Thursday, 28 May 2020

थोरा-मोठ्याचे सुविचार

1)आपण हे जग बदलू शकतो असा वेडसर विचार करणारेच जगात आमूलाग्र बदल घडवतात.-स्टीव्ह जॉब्ज
2)पर पिडा, पर निंदा। हे खरे पाप तयाचे।।-संत तुकाराम महाराज
3)माणूस मारता येतो, मात्र त्याचे विचार मरत नाहीत.-महादेव गोविंद रानडे
4)निर्धारशक्ती पराकोटीला पोहचल्यावाचून मन जिंकता येत नाही.-प्र. के.अत्रे

5)नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उसने मिळत नाही, ते स्वतः लाच निर्माण करावे लागते.-लोकमान्य टिळक
6)आपल्याला प्रतिकूल असेच घडेल असे माणसाने नेहमी गृहीत धरावे-स्वातंत्र्यवीर सावरकर
7)कुठलीही गोष्ट योग्यरित्या करण्याची इच्छा नसणे, हे त्या गोष्टीच्या अज्ञानापेक्षा लाजिरवाणे होय.-बेंजामिन फ्रॅंकलिन
8)आळशीपणाचा एक तोटा म्हणजे आळशी माणसाला प्राप्त झालेले वैभवही टिकवता येत नाही.-आर्य चाणक्य
9)एखादी गोष्ट कठीण असेल तर मी ती भविष्यात नक्कीच करेन,परंतु एखादी गोष्ट अशक्यप्राय असेल तर ती मी आताच करेन.-सर डोनाल्ड ब्रॅडमन
10) जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा अधिक मिळाली की ती विष बनते.-स्वामी विवेकानंद
11)दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेणाऱयांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.-अब्राहम लिंकन
12)यशस्वी कथांमधून केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्यांतून यश मिळवण्याच्या कल्पना मिळतात.-डॉ.एपीजे अब्दुल कलाम
13) लढाई नेहमी दोन प्रकारची असते.एक अन्यायाविरुद्ध आणि दुसरी स्वतःच्या दुर्बलतेविरुद्ध!-सरदार वल्लभभाई पटेल
14)तुम्ही नेहमीच साधारण जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हे कधीच उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात.-माया अँजेलू
15)काहीही न करता केवळ कल्पना करत राहण्याला काहीच अर्थ नाही.-चार्ली चॅप्लिन
16) मी माझ्या आयुष्याचं मूल्यमापन , मी गेल्यावर्षी होतो त्यापेक्षा या वर्षी माझ्यात किती सुधारणा झाली यावरून करतो.-सत्य नडेला
17) परिस्थितीशी जुळवून घेताना स्वतः मध्ये बदल करण्याची क्षमता असणे हे हुशारीचे लक्षण आहे.-स्टीफन हॉकिंग
18)शाळा म्हणजे सुजाण नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र होय.-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
19)देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि देशाचे आपण देणे लागतो.-स्वातंत्र्यवीर सावरकर
20)एक काम करत असताना एकच काम करा,त्यात सर्वस्व अर्पण करून इतर सर्वकाही विसरून जा.-स्वामी विवेकानंद
21) इतरांच्या चुकांतूनही शिका कारण स्वतःवरच प्रयोग करत राहिलात तर संपूर्ण आयुष्य कमी पडेल.-चाणक्य
22) माणसाचे खरोखरच जर कुणी देव असतील तर ते म्हणजे त्याचे आईवडील.-संत गाडगेबाबा
23)स्त्रियांना एक नियम लावणे व पुरुषांना दुसरा लागू करणे हा निव्वळ पक्षपात आहे.-महात्मा जोतिबा फुले

No comments:

Post a Comment