●●●●●●●
एकदा का चाळीशी पार केली की 'जास्त शिकलेला' आणि 'कमी शिकलेला' दोघेही सारखेच . (कमी शिकलेला कदाचित जास्त पैसे कमावत असेल) पन्नाशीनंतर तर 'सुंदर' आणि 'कुरूप' हा भेदभावच नष्ट होतो....दोन्ही सारखेच (कोण किती का सुंदर असेना या वयात सुरकुत्या, डोळ्यांभोवतालची काळी वलये लपता लपत नाही) साठीनंतर तर 'मोठी पोस्ट' आणि 'लहान पोस्ट' असेही काही उरत नाही....दोन्ही सारखेच (निवृत्तीनंतर तर ऑफिसातला प्यूनदेखील साहेबाला बघायचे टाळतोच.) सत्तरी पार केल्यानंतर 'मोठे घर' आणि 'लहान घर' असा विचार सुद्धा मनात येत नाही....दोन्ही सारखेच (सांधेदुखी बळावून हालचाल करणे मुश्किल झाले की बसण्यापुरती जागा असली तरी पुरे.) ऐंशीनंतर गाठीशी 'भरपूर पैसा' असला काय अन् नसला दोन्ही सारखेच (जरी पैसा खर्च करावासा वाटला तरी स्वतः साठी कुठे अन् कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न उरतोच) नशीबाने नव्वदी पार केली (अभिनंदन) तर 'झोपणे' आणि 'उठणे' यांत सुद्धा फरक राहत नाही...दोन्ही सारखेच (कारण उठून बसल्यावर आता करायचे काय हा गहन प्रश्न उरतोच) अजून शंभरी पार करायची इच्छा आहे का? जीवन साधे-सरळ-सोपे आहे...उगाच नेहमी कुठले तरी गहन कोडे सोडवल्याचा आइन्स्टाइनचा आव आणू नका. लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळे समानच आहोत तेव्हा निर्भेळ आनंद लुटा, हसा.
●●●●●●●
अॅडमिनला पोलीस अडवतो.
पोलीस : गाडी गॅसवर आहे?
अॅडमिन : नाही.
पोलीस : मग डिझेलवर आहे?
अॅडमिन : नाही हो साहेब,
पोलीस : बरं पेट्रोलवर आहे?
अॅडमिन : नाही.
पोलीस : अरे मग कशावर आहे?
अॅडमिन : हप्त्यावर आहे.
●●●●●●●●
भारतात अनेक गाड्यांच्या मागे लिहिलेले असते - बुरी नजरवाले तेरा मुँह काला. जर हे प्रत्यक्षात खरे झाले असते तर आतापर्यंत आपला देश वेस्टइंडीज बनला असता!
●●●●●●●●
संजू : पंडितजी, एखाद्या सुंदर मुलीचा हात मिळवण्यासाठी काय करू?
पंडितजी : एखाद्या मॉलबाहेर मेंदी काढण्याचे काम सुरू कर.
●●●●●●●●●●
प्रत्येकाच्या आयुष्याचा खेळ निराळा असतो. नेमून दिलेले पात्र प्रत्येक जण रंगवत असतो. काय असेल उद्याचा खेळ कुणास ठाऊक असतो. आपण फक्त सापशिडीसारखे चढ-उतार करत असतो. प्रत्येकाला दिलेल्या रंगात जो तो रंगून गेलेला असतो. दुःखातही सुख शोधण्याच्या किमयेत पारंगत झालेला असतो. कधी हार कधी जीत असते, कधी शह कधी मात होते. माहीत नसलेल्या या खेळात आयुष्याची रंगत वाढत जाते.
●●●●●●●●●
'सूर्य' हा बुडताना दिसतो, पण तो कधीच बुडत नाही ! त्याप्रमाणे 'उमेद, विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहे, तो कधीच अपयशी होऊ शकत नाही'! धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच 'यश' मिळत नाही.
No comments:
Post a Comment