१२मे हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. १२मे१८२० हा फ्लोरेन्स नाईंटीगेल यांचा जन्म दिवस. त्यांचा जन्म इटली येथे झाला होता. त्यांनी या आधुनिक परिचारिका व्यवसायाचा पाया रचला. १८५४च्या क्रिमियन युध्दात फ्लोरेन्स नाईंटीगेल या हातात दिवा घेऊन युध्दात जखमी झालेल्या सैनिकांची काळजी घेत असत म्हणून त्यांना "लेडी विथ द लँप" असे संबोधले जाते.
सन. 1947 ला इंडियन नर्सिंग काउन्सिल कायदा संसदेत पास झाला. या कायद्यानुसार परिचर्या प्रशिक्षण व व्यवसायाचा दर्जा समान राखला जातो.
२००४ सर्वेक्षणानुसार देशात १४,२२,४५२ प्रशिक्षित स्री पुरूष परिचारिका होत्या. दरवर्षी १००० प्रशिक्षिण केंद्रातून १०,०००बाहेर पडतात.म्हणजे आज पर्यंत १६लाख स्री पुरूष प्रशिक्षित परिचारिका भारतात आहेत. या मध्ये ए.एन.एम. , जी.एन.एम., बी.एस्सी. , एम.एसी,पि.एच.डी. शिक्षण प्रशिक्षण झालेल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यात सव्वा तीन लाख प्रशिक्षित परिचारिका सरकारी खाजगी क्षेत्रात कार्यरत आहेत. चाळीस हजार प्रशिक्षित परिचारिका सार्वजनिक, सरकारी क्षेत्रात महाराष्ट्र राज्यात आरोग्य सेवक, सेविका, आधिपरिचारिका, परिसेविका,पाठ्यनिर्देशिका, व्याख्याते, प्राध्यापक, प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.
आज या व्यवसायाचेही विज्ञानीकरण, आधुनिकीकरण, जागतिकी करण झाले आहे.
रूग्णालयात बालकाच्या जन्माचे स्वागत परिचारिका करत असते तसेच दुःखाने भरलेल्या मनाने नातेवाईकांना धीर देत मृत्यू झालेल्या रुग्णाला निरोप देत असते.24 तास ती रुग्ण सेवा करत अस्ते म्हणूनच तिला आरोग्य सेवेचा कणl म्हणून संबोधले जाते.
भारत देशाच्या त्रिस्तरीय पंचायत राज मध्ये उत्कृष्ट कामगिरी या परिचारिका करत आहेत. गाव पातळी पासून ते सुपरस्पेशालीटी रूग्णालया पर्यंत या परिचारिका कार्यरत आहेत. सध्या जगभर संसर्गजन्य कोरोना रोगाची साथ चालू आहे. अहोरात्र कोरोना रुग्णांना सेवा देण्याचे काम परिचारिका करत आहेत. हे योद्धे स्वतःचा परिवार विसरून पी. पी. इ. घालून करोना रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम करत आहेत. स्वतः रुग्ण सेवेत दिव्यांच्या वाती होऊन जगाला आरोग्य दायी प्रकाश देत आहेत.
या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने घोष वाक्य आहे "सपोर्ट नर्सेस अँड मीडवाईफ".
म्हणजे जगातील नर्सेस आणि मिडवायफ यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहावे.
No comments:
Post a Comment