याने त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. आपल्या देशातही वेगाने याचा प्रसार होत असला तरी खबरदारीचा उपाय योजले जात आहे. आपली इटली होऊ नये म्हणून लोकांनी सरकारने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करायला हवे.

अमेरिकेतही या विषाणुची लागण झालेला अनेक रुग्न आहेत. ही व्यक्ती चीनमधल्या वुहान प्रांतातून अमेरिकेत आल्याचे तिथल्या आरोग्य अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. कोरोना विषाणूची सर्वप्रथम माहिती मिळाली ती डिसेंबर महिन्यात. मात्र, आता हा विषाणू चीनची सीमा ओलांडून इतर देशातही पोहोचला आहे. अमेरिकेपूर्वी जपानमध्ये एक तर थायलंडमध्ये दोन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते.
कोरोना विषाणू आहे काय?
रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना व्हायरस असल्याचे सांगितले. कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. मात्र, नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणार्‍या कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे. या नव्या कोरोना विषाणूच्या जेनेटिक कोडचे विेषण करण्यात आले. कोरोना विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. हा नवा विषाणू सार्सच्या जवळचा असल्याचे संशोधकांनी केलेल्या विेषणात आढळले आहे. सार्स प्रकारातला कोरोना विषाणू अत्यंत घातक मानला जातो. २00२ साली चीनमध्ये ८,0९८ लोकांना सार्स विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी ७७४ लोकांचा मृत्यू झाला होता.
कोरोनाची लक्षणे
डोकेदुखी, नाक गळणे, खोकला, घसा खवखवणे, ताप, अस्वस्थ वाटणे, शिंका येणे, धाप लागणे, थकवा जाणवणे, निमोनिया, फुफ्फुसात सूज हा विषाणू अजूनही नियंत्रणात आणता येईल, असे यापूर्वी चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले होते.
कोरोना विषाणू किती गंभीर आहे?
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये साधारणपणे सर्दी-खोकला अशी लक्षणे दिसतात. मात्र, लागण गंभीर असेल तर मृत्यूही ओढावू शकतो. युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गमध्ये प्राध्यापक असलेले मार्क वूलहाऊस म्हणतात, हा नवीन कोरोना विषाणू आम्हाला आढळला तेव्हा आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की त्याचा परिणाम इतका घातक का आहे. सर्दीची सामान्य लक्षणे यात दिसत नाहीत. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे.
कोरोना विषाणू आला कुठून?
हा विषाणुचा नवीन प्रकार आहे. हे प्राण्यांच्या एका प्रजातीतून दुसर्‍या प्रजातीत संक्रमित होतात आणि त्यानंतर मानवालाही संसर्ग होतो. या संक्रमणावस्थेच्या काळात त्याचा शोध लागत नाही.
नॉटिंगम युनिव्हर्सिटीत वायरोलॉजीचे प्राध्यापक असलेले जोनाथ बॉल यांच्या मते, हा अगदी नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आहे. या विषाणूची लागण प्राण्यांमधूनच माणसाला झाली असावी, अशी दाट शक्यता आहे. सार्स हा विषाणू मांजरातून माणसांत आला होता. मात्र, या विषाणूचा मूळ स्रोत कोणता आहे, याची अधिकृत माहिती चीनने अजून दिलेली नाही.
प्रा. वूलहाऊस यांच्या मते लोकसंख्येचे प्रमाण आणि त्याची घनता यामुळे चीममधले लोक लगेच प्राण्यांच्या संपर्कात येतात. ते म्हणतात, येणार्‍या काळात चीनमध्येच पुन्हा असे काही ऐकायला मिळाले, तर त्यात आश्‍चर्य वाटणार नाही.
कोरोना विषाणूचा फैलाव
सहज होतो का?
या विषाणुची लागण एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला झाल्याची अनेक उदाहरणे समोर आल्याचे चीनच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. कोरोना विषाणुग्रस्त रुग्णांची देखभाल करणार्‍या अनेक आरोग्य कर्मचार्‍यांमध्येही या विषाणुची लक्षणे दिसली आहेत, असेही त्यांनी सांगितले. या विषाणुविषयी चिंता वाटण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे या विषाणुमुळे सर्वांत आधी फुफ्फुसांवर परिणाम होतो. या विषाणुची लागण होताच व्यक्तीला खोकला सुरू होतो. मात्र, सध्या जी आकडेवारी मिळते आहे तीच अंतिम असेल, असे आताच म्हणता येणार नाही.
विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे का?
या विषाणूचा परिणाम र्मयादित असेल, असे सुरुवातीला वाटले होते. मात्र, डिसेंबर नंतर अनेक प्रकरणे पुढे आली. या संसर्गाची सुरुवात चीनमधल्या वुहान शहरातून झाली. मात्र, आता या विषाणुचा फैलाव चीनमध्यल्या इतर शहरात आणि चीनबाहेरही झालेला आहे. थायलंड, जपान, अमेरिका , इराण, इराक, लंडन आणि दक्षिण कोरिया आणि बहुतांश देशात कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. वुहान शहरातून आलेले लोक कोरोनाग्रस्त असण्याची शक्यता जास्त आहे. कोरोनाची लागण झालेल्या सर्वच लोकांची ओळख पटली आहे, असे गरजेचे नाही असे तज्ञांचे म्हणणे आहे. नवीन वर्षांत चीन फिरायला गेलेल्या अनेक पर्यटकांच्या माध्यमातून या विषाणूचा फैलाव चीनबाहेरील अनेक देशांमधल्या लाखो लोकांमध्ये झाला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
उपाययोजना
कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांवर स्वतंत्र खोलीत उपचार सुरू आहेत, जेणेकरून इतरांना याचा संसर्ग होऊ नये. प्रवाशांना ताप आहे का, हे तपासण्यासाठी प्रवासी ये-जा करतात अशा सर्व ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय स्वच्छता राखता यावी आणि संसर्ग टाळवा, यासाठी सी-फूड मार्केट काही काळ बंद करण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालय, व्यायामशाळा, जीम, सार्वजनिक कार्यक्रम यावर बंदी घालण्यात आली आहे. या सर्व उपाययोजना भारताता केल्या जात आहेत. सोबतच लोकांना खबरदारीचे उपाय म्हणून अनेक सुचना देण्यात येत आहेत.

No comments:

Post a Comment