Saturday, 5 September 2020

मंदिरांचा देश :कंबोडिया


कंबोडियातील अंग्कोरवाट हे जगातील सर्वात मोठे एकमेव मंदिर आहे.तब्बल 200 एकर जागेमध्ये विस्तारलेले अंगकोरवात येथील श्री विष्णूचे मंदिर प्रमुख आकर्षण बिंदू आहे. हे जगातील सर्वात मोठे मंदिर असून ते भारतीय शिल्पकारांनी साकारलेले आहे.अशी हजारो मंदिरे या कंबोडियात असून ती अक्षरशः थक्क करून सोडणारी आहेत.कंबूज नावाचा एक भारतीय माणूस या देशात आला आणि त्याच्या नावाने हा देश ओळखला जाऊ लागला. कंबोडिया हा जगातील एकमेव देश असा आहे की, त्याच्या नावाने हा देश ओळखला जातो. एखाद्या व्यक्तीच्या नावाने देश ओळखला जावा हेदेखील जगातील एकमेव उदाहरण.  १४-१५ व्या शतकापर्यंत कंबोडियावर या व्यक्तीने राज्य केले. यशोवर्धन नावाच्या राजाने या देशामध्ये १०० आश्रम सुरू केलेले होते. गणित, विज्ञान, ज्योतिषशास्त्र, ऋग्वेद यांचा अभ्यास या आश्रमात होत असे. कंबोडियातील संस्कृतीच काय आपण भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला. तर असे लक्षात येते. की जगातील सर्वांत जुनी

आणि आजवर टिकून राहिलेली ही एकमेव संस्कृती आहे. इजिप्त, इराक, बॅबिलोनिया, इटली या देशांच्या संस्कृती जुन्या असल्या तरीही आज त्या लुप्त झाल्या आहेत. भारतीय संस्कृतीचा प्रवाह मात्र अखंडितपणे सुरू आहे. भारताचे मूर्तिशास्त्र हे सामाजिक प्रबोधन, सामाजिक अभिसरण आणि सामाजिक परिवर्तन सांगणारे शास्त्र आहे. त्या अंगाने या मूर्तिकला आणि प्राचीन वारशांचा अधिक सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment