कर्नाटक राज्यातल्या बेळगावपासून अवघ्या 90 किलोमीटर अंतरावर र्ईशी- दांडेली
अभयारण्य आहे. कर्नाटक सरकारने 10 मे
1956 रोजी या अभयारण्याची निर्मिती केली. या राज्याने
1987 मध्ये 250 चौरस किलोमीटरचे क्षेत्रफळ अणशी
राष्ट्रीय उद्यानात परिवर्तित केले. हे अभयारण्य अणशी
- दांडेली व्याघ्रप्रकल्प म्हणून ओळखले जाते. या
जंगलात आपल्याला ब्लॅक पँथर पाहायला मिळतो. जंगल बूक चित्रपटामध्ये
काळाभोर, चमकणार्या डोळ्यांचा
, चपळाईने पळणारा ब्लॅक पँथर तुम्ही पाहिला असेल. तो वाघ आपल्याला याठिकाणी पाहायला मिळतो.
जंगल म्हटले की उघड्या जीपमधून जंगलातील
कच्च्या रस्त्यांवरून केलेली जंगलसफारी हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. या सफरीदरम्यान जंगली जनावरांच्या केवळ एका दर्शनासाठी
फिरणे हा अनुभव अद्वितीयच असतो. जनावरांच्या पावलांचे ठसे,
विष्ठा, वास यावरून माग घेत तुम्ही दांडेलीत फिरलात
तर अनेकदा ब्लॅक पँथर , वाघ किंवा हत्ती पाहण्याचा अनुभव घेऊ
शकता, असा वन्यजीवप्रेमींचा अनुभव आहे. हरणे, गवे रेडे, माकड आणि बहुसंख्य
पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. व्हिसलिंग थ्रश, ट्रोगन, हॉर्नबिल, मिनिव्हेट्स,
पॅरेडाईज फ्लायकॅचर, श्रीलंकन फ्रॉगमाउथ हे पक्षीप्रेमींना
भुरळ घालणारे पक्षीही दांडेली व परिसरात बघायला मिळतात.
2005 मध्ये घेण्यात आलेल्या व्याघ्र
गणनेनुसार र्ईशी राष्ट्रीय उद्यानात 3 तर दांडेली अभयारण्यात
12 वाघांची नोंद झाली होती. 1997 मध्ये अणशीत
2 तर दांडेलीत 11 वाघांची नोंद होती. संपूर्ण भारतात दांडेली-अणशीचा जंगलपट्टा काळ्या वाघांसाठी
समृद्ध असून देशभरातील 40 टक्के काळे वाघ या परिसरात आहेत.
दांडेलप्पा मंदिराच्या क्षेत्रात 200 हून अधिक
दलदलीत आढणार्या मगरींचे वास्तव्य आहे. पट्टेरी वाघ, बिबटे आणि त्यांच्याच जातीतील काळे वाघ,
धनेश पक्षी यांच्या अधिवासामुळे हे व्याघ्रक्षेत्र नावारुपाला आलेले
आहे. गोव्याच्या सीमेलगतचे कॅसलरॉक, कुंभारवाडा
आणि अणशी तर दांडेलीच्या अखत्यारीत येणारे कुळगी, गुंड आणि फणसुली
येथील जंगलक्षेत्र व्याघ्रक्षेत्राची खरी प्राणशक्ती आहे.
बुलबुल पक्षी- या पक्ष्याचा आकार सुमारे 20 सेंटिमीटर
असतो. या पक्ष्याचा रंग धुरकट तपकिरी असून याच्या डोक्याचा रंग
काळा असून त्यावर लहान शेंडी असते. याच्या पाठीवर आणि घातीवर
तुटक रेषांसारख्या खुणा असतात, तर पाठीचा मागील भाग पांढरा असतो.
जो उडताना स्पष्ट दिसतो. याची मुख्य ओळख म्हणजे
याचा पार्श्वभाग लाल रंगाचा असतो. नर-मादी दिसायला सारखेच असतात. वनात, झुडपी जंगलात शेतीच्या प्रदेशात बागेत जोडीने किंवा लहान थव्यात राहणारा पक्षी
आहे.
भारद्वाज- हा पक्षी तुम्ही अनेकदा घराच्या आसपासही पाहिला असेल.
कुंभार कावळा, लाल कावळा, सुलक्षणी, कुंभारकुकडी, कुक्कुटकुंबा
या नावानेही या पक्ष्याला ओळखतात. झुडपी जंगल, खुले मैदानी प्रदेश, गवताळ प्रदेश अशा भागात आणि मनुष्य
वस्तीजवळच राहणे पसंत असलेला भारद्वाज , जास्तवेळ जमिनीवर राहतो.
एकाने कूप कूप कूप करत आवाज सुरू केला की दुसरा लगेच तसाच आवाज काढतो
आणि हा खेळ एका मागे एक खूप वेळ सुरू राहतो.
तितर-हा कोंबडीच्या आकाराचा पक्षी आहे. सुमारे 60 सेंटिमीटर आकाराचा हा पक्षी तपकिरी रंगाचा असतो. अंगावर
ठिपके, रेघा आणि पट्टे याचं मिश्रण असतं. त्याची शेपूट आखूड असते. शेपटीचा रंग तांबूस तपकिरी असतो.
नर आणि मादी सारखेच दिसतात. नराच्या दोन्ही पायांवर
आर्या ( छोट्या आकाराची नख असलेली बोटे)
असतात. त्याचा पळताना उपयोग होतो. गाव तितर, बरडा तितर, तांबडा तितर,
तीतीर, गाव तित्तिर या नावानेही तो ओळखला जातो.
टिटवी- साधारण: माळटिटवी किंवा पिवळ्या
गाठीची टिटवी या नावानेही हा पक्षी ओळखला जातो. तो आकाराने अंदाजे
तितराएवढा असतो. या पक्ष्याचे पाय लांब असतात. वाळूच्या रंगासारखी उदी टिटवी असते. तिचे पांढरे पोट
व काळे डोके असते. डोळ्यांजवळ पुढे पिवळ्या रंगाची मांसल गाठ
असते. उडताना काळ्या पंखावरील पांढरे पट्टे ठळक दिसतात.
नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.
No comments:
Post a Comment