Tuesday, 1 September 2020

नोव्हाक जोकोविच


नोव्हाक जोकोविच हा एक व्यावसायिक सर्बियन टेनिसपटू आहे. जोकोविचने मिलोस राओनिकचा पराभव करून वेस्टर्न आणि सदर्न टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यापूर्वी जोकोविचने २0१८मध्ये प्रथमच ही स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी जोकोविचने अंतिम सामन्यात रॉजर फेडररचा पराभव केला होता. हे जोकोविचचे वर्षाचे चौथे एटीपी टूर विजेतेपद आहे. यावर्षी त्याने ऑस्ट्रेलियन ओपन, एटीपी कप आणि दुबई ड्यूटी फ्री टेनिस स्पर्धा जिंकली आहे.एटीपी जागतिक एकेरी खेळाडूंच्या क्रमवारीत नोव्हाक सध्या प्रथम क्रमांकावर आहे. नोल व जोकर या टोपणनावांनी ओळखला जाणार्‍या नोव्हाकने २00८, २0११, २0१२, २0१३ ,२0१५ ,२0१६ व २0१९ साली ऑस्ट्रेलियन ओपन, २0११, २0१४ व २0१५ साली विंबल्डन व २0११ व २0१५ साली यू.एस. ओपन ह्या दहा ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा तो सर्बियाचा प्रथम टेनिसपटू आहे. तसेच २0१0 साली सर्बियाला डेव्हिस करंडक जिंकून देणार्‍या संघामध्ये जोकोविच होता. २0११ व २0१५ ही वर्षे जोकोविचसाठी सर्वात यशस्वी ठरली आहेत. त्याने २0११ सालामध्ये ७0 एकेरी सामने जिंकले व केवळ सहा सामन्यांत तो पराभूत झाला. त्याच्या ह्या यशाची तुलना जॉन मॅकएन्रोच्या १९८४ सालामधील घोडदौडीसोबत केली जाते. २0११ व २0१५ ह्या दोन्ही वर्षांमध्ये त्याने प्रत्येकी ३ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. एका वर्षात तीन ग्रँड स्लॅम जिंकणारा तो जगातील केवळ सहावा पुरुष टेनिसपटू आहे. त्याचबरोबर त्याने २0११ मध्ये विक्रमी ५ ए.टी.पी. मास्टर्स टेनिस स्पर्धा देखील जिंकल्या. ह्या वर्षात त्याने भूतपूर्व अव्वल टेनिसपटू रफायेल नदालला सलग ६ अंतिम फेरीच्या सामन्यांमध्ये पराभूत केले. २0१२ साली जोकोविचने आपली घोडदौड कायम ठेवली असून वर्षामधील ऑस्ट्रेलियन ओपन ह्या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील अटीतटीच्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा रफायेल नदालचे आव्हान परतवले. सर्बिया, बाल्कन तसेच भूतपूर्व युगोस्लाव्हियाच्या देशांमधील तो सर्वोत्कृष्ट टेनिसपटू मानला जातो. जोकोविचला आजवर अनेक सर्बियन राष्ट्रीय पुरस्कार व बहुमान मिळाले आहेत. पीट सॅम्प्रास ह्या माजी अव्वल टेनिसपटूने आजवर पाहिलेला सर्वोत्तम टेनिस खेळाडू असे जोकोविचचे वर्णन केले आहे.

No comments:

Post a Comment