Wednesday, 4 March 2020

विसाव्या शतकातील औद्योगिक शोध- व्हेंटिलेटर

(१९४९) 
गंभीर अवस्थेतील रोग्याला श्वासोच्छ्वास घेता येत
नसेल तर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. आधुनिक
व्हेटिलेटरचे पूर्वज होते. लोखंडी फुफ्फुस (Iron Lung). ते १९२८ मध्ये तयार झाले होते. पोलिओ झालेल्या रुग्णाच्या छातीचे स्नायू कमजोर झाल्यास तो श्वास घ्यायच्या अडचणीत येत असे. त्याचा श्वासोच्छवास चालू राहावा यासाठी हे अगडबंब उपकरण प्रामुख्याने तयार झाले होते. त्यात सुधारणा करण्याचे काम १९३१ मध्ये सुरू झाले होते. अमेरिकन जैववैद्यकीय उपकरण शोधक जॉन इमरसन (१९०६-९७) याने त्यात यश मिळवले. त्यात त्याला हार्वर्ड विद्यापीठातील भूलशाख खात्यातील मित्रांची मदत झाली.
१९४० साली पोलिओची मोठी साथ आली होती, तेव्हा अशा यंत्राची गरज वाढली होती, त्याचवेळी शाखक्रिया करताना स्नायू शिथिल करणाऱ्या औषधांचा वापर केला जात असताना रुग्णाची श्वसन यंत्रणा दुर्बळ होत असल्याने, यंत्राची गरज भासत असे.

इमरसनच्या यंत्रात सुधारणा करण्याचे काम चालू असता १९५० च्या आसपास बर्ड व्हेंटिलेटर' तयार झाले. ते गॅसवर चालत असे. त्या सुमारास ब्रिटनमध्ये ईस्ट रॅडक्लिक आणि बीव्हरने तयार केलेली यंत्रे वापरली जात होती. त्यातील मोटार रुग्णाचे फुफ्फुस फुगवण्याचे काम करीत असे. शस्त्रक्रियेच्या वेळी भूल देण्याची द्रव्ये वापरली जात ती ज्वालाग्राही असल्याने शस्त्रक्रिया गृहात मोटारीचा वापर धोकादायक ठरण्याची शक्यता असे. १९५२ साली पॅनले व्हेंटिलेटर तयार झाले. त्यातही गॅसचा वापर होत असल्याने ते निर्धोक नव्हते. त्यामुळे त्यात सुधारणा होऊन 'मनलेट व्हेंटिलेटर' तयार झाले. ते निर्धोक असल्याने युरोपात मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले..
१९८० मध्ये त्यात आणखी सुधारणा होऊन अत्याधुनिक व्हेंटिलेटर तयार झाले. या सर्वांचे पूर्वसूरी होते, १९४९ मध्ये तयार झालेले इमरसनचे व्हेटिलेटर. ज्या रुग्णाला व्यवस्थित श्वास घेता येत नाही, त्याला कृत्रिम त-हेने श्वास देऊन जिवंत ठेवण्याचा मदतगार.

No comments:

Post a Comment