१८५0 ते १९३0 या कालखंडात मलेरियाच्या तापाने जगभरात थैमान घातले होते लक्षावधी लोकांचा बळी घेतला होता. अमेरिका, युरोपपासून ते थेट भारतापयर्ंत वैद्यक शास्त्रातील अनेक संशोधकांनी या रोगाचे कारण शोधण्याचा चंगच बांधला होता. संशोधनाच्या क्षेत्रातील चुरशीच्या चढाओढीत अथक प्रयत्नांती डॉक्टर रोनाल्ड रॉस हे अग्रेसर ठरले. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशी की या त्यांच्या प्रयोगाची कर्मभूमी असलेला भारत देश व त्या संशोधनाच्या प्रक्रियेत भारतवासीयांचा सहभाग या दोन्ही गोष्टी जगाच्या इतिहासात अत्यंत कौतुकाच्या व मानाच्या स्थानी आहेत.
रोनाल्ड रॉस यांच्या जीवनातील चढ-उतार, आपल्या कामात त्यांनी घेतलेली अविश्रांत मेहनत व त्याचबरोबर सोबतीला असलेले त्यांचे हळुवार कवी मन हे सर्व अत्यंत लक्षणीय आहे.
अठराशे सत्तावन सालातील भारतातील प्रसिद्ध स्वातंत्र्यलढय़ाच्या काळात १३ मे रोजी अल्मोडा-नैनिताल-उत्तर प्रदेश या गावी रोनाल्ड रॉस यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा व वडील दोघेही सैनिक पैशाचे. भारतातील ब्रिटिश सरकारमध्ये कर्तबगारी गाजवून त्यांनी इमानेइतबारे नोकरी केली. त्यामुळे लहानपणापासूनच घरात सैनिकी वातावरण व कडक शिस्तीचे संस्कार होते. रॉसने त्याच्या लहान वयात वडिलांना झालेला मलेरियाचा अतोनात त्रास अगदी जवळून पाहिला होता. वयाच्या आठव्या वर्षी शिक्षणाकरिता त्याची रवानगी इंग्लंडमध्ये झाली. शालेय अभ्यासात चित्रकला व साहित्य यात उत्तम प्रगती असून सुद्धा वडिलांच्या निव्वळ कडक धाकामुळे रोनॉल्डला वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातच प्रवेश घ्यावा लागला. वास्तविक उत्तम कवी, चित्रकार व संगीताची आवड असलेल्या रोनॉल्डला डॉक्टर बनण्याची मुळीच इच्छा नव्हती. एकीकडे तो त्याच वेळी कथा-कादंबर्या देखील नाहीत असे. परंतु डॉक्टर झाल्यानंतर याच रॉसला नियतीने त्याच्या जगन्मान्य संशोधनाच्या मार्गाकडे खेचून नेले.
अंतिम वैद्यकीय परीक्षा कशीबशी उत्तीर्ण झाल्यावर वडिलांच्या आग्रहास्तव भारतीय वैद्यकीय सेवेसाठी मद्रास येथे रॉसची नियुक्ती झाली. तेथून बर्मा युद्धाच्या निमित्ताने त्याने अंदमान बेटावरही काम केले. त्याचे सैन्यातील रोगी हे मुख्यत: मलेरिया या तपासणी असत. त्यापैकी काहीजण क्विनिन हे औषध घेऊन बरे होते परंतु बर्याच जणांना औषधे वेळेवर न मिळाल्याने ते दगावत. या सर्वांचे हाल पाहून रॉस उद्विग्न होत असे. त्याच सुमारास त्याला गणित विषयाची गोडी लागली होती. त्याचा उपयोग पुढे त्याने मलेरियावरील संशोधनात केला.

No comments:
Post a Comment