Saturday, 28 March 2020

हिमनग आणि धूर (माहिती आहे का?)

हिमनग कसे निर्माण होतात ?
हिमनदीपासून एक मोठा बर्फखंड तुटतो तेव्हा त्याचा हिमनग बनतो . दऱ्याखोयांमधून हिमनद्या वाहात आहात समुद्रापर्यंत जातात . हिमनदीचा शेवटचा भाग तुटतो व सागरात हिमनग तरंगू लागतो . सागरगामी आगबोटींना हे हिननग खूप धोक्याचे असतात . हिमनगांचे आकार वेगवेगळे असतात .
हिमनगाचा बर्फ सागरी पाण्याच्या तुलनेने फक्त आठ - नवमांश जङ असतो .
म्हणून सागरी पातळीवर एक - नवमांश हिमनग डोकावतो . त्याचा आठ - नवमांश भाग पाण्याखाली असतो . हा भाग आपल्याला दिसत नाही . म्हणून बोटींच्या दृष्टीने हिमनग धोक्याचे ! हिमनगावर आपटून महाप्रचंड आकाराच्या बोटी फुटतात , ' रिटानिक ' नावाची महाप्रचंड बोट १४ एप्रिल १९१२ रोजी रात्रीच्या वेळी हिमनगावर आपटून फुटली . तेव्हा १५१३ माणसे बुडून मेली .
हिमनगामध्ये बर्फाचे प्रमाण खूपच असते . त्यामुळे हिमनगाचे वजन महाप्रचंड असते . १८ , ०० , ०० , ००० टन वजनाचा एक हिमनग एकदा आढळला !
 * धूर म्हणजे काय ?
काही इंधनांच्या अपुऱ्या ज्वलनाचा परिणाम म्हणजे धूर . इंधनामध्ये कर्ब , हैड्रोजन , प्राणवायू , नत्रवायू , घोडेसे गंधक यांचा समावेश असतो . काही वेळा थोडी खनिज राख असते . जर या इंधनांचे अपुरे ज्वलन झाले तर त्यातून कर्बद्विप्राणिल , पाण्याची वाफ व मुक्त नत्रवायू निर्माण होतील . हे घटक अपाबकारक नाहीत .
इंधनाचे पूर्ण ज्वलन होण्यासाठी भरपूर हवा पाहिजे व उच्च तापमान पाहिजे , अशी परिस्थिती उपलब्ध होणे अवघड असते . विशेषत : घनरूप इंधनांच्या बाबतीत त्याचा परिणाम म्हपाजे धूर होतो . धुराचा खूप अपाय होऊ शकतो . माणसाची प्रकृती , संपत्ती यांचे धुरामुळे नुकसान होते . धुरामुळे वनस्पतीवर अनिष्ट परिणाम होतो . औद्योगिकशहरांमध्ये धुरामुळे सूर्यप्रकाश कमी मिळतो . माणसांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असे अतिनील किरण कमी मिळतात . धूर विस्कळित करण्यास वाऱ्याचा उपयोग होतो . ज्या शहरामध्ये धूरमिश्रित धुके साठते तेथे लोकांना फुप्फुसाचे व हृदयाचे रोग होतात . पर्यावरण मोहिमांच्या काळात आपण धुराला आपल्यापासून दूर पिटाळून लावले पाहिजे .

No comments:

Post a Comment