Saturday, 5 September 2020

दुर्मिळ सरडा:ब्रॉड हेड फॅन थ्रोटेड


‘ब्रॉड हेड फॅन थ्रोटेड’ हा सरडा गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मुंबई, पुणे,नाशिक परिसरांत दिसल्याची नोंद आहे. या सरडय़ावर पहिला संशोधन प्रबंध २०१६ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. नाशिक जिल्ह्य़ात प्रथमच हा सरडा दिसल्याची नोंद झाली आहे. ‘स्पाईनी हेडेड थ्रोटेड लिजार्ड’ हा सरडा गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांच्या सखल प्रदेशात आणि उंच स्थानामध्ये गवताळ प्रदेशात आणि खडकांवर, टेकडीवर आढळून येतो. 

समुद्रसपाटीपासून १६८३ ते ३०५१ फूट उंचीवर, गवत आणि खडकाळ प्रदेशात ‘ब्रॉड हेड फॅन थ्रोटेड’ सरडा आढळून येतो. या सरडय़ाच्या खालच्या जबडय़ावर निळ्या पट्टय़ासह किंचित दाबलेले, मध्यम आकाराचे, पांढऱ्या रंगाचे आच्छादन दिसते.  मे, जून आणि ऑगस्ट या कालावधीत नर दगडांवर पिवळा पंखा बाहेर काढून मादीला आकर्षित करण्याबरोबर दुसऱ्या नराला आपल्या क्षेत्रात न येण्यासाठीदेखील इशारा देतो.

सरडाच्या ‘स्पाईनी हेडेड थ्रोटेड लिजार्ड’ या प्रजातीचे नाव  लॅटिन शब्द ‘स्पायने’, ज्याचा अर्थ ‘रीढ’ आणि ग्रीक शब्द ‘सेफ्लस‘, ज्याचा अर्थ ‘डोके’ आहे.  हे त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस वाढविलेले मणक्याचे आकर्षण दर्शवते. हा सरडा गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांच्या सखल प्रदेशांत आणि उंच स्थानामध्ये गवताळ प्रदेशात आणि खडकांवर, टेकडीवर आढळून येतो. मे ते जूनच्या सुरुवातीस ते मादीस आकर्षित करतात.  आतापर्यंत भारतातील कोरडय़ा भागात पाच नवीन प्रजातींचे फॅन-थ्रोटेड सरडे सापडले आहेत.

No comments:

Post a Comment