Wednesday, 6 May 2020

छत्रपती शाहू महाराज

छत्रपती शाहूमहाराज व भारताचे स्वातंत्र्य यांचे अतूट नाते होते. छत्रपती शाहूमहाराजाचा जन्म २६ जुलै, १८७४ साली कागल थोरली पातीचे जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या घराण्यात झाला. योगायोगाने ते छत्रपती झाले. कोल्हापूरच्या महाराणीने त्यांना दत्तक घेतले. राजकोट येथील संस्थानिकांच्या मुलांसाठी असलेल्या विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. तेथील फ्रेझर या गुरूच्या शिक्षणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला.

२ एप्रिल, १८९४ साली त्यांनी कोल्हापूरच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेतली. २८ वर्षे त्यांनी कोल्हापूरचा कायापालट करण्यात घालविली. १९२२ साली त्यांनी इहलोक सोडला. त्या काळात देशभर कडवे क्रांतिकारक बंड करण्याच्या तयारीत होते. इंग्रज सशस्त्र होते. विवेकानंदांची व्याख्याने अमेरिकेत गाजत होती. पण हा छत्रपती गोरगरीबांचा, दीनदलितांचा राजा होता, विव्दानांचा चाहता होता, कलावंतांचा त्राता होता, समाजसुधारकांचा दाता होता.शिक्षणाचा भोक्ता होता, स्थिर चित्ताने धोरण आखणारा नेता होता. उच्चवर्णीय समाजाच्या गुलामगिरीतून गरीबांना मुक्त करणारा सत्ताधीश होता. त्यांने क्षात्रजगदगुरूचे धर्मपीठ स्थापन केले. कुलकर्णी वतन नष्ट करून तलाठी पद निर्माण केले. बलुतेपध्दती नष्ट केली. पूर्वार्शमीच्या गुन्हेगारांना मुक्त केले.
महाराष्ट्राच्या इतिहासात ज्या महापुरूषांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते त्यामध्ये राजर्षी शाहु महाराज अग्रभागी आहेत. महाराजांनी मानवतावादी दृष्टीकोन ठेवला. समता प्रस्तापित करण्यासाठी जीवनभर अथक प्रयत्न केले. शेती सुधारणेला प्राधान्य दिले. शेतकर्‍यांना सवलती दिल्या. नोकरी व्यवसायाच्या संधी सामान्यांना उपलब्ध करून दिल्या. उद्योगधंदे उभे केले.२६ जुलै १८७४ हा राजर्षी शाहु महाराज यांचा जन्मदिवस. हा कालखंड इंग्रजी राजवटीचा. स्वातंत्र्यप्रेमाने भारावलेल्या समाजात सुधारणासाठी तळमळीने कार्य करणारे शाहु महाराज हे कोल्हापुर संस्थानातील नि:स्पृह, निर्भय आणि लोककल्याणकारी राजे होते. त्यांनी लोकशिक्षणासाठी अनेक संस्था उभारल्या आणि समाजिक सुधारणेच्या चळवळीत जीव ओतला. जनतेचे कल्याण हिच ईश्‍वर पुजा मानणार्‍या शाहु महाराजांनी जनतेला वेठीस धरणारी वेठबिगार आणि बलुतेदार पध्दती बंद केली. राखीव घटकासाठी आदेश काढुन राखीव जागांची तरतुद केली.
शाहु महाराजांनी महार आणि कुलकर्णी वतने नष्ट केली. दुष्काळग्रस्तांना आधार दिला. शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत केली. तलाव दुरूस्ती केली. पाटबंधारे योजना हाती घेतल्या. आरोग्य केंद्राची निर्मिती केली. विविध जातीतील विद्यार्थीसाठी वस्तीगृहाची सोय केली. राजा हा सर्वव्यापक असावा. त्याला आपल्या राज्यांची संपुर्ण माहिती असावी या विचारांचा पगडा असलेल्या महाराजांनी सामाजिक सुधारणेबरोबर शेतीची सुधारणा करणे छोटे उद्योगधंदे उभारणे शेतकर्यांना सवलती देणे. नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे. यासारखी लोकोपयोगी कामे मोठया तळमळीने केली. केवळ राजा म्हणून ते वागले नाहीत, तर प्रजेचा मित्र म्हणून त्यांनी कार्य केले. शिक्षण हा विकासाचा पाया आहे. हे सुधारणेचे मुलतत्व शाहु महाराजांनी जाणले होते.सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांचे निधन ६ मे १९२२ रोजी झाले.

No comments:

Post a Comment